Home प्रेस रिलीझ ‘गॉडफादर’मधील चिरंजीवीचा फर्स्ट लूक रिलीज
प्रेस रिलीझ

‘गॉडफादर’मधील चिरंजीवीचा फर्स्ट लूक रिलीज

14
God Father

साउथ इंडस्ट्रीचा आगामी चित्रपट ‘गॉडफादर’ (God Father) रिलीजपूर्वीच चर्चेत राहिला आहे. सुपरस्टार चिरंजीवी स्टारर हा चित्रपट या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची चर्चा आणि चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ संपण्याचे नाव घेत नाहीये. हा चित्रपट दक्षिण भारतीय प्रेक्षकांसाठी तसेच हिंदी पट्ट्यातील लोकांसाठी खूप खास असणार आहे. कारण या चित्रपटाद्वारे बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे, त्यामुळे चाहते खूप उत्सुक आहेत.

आता या चित्रपटाबाबत अशी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढणार आहे. वास्तविक, निर्मात्यांनी या चित्रपटातील चिरंजीवीचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टीझरमध्ये दाखवला दमदार लूक

पहिल्या पोस्टरसोबतच निर्मात्यांनी ‘गॉडफादर’चा टीझर व्हिडिओही रिलीज केला आहे. या टीझरमध्ये असे दिसून येते की, एक कार लोकांमधुन जाते, जिथून चिरंजीवी खाली उतरतात. काळा कुर्ता-पायजमा आणि काळा चष्मा घातलेला, मेगास्टार त्यात खूपच रागीट दिसत आहे. त्याचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटात अभिनेता ‘सत्य देव’ची एंट्री झाली होती, ज्याचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

राम चरणने शेअर केली पोस्ट

चिरंजीवीचा मुलगा राम चरणने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, “गॉडफादर आले आहेत.” मोहन राजा दिग्दर्शित हा चित्रपट मेगास्टार चिरंजीवीचा 153 वा चित्रपट आहे. या प्रोजेक्टद्वारे बॉलीवूड अभिनेता सलमान खान टॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, नयनतारासोबत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Photo Credit – Twitter

====

हे देखील वाचा: ‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरवरून वाढला वाद, दिल्ली पोलिसांनी नोंदवला FIR, यूपीमध्येही गुन्हा दाखल

====

ही असेल स्टारकास्ट

मोहन राजा ‘गॉडफादर’चे दिग्दर्शन करत आहेत. हा मल्याळम सुपरहिट चित्रपट ‘लुसिफर’चा रिमेक आहे. ‘लुसिफर’ चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारनही दिसले होते. असा दावा केला जात आहे की, ‘गॉडफादर’ या चित्रपटात सलमान खानही हीच भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि चिरंजीवी व्यतिरिक्त नयनतारा, सत्यदेव कांचन आणि जय प्रकाश सारखे कलाकार दिसणार आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...