Home लाईफ स्टाईल डोळ्यांखालील सुरकुत्यांवर घरगुती उपाय, तयार करा या 4 नॅच्युरल क्रिम्स
लाईफ स्टाईल

डोळ्यांखालील सुरकुत्यांवर घरगुती उपाय, तयार करा या 4 नॅच्युरल क्रिम्स

7
Eye care
Eye care

Eye Care Tips : आजच्या धकाधकीच्या जीवनश्यलित झोपेचा अभाव, ताणतणाव आणि वाढतं वय यामुळे डोळ्यांच्या खाली सुरकुत्या दिसू लागतात. यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट केल्या जातात. अथवा ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण तरीही कालांतराने डोळ्यांखाली डार्क सर्कल आणि सुरकुत्या दिसू लागतात. खरंतर, डोळ्यांखाली सुरकुत्या येण्यामागे काही कारणे असू शकतात. अशातच  घरच्याघरी या समस्येवर काही सोप्या आणि नैसर्गिक क्रिम्स प्रभावी ठरू शकतात. याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया.

1 एलोवेरा आणि बदामाचे तेल

एक चमचा एलोवेराच्या जेलमध्ये काही थेंब बदामाच्या तेलाचे काही थेंब टाका. या दोन्ही गोष्टी एकजीव करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डोळ्यांखालील सुरकुत्यांची समस्या कालांतराने दूर होण्यास मदत होईल.

Eye care

2 नारळाच तेल आणि व्हिटमिन इ कॅप्सूल

1 चमचा खोबरेल तेलात १ चमचा व्हिटमिन इ कॅप्सूल मिक्स करा. हे मिश्रण रात्री डोळेंच्या आजूबाजूला लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेला पोषण मिळण्यासह डोळ्यांखालील सुरकुत्यांची समस्या कमी होते.

===================================================================================================

हेही वाचा : 

या 5 अँटी-एजिंग ड्रिंक्सचा करा डाइटमध्ये समावेश, चाळीशीतही दिसाल तरुणी

तूप की एलोवेरा, कोरड्या त्वचेसाठी काय उत्तम?

=======================================================================================================

3 दूध आणि मध

१ चमचा दूध आणि एक चमचा मध हे मिक्स करुन पातळ मिश्रण तयार करा. हे मिश्रण १५ – २० मिनिट डोळ्यांच्या खाली लावून ठेवा. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेगा ग्लो येईल आणि डोळ्यांखालील सुरकुत्याही कमी होतील. (Eye Care Tips)

4 गुलाब पाणी आणि काकडी

काकडीचा रस आणि गुलाब पाणी सामान प्रमाणात घेतल्यानंतर एकत्रित करून घ्या आणि कापसाच्या मदतीने डोळ्यांच्या खाली लावा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. याशिवाय त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते.

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....