Home गाजावाजा स्पेशल देशातील पहिल्या नाण्याचा इतिहास
गाजावाजा स्पेशल

देशातील पहिल्या नाण्याचा इतिहास

8
first rupee coin
first rupee coin

भारतातील नाण्यांची आपली एक वेगळीच कथा आहे. एक रुपयाच्या नाण्याचा इतिहास तर अधिकच खास आहे, कारण ते नाणे अशावेळी चलनात आणले गेले जेव्हा देशात आधीपासूनच विविध नाणी चलनात होती. ही नाणी व्यापारात समस्या निर्माण करत होत्या. म्हणूनच एक रुपयाचे नाणे आणण्याची वेळ आली. २६६ वर्षांपूर्वी म्हणजेच १९ ऑगस्ट १७५७ मध्ये भारताला पहिल्यांदा नाण्याच्या रुपात एक रुपयाचे नाणी मिळाले. मात्र सुरुवातीला याची मर्यादा होती. पण इतिहासात ही तारीख मोठ्या अक्षरात लिहिली गेली. (First rupee coin)

एक रुपयाचे नाणे हे ईस्ट इंडिया कंपनीने जारी केले होते. याच्या निर्मितीचे काम कलकत्ता मधील टंकसाळेत केले होते. हाच तोच कालावधी जेव्हा प्लासीचे युद्ध संपले होते आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटीशांचे शासन सुरु झाले होते. याच वर्षात ईस्ट इंडिया कंपनी त्या काळात बंगाल मधील मुघल प्रांतात चालवली गेली. बंगालचे नवाबांच्या करारानंतर याची सुरुवात झाली होती.

first rupee coin
first rupee coin

त्यावेळी देशात विविध हिस्स्यांमध्ये विविध मुद्रा चलनात होत्या, पण त्यामुळे व्यापारासाठी समस्या येत होत्या. तेव्हा १९३५ मध्ये युनिफॉर्म कॉइनेज अॅक्ट पारित केला गेला आणि संपूर्ण देशात एकच मुद्रा चलनात आली. विविध मुद्रांचे चलन संपू लागले होते. तो पर्यंत इंग्रजांनी संपूर्ण देशावर ताबा मिळवला होता. तेव्हा नाण्यांवर ब्रिटीश शासकांचे फोटो लावले जायचे. यामध्ये महाराणी व्हिक्टोरियाचा फोटो सर्वाधिक उल्लेखनीय होता.

ईस्ट इंडिया कंपनीने १६१३ मध्ये पहिल्यांदा टंकसाळ सुरतमध्ये स्थापन केली. त्यानंतर अहमदाबाद आणि मुंबईत स्थापन केली. मात्र एक रुपयाचे नाणे जारी करण्याचे क्रेडिट हे कलकत्ता टंकसाळेला जाते.

आता असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, एक रुपयाचे नाणे कलकत्ता टंकसाळेत तयार करण्यात आला. तर आधीपासून स्थापन करण्यात आलेल्या टंकसाळेत कशा प्रकारची नाणी तयार केली जायची. याचे खरं उत्तर असे की, गोल्ड, सिल्वर आणि कॉपरची नाणी तयार केली जायची. ज्यांना क्रमश: कॅरोलिना, एंजलना आणि कॉपरून असे म्हटले जायचे. (First rupee coin)

स्वातंत्र्य भारतानंतर १९५० पर्यंत ब्रिटिश कालीन नाणी देशात प्रचलनात होती. त्यानंतर भारताने आपली नाणी तयार करण्यास सुरुवात केली. वर्ष १९६२ मध्ये एक रुपयाचे नाणे चलनात आले. जे आजही वापरले जाते. मात्र याच्या डिझाइनमध्ये वेळोवेळी बदल केला गेला.

एक रुपया म्हणजे १६ आणे
आधी एक रुपयाचा अर्थ असा होता की, १६ आणे, म्हणजेच त्यावेळी ६४ पैशांसमान एक रुपया होता. त्यावेळी एक आणे, दोन आणे, अर्धा आण्याची नाणी चलनात होती. एक आण्याचा अर्थ असा होता की, चार पैसे, १९४७ मध्ये अर्धा नाणे हे औपचारिकरित्या बंद केले गेले. एक, दोन, तीन, पाच, दहा, वीस, पंचवीस, पंन्नास सारखी नाणी दीर्घकाळ चलनात राहिली.

हेही वाचा- तृतीयपंथ्यांकडून मिळालेल्या 1 रुपयाचे ‘हे ‘ आहे महत्त्व

एक पैशांचे नाणे १९५७ ते १९७२ दरम्यान चलनात होता. तीन पैशांचे नाणी १९६४ ते १९७२ दरम्यान तयार करण्यात आले आणि चालले. पाच पैशांचे नाणे १९५७ ते १९९४ दरम्यान चलनात होते, १० पैशांचे नाणे १९६४ ते १९७१ पर्यंत तयार केले गेले. २५ पैशांचे नाणे १९६४ ते १९७२ पर्यंत आणि ५० पैशांचे नाणे १९६४ ते १९७१ पर्यंत तयार करण्यात आले. लहान नाणी सरकारने २०११ मध्ये औपचारिकरित्या बंद केली.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....