Home प्रेस रिलीझ “फाईल नंबर 498 A” चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच
प्रेस रिलीझमनोरंजन

“फाईल नंबर 498 A” चित्रपटाचे टीजर पोस्टर लाँच

9
File Number- 498 A

मराठी चित्रपटांमध्ये आत्तापर्यंत न्यायव्यवस्थेशी संबंधित किंवा कोर्टरूम ड्रामा प्रकारातील काही चित्रपट येऊन गेले. त्यात आता मल्हार गणेश दिग्दर्शित “फाईल नंबर- 498 A” (File Number- 498 A Movie Poster) या आगळ्यावेगळ्या नावाच्या चित्रपटाची भर पडत असून, या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.

सौ.आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती असलेल्या आणि मनीष हर्षा मुव्हीज प्रस्तुत ‘फाईल नंबर – 498 A” या चित्रपटाची कथा श्रीधर शंकर तावरे यांनी लिहिली आहे. तर श्रीधर शंकर तावरे आणि आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे.

संवाद आणि गीतलेखन आशिष निनगुरकर यांचं आहे. स्वप्नील प्रफुल्ल यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली असून कायद्यातील 498 A या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

आतापर्यंत काही चित्रपटांमध्ये कोर्टरूम ड्रामा सादर झाला असला, तरी “फाईल नंबर- 498 A” हा चित्रपट अधिक वेगळ्या पद्धतीनं सादर होणार आहे.

====

हे देखील वाचा: श्री.रवींद्रनाथ टागोर यांच्या नाटकावरून प्रेरित ‘लंडन मिसळ’ची घोषणा

====

पोस्टरवर मागणारे हात आणि मंगळसूत्रात बांधलेले हात, पार्श्वभूमीवर उडणारी कबुतरं दिसत असल्यानं स्वातंत्र्य, बंधनं या बाबतची मांडणी चित्रपटात असेल असा अंदाज आपल्याला करता येतो. चित्रपटाचं पोस्टर लक्षवेधी असून,चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...