Home मनोरंजन अमेरिकेतील ‘हा’ अभिनेता झाला चक्क १० मुलांचा बाबा
मनोरंजन

अमेरिकेतील ‘हा’ अभिनेता झाला चक्क १० मुलांचा बाबा

7
Japan
Japan

जेव्हा जगात अधिक लोकसंख्या असलेल्या देशांबद्दल बोलले जाते तेव्हा भारत आणि चीनचे प्रथम नाव घेतले जाते. त्यामुळे कळते की, या देशांमध्ये सर्वाधिक लोक राहतात. असे म्हटले जाते की, आशियातील लोक सर्वाधिक मुलं जन्माला घालतात. मात्र अमेरिकेतील एका अभिनेत्याबद्दल अशी बाब समोर आली आहे ती ऐकूनच तुम्हाला हैराण व्हायला होईल. कारण अमेरिकेतील एक प्रसिद्ध अभिनेता चक्क १० मुलांचा बाबा झाला आहे. वयाच्या ४१ वर्षात ऐवढ्या मुलांचा बाबा झाल्याची पोस्ट ही त्याने सोशल मीडियात शेअर केली आहे. लोकांनी या पोस्टवर विविध प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. (Father of 10 Children)

नेक कॅननने १० मुलांचा बाबा झाल्यानंतर इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने परिवाराचे आभार मानले आहेत. अभिनेता, संगीतकार आणि टीव्ही होस्ट कॅननने कमी कालावधीतच विविध महिलांसोबत संबंध ठेवत त्यांच्या मुलांचा बाबा झाल्याने अधिक चर्चेत आला आहे. खास गोष्ट अशी की, कॅनने स्वत: असे म्हटले आहे की, त्याने ही मुलं चुकून जन्माला घातलेली नाहीत. तर प्रग्नेंसीची प्लॅनिंग त्याने केली होती. मात्र सोशल मीडियात लोक कॅननला ट्रोल करत आहेत.

Father of 10 children
Father of 10 children

६ महिलांपासून १० मुलं
तसे पहायला गेल्यास कॅनने फक्त एका महिलेशी लग्न केले आहे. मात्र ६ विविध महिलांसोबत त्याचे रिलेशनशिप होते. प्रत्येक महिला रिलेशनशिपनंतर आई झाली. त्याचा १० वा मुलगा मॉडल ब्रिटनी बेल हिच्यापासून झाला आहे. ब्रिटनी २८ सप्टेंबरला तिसऱ्या मुलाची आई झाली. असे सांगितले जात आहे की, कॅनन ११ व्या मुलाचा बाबा सुद्धा होणार आहे. डीजे एबी डे रोजापासून त्याला जुळी मुलं आहेत. एबी पुन्हा एकदा आई बनवणार आहे. मॉडेल एलिएसा स्कॉट पासून सुद्धा तिला त्याला एक मुलगा झाला होता. मात्र ब्रेन कॅन्सरमुळे त्याचा मृत्यू झाला होता.(Father of 10 Children)

हे देखील वाचा- जगात तुमच्यासारखी दिसणारी व्यक्ती असू शकते? पहा काय म्हणतात तज्ञ

आता ११व्या मुलाची प्रतिक्षा
प्रश्न असा उपस्थितीत राहतो की, कॅनन एका वडिलाच्या आधारावर मुलांची देखभाल कशी करणार. युएसए टुडे शी बातचीत करताना त्याने असे म्हटले की, जर मी फिजिकली आपल्या मुलांसोबत एकाच शहरात नसेल तर मी फेसटाइमच्या माध्यमातून ते शाळेत जाण्यापूर्वी त्यांच्याशी बातचीत करतो. तसेच मी जर शाळेत सोडायला गेलो तर आणायला ही जातो.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...