Home गाजावाजा स्पेशल उन्हाळ्यात पायांना भेगा पडतात? करा हे घरगुती उपाय
गाजावाजा स्पेशललाईफ स्टाईल

उन्हाळ्यात पायांना भेगा पडतात? करा हे घरगुती उपाय

8
Foot Care in Summer
Foot Care in Summer

Foot Care in Summer : पायांना भेगा पडण्याची सर्वाधिक समस्या हिवाळ्यात निर्माण होते. पण काही महिलांना उन्हाळ्यात देखील पायांना भेगा पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे पायांचे सौंदर्य दूर होते. खरंतर, पायांना भेगा पडण्यामागे काही कारणे असू शकतात. जसे की, माती-धूळीच्या संपर्कात येणे, अनवाणी चालणे किंवा पोषण तत्त्वांची कमतरता. अशातच उन्हाळ्यात पायांना भेगा पडत असल्यास कोणते घरगुती उपाय करावेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..

केळ्याचा मास्क
सर्वप्रथम एक पिकलेले केळ घेऊन ते स्मॅश करून घ्या. यामध्ये एक चमचा मध आणि कॉफी पावडर मिक्स करा. ही पेस्ट पायांना भेगा पडल्या आहेत तेथे लावा. 25-30 मिनिटे पेस्ट पायांना लावून ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून कमीत कमी तीन वेळेस केळ्याचा मास्क पायांना भेगा पडल्या आहेत तेथे लावल्यानंतर ही समस्या कमी झाल्याचे दिसून येईल.

स्टेप बाय स्टेप फॉलो करा या टिप्स
पायांना भेगा पडल्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी कोमट पाण्यात ग्लिसरिन, लिंबूचा रस आणि गुलाब पाणी टाका. या पाण्यात 20-30 मिनिटे पाय बुडवून ठेवा. यानंतर स्क्रबरच्या माध्यमातून पायांवर जमा झालेली डेड स्किन स्वच्छ करा. आता पायांना पुसून घेतल्यानंतर मॉइश्चराइजर लावा. ही प्रक्रिया आठवड्यातून दोन वेळेस करा. (Foot Care in Summer)

एलोवेरा आणि ग्लिसरिनचा वापर
पायांना भेगा पडल्या असल्यास एलोवेरा जेलमध्ये ग्लिसरिन आणि नारळाचे तेल मिक्स करुन लावा. रात्रभर पेस्ट पायांना लावून ठेवा. दररोज पेस्ट पायांना लावून ठेवल्यानंतर काही दिवसातच पायांच्या भेगा कमी झालेल्या दिसतील.


आणखी वाचा :
ओठांना मध लावण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे
दिवसरात्र काम करणाऱ्या व्यक्ती होऊ शकतात बर्नआउटच्या शिकार, जाणून घ्या लक्षणे

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...