Home लाईफ स्टाईल  Skin Care : चेहरेवर ग्लो हवा आहे? ब्लीच करण्यापूर्वी त्वचा करा अशा प्रकारे तयार
लाईफ स्टाईल

 Skin Care : चेहरेवर ग्लो हवा आहे? ब्लीच करण्यापूर्वी त्वचा करा अशा प्रकारे तयार

17
Skin Care
Skin Care

Skin Care :  सण-समारंभ, लग्न, पार्टी किंवा फोटोशूट… चेहऱ्यावर तात्काळ उजळपणा हवा असेल, तर अनेक महिलांचा पहिला पर्याय असतो फेशियल ब्लीच. पण चुकीच्या प्रकारे किंवा घाईघाईत केलेला ब्लीच उलट त्वचेला त्रास देऊ शकतो. त्यामुळे ब्लीच करण्याआधी त्वचेची योग्य तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे त्वचेला होणारा त्रास कमी होतो आणि इंस्टंट ग्लोही अधिक काळ टिकतो. चला तर जाणून घेऊया ब्लीच करण्यापूर्वी कोणते स्टेप्स फॉलो करावेत…

त्वचेचा पॅच टेस्ट करायला विसरू नका ब्लीच करताना सर्वात पहिले काम म्हणजे पॅच टेस्ट. ब्लीचचे केमिकल्स त्वचेवर रिअ‍ॅक्शन करू शकतात. त्यामुळे हाताच्या मनगटावर किंवा कानाच्या मागे थोडा ब्लीच लावून १० मिनिटे थांबा. जळजळ, खाज, लालसरपणा दिसला तर तो ब्लीच चेहऱ्यावर वापरू नये. ही साधीशी टेस्ट तुम्हाला मोठ्या स्किन डॅमेजपासून वाचवू शकते. (Skin Care )

Skin Care
Skin Care

त्वचा नीट स्वच्छ करून घ्या ब्लीच करण्याआधी चेहरा चांगल्या क्लींजरने धुवा. त्वचेवरील धूळ, तेलकटपणा आणि मेकअपचे अवशेष हटवणे महत्त्वाचे आहे.डीप क्लेन्सिंग मिल्क किंवा फोम बेस्ड फेसवॉश वापरा गरम पाण्याऐवजी सामान्य किंवा थंड पाणी वापरा स्वच्छ त्वचेवरच ब्लीच चांगले सेट होते आणि उजळपणा अधिक जाणवतो. (Skin Care )

सौम्य स्क्रबिंग करा डेड स्किन हटवा ब्लीच लावण्याआधी जेन्टल स्क्रब  करून डेड स्किन आणि ब्लॅकहेड्स काढा.  त्यामुळे ब्लीच त्वचेच्या आत अधिक चांगल्या प्रकारे कार्य करते त्वचेला अधिक स्मूद आणि ग्लोइंग फिनिश मिळते पण हार्श स्क्रब किंवा जोरात रगडणे टाळा, नाहीतर त्वचा संवेदनशील होऊन ब्लीच लावताना जास्त जळजळ होऊ शकते.

skin care
skin care

चेहऱ्यावर बर्फ फिरवा पोर्‍स टाईट ठेवण्यासाठी स्क्रबिंगनंतर त्वचा उघडी पडते आणि पोर्‍स ओपन होतात. त्यामुळे आइस क्यूब हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवा. यामुळे पोर्‍स टाईट राहतात ब्लीचमुळे होणारा इरिटेशनचा धोका कमी होतो

==================

हे देखील वाचा :

In 7 Trendy Makeup Looks: पार्टीत सर्वांच्या नजरा तुमच्यावर!

Glowing Tips : दिवाळीत चेहऱ्यावर येईल ग्लो, वाचा करीना कपूरच्या न्यूट्रिशनिस्टच्या खास टिप्स

Excess Handwashing : वारंवार हात धुतल्यानेही होऊ शकतो आजार? वाचा ही महत्वाची माहिती

==================

संवेदनशील भागांना व्हॅसलिन लावा चेहर्‍याच्या काही भागांवर त्वचा अधिक पातळ आणि नाजूक असते  जसे ओठाभोवती, डोळ्यांच्या जवळ, भुवयांच्या दरम्यान व नाकाच्या बाजू. येथे व्हॅसलिन किंवा कोणताही मॉइश्चरायझिंग बाम लावा. यामुळे ब्लीचचा थेट केमिकल संपर्क कमी होतो आणि त्वचेचे संरक्षण होते. चेहऱ्यावर कोणतीही वॅक्सिंग, थ्रेडिंग किंवा फेशियल केले असेल तर २४-४८ तासांनीच ब्लीच करा ॲक्टिव्ह पिंपल्स किंवा त्वचेवर जखमा असतील तर ब्लीच टाळा डार्क, डॅमेज किंवा पॅचेस असलेल्या त्वचेवर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ब्लीच करा योग्य प्रकारे स्किन प्रेप केली तर ब्लीचिंगचे रिझल्ट दुप्पट चांगले दिसतात आणि इंस्टंट ग्लो ही लांब काळ टिकतो. त्यामुळे घाई नको, त्वचेला योग्य वेळ द्या आणि शाइनिंग व ब्राइट स्किनचा आनंद घ्या! (Skin Care )

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....