दक्षिण-पूर्व आशियातील एक छोटा आणि देश म्हणून सिंगापूरचे नाव घेतले जाते. गेल्या काही वर्षात पर्यटन आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून सिंगापूरचे नाव घेतले जाते. 1965 मध्ये मलेशियापासून वेगळे होऊन सिंगापूर हे नवीन राष्ट्र उदयास आले. चौदाव्या शतकात सुमात्रा बेटाचा एक हिंदू राजपुत्र सिंगापूर बेटावर शिकारीसाठी गेला असता तेथील जंगलात सिंह पाहून त्याने या बेटाचे नाव सिंगापुरा म्हणजेच सिंहांचे बेट असे ठेवले. आता हेच सिंगापूर जगातील 9 वी आणि आशियातील 4 वी मोठी अर्थव्यवस्था आहे. यामुळेच सिंगापूरमध्ये रहाण्याचे स्वप्न अनेकांचे असते. मात्र त्यासाठीचा परवाना मिळवणं ही सर्वात मोठी अडचण आहे. (Singapore)

या सर्वातूनच सिंगापूरमध्ये चक्क बनावट लग्न करण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. सिंगापूरमध्ये रहाणा-या युवकांसोबत अन्य देशातील तरुणी लग्न करत असून त्यातून त्यांना सिंगापूरमध्ये काम करण्याचा आणि रहाण्याचा परवाना मिळत आहे. अशाप्रकारच्या फसव्या लग्नाच्या प्रकणात गेल्या तीन वर्षाच्या काळात एवढी वाढ झाली आहे की, सिंगापूर सरकारला त्यासंदर्भात कायदा करण्याची गरज भासत आहे. सध्या अशा प्रकारच्या लग्नामध्ये दोषी आढळणा-यांना 10 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड ठोठावण्यात येत आहे. मात्र एवढी शिक्षा असली तरी या बनावट लग्नाच्या प्रकरात वाढ होत असल्यानं सिंगापूर सरकारनं चिंता व्यक्त केली आहे. सिंगापूर हा आशियामधील सर्वात सुंदर देश म्हणून ओळखला जातो. येथे उद्योगधंदेही चांगले असल्यामुळे नोकरीच्या संधीही चांगल्या उपलब्ध आहेत. त्यामुळेच सिंगापूरमध्ये स्थायिक होण्यासाठी अनेक तरुण प्रयत्नशील असतात. यासाठी चक्क सिंगापूरमध्ये खोट्या लग्नाचे प्रकार सुरु झाले आहेत. (International News)
गेल्या नऊ महिन्याच्या कालावधीत अशा प्रकारची 32 खोटी लग्न झाल्याचे उघडकीस आले आहे. या वाढत्या प्रकणानं सिंगापूरमध्ये पोलीसांनी यासंदर्भात वेगळी समिती स्थापन केली असून त्यांनी बनावट विवाह करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. या बनावट विवाहात परदेशातील महिला सिंगापूरमध्ये रहाणा-या पुरुषांसोबत लग्न करत आहेत. यासाठी या महिला, त्या पुरुषाला पैसे देतात. असे बनावट लग्न केल्यावर त्यांना सिंगापूरमध्ये रहाण्याचा आणि काम करण्याचा परवाना सहस मिळून जातो. सिंगापूरमधील गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार अशा प्रकरणात झालेली वाढ चिंताजनक आहे. यामुळे बहु-जातीय सिंगापूरमध्ये सामाजिक समस्या निर्माण होण्यीची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. हे परदेशी नागरिक अनेकवेळा बेकायदेशीर काम करतांना आढळले आहेत. तसेच सिंगापूरमधील शांतताही त्यांच्यामुळे बाधित झाल्याचे निदर्शनास आले आहे. (Singapore)

याप्रकरणी सिंगापूरमधील इमिग्रेशन अँड चेकपॉईंट अथॉरिटी (Immigration and Checkpoint Authority) तपास करीत असून यामध्ये स्थानिकांच्या मदतीनं मोठं रॅकेट चालू असल्याचे स्पष्ट केले. यासर्वात स्थानिकांचाही तेवढाच सहभाग असल्यामुळे गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यास वेळ जात आहे. या सर्व कालावधीत संबंधित महिला सिंगापूरमध्ये काम करण्याचे आवश्यक ते परवाने काढून मोकळी होते. बनावट विवाहात सहभागी होण्यासाठी दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येत आहे. तसेच दंडाचीही तरतूद आहे. 6,25,671 रुपयांचा दंड यातील दोषींना होत आहे. ज्या महिला असे बनावट लग्न करण्यासाठी सिंगापूरमधील तरुणांचा वापर करीत आहेत, त्या तरुणांनाही या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवण्यात येत आहे. (International News)
========
हे देखील वाचा : Char Dham : हिवाळी चार धाम यात्रा सुरु !
Kolhapur News : मरून पुन्हा जीवंत होणाऱ्या माणसांच रहस्य काय ?
======
त्यांनाही तरुंगवास आणि दंड ठोठावण्यात येत आहे. मात्र असे असूनही बनावट विवाहांच्या प्रमाणात वाढ होत आहे. यासंदर्भात तपास करणा-या पोलीस अधिका-यांच्या माहितीनुसार स्थानिक तरुण यासंदर्भात सर्व माहिती ही लिखित स्वरुपात ठेवत नाहीत. सर्व व्यवहार हा तोंडी होतो. भविष्यात पोलीसांनी अटक केली तर कुठलाच पुरावा नको, म्हणून ही काळजी घेतली जाते. यासाठी एक तरुण काम करत नाही, तर संपूर्ण टिमच कार्यरत आहे. अशावेळी परदेशातील तरुणी या टिमच्या संपर्कात येतात. मग त्यांच्यात बोलणी होऊन पैशांचे नक्की केले जाते. ठराविक रक्कम आल्यावर या तरुणी पर्यटनाच्या निमित्तानं सिंगापूरमध्ये येतात आणि तेथील ठराविक तरुणाच्या प्रेमात पडल्याचे दाखवून त्याच्याबरोबर लग्न करतात. ही जोडपी लग्न झाल्यावर वेगळी रहातात, पण पोलीसांनी पकडू नये म्हणून मुलाच्या घरात त्या परदेशी मुलीचे सामान ठेवण्यात येते. यामुळेच या गुन्ह्यात सिंगापूरमधील तरुणांनाही सहगुन्हेगार ठरवत शिक्षा सुनावण्यात येत आहे. (Singapore)
सई बने
- America
- BJP
- china
- congress
- eknath shinde
- Immigration and Checkpoint Authority
- india
- information
- International news
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Malaysia
- Marathi News
- Marriage
- Mumbai
- Narendra Modi
- News
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- singapore
- Social News
- Social Updates
- todays marathi headlines
- Todays Marathi News
- Top Stories
- Uddhav Thackery
- राजकारण