Home प्रेस रिलीझ ‘शाबास मिथू’ चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
प्रेस रिलीझ

‘शाबास मिथू’ चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

9
Shabaash Mithu Trailer

‘शाबास मिथू’ (Shabaash Mithu) पुढील महिन्यात 15 जुलै रोजी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. आज निर्मात्यांनी ‘शाबाश मिथू’चा जबरदस्त ट्रेलर (Shabaash Mithu Trailer) रिलीज केला आहे. ट्रेलरमध्ये बॉलिवूड स्टार तापसी पन्नू क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजची भूमिका साकारताना दिसत आहे. ट्रेलरची सुरुवात मिताली राजच्या क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकारांनी होते. तापसीने तिच्या सोशल हँडलवर ट्रेलर शेअर केला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना, तापसी पन्नूने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्हाला नाव माहित आहे, आता मितालीला लीजेंड बनवण्यामागील कथा पाहण्यासाठी तयार व्हा. “द जेंटलमन्स गेम” ची नव्याने व्याख्या करणाऱ्या महिलेची कथा तुमच्यासमोर आणताना मला सन्मान वाटतो. ‘शाबास मिथू’ 15 जुलै.

जबरदस्त ट्रेलर

आता ट्रेलरबद्दल बोलायचे झाले तर, 2 मिनिटे 24 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मिताली राजचे बालपणापासून ते 23 वर्षांपर्यंतचे क्रिकेट करिअर अतिशय शानदार पद्धतीने दाखवण्यात आले आहे. याशिवाय ट्रेलरमध्ये अनेक इमोशनल सीन्सही पाहायला मिळतात. हा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्ही निःसंशयपणे म्हणाल की पुरुषांच्या वर्चस्वाच्या खेळात महिलांसाठी प्रवेश करणे खरोखर कठीण होते. पण मितालीने ती अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. ट्रेलरमध्ये तापसी तिच्या उत्कटतेसाठी कुटुंब, समाज यांच्या विरोधात खंबीरपणे उभी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

====

हे देखील वाचा: अरुण गवळींची भूमिका साकारणार ‘हा’ अभिनेता, ‘दगडी चाळ २’चा टीझर प्रदर्शित

====

हा चित्रपट मिताली राजच्या जीवनावर आधारित स्पोर्ट्स ड्रामा

मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 वर्षांची कारकीर्द आहे. तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत, अनेक विक्रम मोडले आहेत.या चित्रपटात मिताली राजच्या आयुष्यातील चढ-उतार, अपयश चांगल्या प्रकारे दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात तापसीशिवाय विजय राज देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. चित्रपटाची कथा प्रिया अवेनने लिहिली आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...