Home गाजावाजा स्पेशल तब्बल २६४ तास न थांबता दिवस-रात्र उडत राहिला हा पक्षी, १३५०० किमीचा केला प्रवास
गाजावाजा स्पेशल

तब्बल २६४ तास न थांबता दिवस-रात्र उडत राहिला हा पक्षी, १३५०० किमीचा केला प्रवास

8
Bird Files Guinness World Record
Bird Files Guinness World Record

प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही तरी कला असतात. त्याच्याच जोरावर व्यक्ती आपल्या आयुष्यात ठरवलेले लक्ष्य गाठू शकतो. काही जण उत्तम गातात तर काही जण उत्तम अभ्यास करतात. मात्र काही लोकांना विचित्र सवयी असल्याने त्याच्याच जोरावर नाव कमावतात. मात्र या कला फक्त माणसांमध्येच नव्हे तर पशु-पक्ष्यांमध्ये सुद्धा असते. ज्याच्या जोरावर ते आपले नाव कमावतता. (Guinness World Record)

अशातच एका मजबूत पंखांचा प्रतिभावान पक्ष्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. ५ महिन्याच्या एका पक्षाने अलास्का येथून ऑस्ट्रेलयापर्यंत तस्मानिया पर्यंत हजारो किमीचा लांब प्रवास केला आहे. आता ऐवढ्या दीर्घकाळ प्रवासाचा त्याच्या नावे उडण्याचा रेकॉर्ड दाखल करण्यात आला आहे. पक्ष्याला भले हे माहिती नसेल त्याने काय केले आहे पण तो चर्चेत आला आहे.

Bird Files Guinness World Record
Bird Files Guinness World Record

२६४ तास सातत्याने उडत राहिला पक्षी
बार टेल्ड गॉडविन नावाच्या या पक्षाने अलास्का येथून ऑस्ट्रेलियातील तस्मानियासाठी १३ ऑक्टोंबरला उडण्यास सुरुवात केली आणि २५ ऑक्टोंबरला त्याने ती पूर्ण केली. तो ११ दिवस सातत्याने उडत राहिला आणि १३ हजार ५६० किमीचा प्रवास त्याने केला. पक्ष्याच्या पाठील बाजूस सॅटेलाइट टॅग लावण्यात आला होता. त्याच्या माध्यमातून त्याला ट्रॅक केले गेले. पक्ष्याने ओशिनिया, वानुअतु आणि न्यू केलडोनिया बेट पार करत सातत्याने उड्डाण केले. तस्मानियामध्ये जाऊन तो थांबला. ५जी टॅगच्या माध्यमातून त्याचे उड्डाण ट्रॅक केल्यानंतर त्याच्या नावे जागतिक रेकॉर्ड दाखल केला आहे. (Guinness World Record)

हे देखील वाचा- अशक्यच! ३० वर्षांपूर्वी भ्रुण गोठवले होते, आता जन्मली जुळी मुलं

दीर्घकालीन उड्डाणात तरबेज आहे गॉडविट
असे नाही आहे की, टेल्ड गॉडविट प्रजातीच्या पक्षाने कोणताही रेकॉर्ड दाखल केलेला नाही. ते आपल्या दीर्घकालीन उड्डाणासाठी तरबेज आहे आणि वर्ष २०२० मध्ये ११ दिवसांच्या या प्रजातिच्या एका पक्षाने सातत्याने १२ हजार किमीचा प्रवास केला होता. हा पक्षी अलास्का ते न्युझीलंड उडत पोहचला होता. वर्ष २०२१ मध्ये हा पक्षी सुद्धा १३ हजार ५० किमी पर्यंत सातत्याने उडत राहिला आणि नंतर खाली उतरला. उड्डाणादरम्यान, हे पक्षी काही खात पित नाहीत. त्यांचे वजन २५० ते ४५० ग्रॅम पर्यंत असते आणि पंखांची रुंदी ७० ते ८० सेंटीमीटर असते. त्यांची प्रजाती अलास्कामध्ये आढळून येते.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....