Home गाजावाजा स्पेशल तुर्की मधील Gate of Hell मंदिर, आतमध्ये गेल्यास रहस्यमय पद्धतीने होतो मृत्यू
गाजावाजा स्पेशल

तुर्की मधील Gate of Hell मंदिर, आतमध्ये गेल्यास रहस्यमय पद्धतीने होतो मृत्यू

10
Gate of hell
Gate of hell

जगभरात काही रहस्यम ठिकाण आहेत त्याबद्दल विविध दावे केले जातात. अशातच तुर्की मधील हिरापोलिस शहर हे त्यापैकी एक आहे. कारण येथील मंदिराला लोक नरकाचा दरवाजा असे म्हणतात. लोक असे सांगतात की, जो कोणीही या मंदिराजवळ जातो त्याचा मृत्यू होतो. ऐवढेच नव्हे तर या मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्या व्यक्तीचे शरिर सुद्धा हाती लागत नाही. खरंत सायन्स अलर्ट डॉट कॉम यांच्या मते, गेल्या काही वर्षांपासून येथे रहस्यमय पद्धतीने मृत्यू होत आहेत. हैराण करणारी गोष्ट अशी की, माणसांव्यतिरिक्त या मंदिराच्या संपर्कात येणारे जानवर सुद्धा जिवंत राहत नाही. याच कारणामुळे लोक त्याला ‘द गेट ऑफ हेल’ असे म्हणतात.(Gate of Hell)

एकेकाळी तुर्कीतील हेरापोलिस शहर अशा लोकांसाठी प्रसिद्ध होते ज्यांना अॅडव्हेंजर गोष्टी करण्याची आवड असते. देशातून परदेशातून पर्यटक या येऊन मंदिरात जाण्याचे धाडस करायचे. परंतु मंदिराची सावली जरी पडली तरीही त्या व्यक्तीचा मृत्यू होते असे सांगितले जाते. याला प्लुटोचे मंदिर असे म्हटले जाऊ लागले. म्हणजेच मृत्यूची देवतेचे मंदिर. खुप वर्ष असे मानले जात होते की, देवतेच्या श्वासामुळे मंदिर किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जाणाऱ्यांचा मृत्यू होतो. सातत्याने होणाऱ्या मृत्यूमुळे येथे लोकांनी हळूहळू जाणे बंद केले. दरम्यान,पर्यटक जाण्याचे धाडस करतात पण त्यांना स्थानिक लोकांकडून अडवले जाते.

पर्यटक किंवा एक्सपर्ट हे नक्की खरे आहे का हे पाहण्यासाठी तेथील स्थानिक लोक त्यांना एक पक्षी देतात. जेणेकरुन पर्यटक आपल्या डोळ्यांनी त्यांचा मृत्यू पाहू शकतात आणि तसे व्हायचे सुद्ध. मंदिराच्या संपर्कात आल्यानंतर पक्षाचा काही मिनिटांमध्ये मृत्यू व्हायचा. त्यामुळे मंदिरात जाण्याची इच्छा सुद्धा लोकांची व्हायची नाही.

Gate of hell
Gate of hell

हेरापोलिस शहर हे पठारी परिसरात वसलेले प्राचीन रोमन शहर आहे. या ठिकाणी लहान लहान अशा काही जागा आहेत जेथे विविध गोष्टी पहायला मिळतात. खासकरुन गरम पाण्याचे स्रोत. जे कॅल्शियमयुक्त आहेत आणि नेहमीच तेथे गरम पाण्याचे बुडबुडे येताना दिसून येतात. पण शहराचा दुसरा पैलू असा की. येथील हे प्लुटो मंदिर. रोमन मायथोलॉजीमध्ये प्लूटो धरतीच्या खाली राजा होता. त्याच्यासाठी हे मंदिर उभारण्यात आले होते. या बद्दल खास माहिती नाही पण हे खरं होते की, मंदिरात जाणाऱ्यांचा मृत्यू व्हायचा.(Gate of Hell)

हे देखील वाचा- ‘Haunted’ मानला जातो सुरतचा ‘हा’ बीच, विकिपीडियावरही केला गेलाय भयावह उल्लेख!

वैज्ञानिकांनी या रहस्येमागील शोधले कारण
वैज्ञानिकांनी या रहस्यमय मृत्यूमागील कारण अखेर शोधून काढले. वैज्ञानिकांच्या मते मंदिराच्या खाली सातत्याने विषारी कार्बन डायऑक्साइड गॅस निघतो. याच कारणामुळे मनुष्य, पशु आणि पक्षी जर त्याच्या संपर्कात आले तर त्यांचा मृत्यू होतो. वैज्ञानिकांना मंदिराखाली असलेल्या गुफेत मोठ्या प्रमाणात CO2 मिळाले आहे. सामान्यत: जेथे ३० मिनिटांमध्ये केवळ १० टक्के कार्बन डायऑक्साइडच व्यक्तीचा जीव घेऊन शकतो. त्याच मंदिराच्या गुफेत विषारी गॅसचे प्रमाण ९१ टक्के आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू होतो.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....