Home आंतरराष्ट्रीय Donald Trump : ट्रम्पसोबत एपस्टाईन फाईलही ब्रिटनच्या दौ-यावर !
आंतरराष्ट्रीय

Donald Trump : ट्रम्पसोबत एपस्टाईन फाईलही ब्रिटनच्या दौ-यावर !

14
Donald Trump

अमेरिकेत वादग्रस्त असलेली एपस्टाईन फाइल्स अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत ब्रिटनमध्येही पोहचली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली पत्नी मेलानिया यांच्यासह ब्रिटनच्या दौ-यावर आहेत. येथे त्यांचे स्टॅन्स्टेड विमानतळावर उतरल्यानंतर, ब्रिटनमधील अमेरिकेचे राजदूत वॉरेन स्टीफन्स आणि किंग चार्ल्स तिसरे यांचे प्रतिनिधी व्हिस्काउंट हेन्री हूड यांनी स्वागत केले. पण त्यासोबतच ब्रिटनच्या प्रसिद्ध विंडसर कॅसलमध्ये ट्रम्प आणि जेफ्री एपस्टाईन यांचे फोटो प्रदर्शित करण्यात आले होते. लोक हातात फलक घेऊन ट्रम्प विरोधात घोषणाही देत होते. लैंगिक गुन्हेगार एपस्टाईनशी संबंध असल्याबद्दल ब्रिटिश राजदूतांना बडतर्फ कऱण्यात आले असून या प्रकरणात ब्रिटीश राजघराण्यातील व्यक्तींचाही समावेश असल्याचा आरोप आहे. (Donald Trump)

या सर्वात एपस्टाईन आणि ट्रम्प यांच्या घनिष्ट मैत्रीच्या बातम्याही गाजत आहेत. त्यातच ही एपस्टाईन फाईल ट्रम्प यांनी दाबून टाकली असून त्यातून ते स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा हा ब्रिटन दौरा सुरु होण्यापूर्वी गाजला आहे. या दोन दिवसाच्या दौ-यात अमेरिकेच्या या शाही कुटुंबाचे ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स तिसरे आणि राणी कॅमिला यांनी विंडसर कॅसलमध्ये स्वागत केले. मात्र त्यापूर्वी ट्रम्प यांच्यापाठोपाठ आलेल्या एपस्टाईन प्रकरणामुळे या दौ-याचे हसे झाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुस-यांदा ब्रिटन दौ-यावर जाणारे पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मात्र त्यांच्या या दौ-यापूर्वीच त्यांच्या या दौ-याला ब्रिटनमध्ये विरोध सुरु झाला. ट्रम्प दाम्पत्याचे अमेरिकेत आगमन होण्यापूर्वी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. या दौ-यापूर्वीच विंडसर कॅसलमध्ये ट्रम्प आणि जेफ्री एपस्टाईन यांचे फोटो प्रदर्शित करण्यात आले होते. लैंगिक गुन्हेगार एपस्टाईनशी संबंध असल्याबद्दल ट्रम्प यांचा निषेध करण्यासाठी मोठा जमाव जमला होता. (International News)

लेड बाय डॉंकीज या कार्यकर्त्यांच्या एका गटाने डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एपस्टाईन यांचे फोटो आणि व्हिडिओ लंडनच्या पश्चिम भागात असलेल्या विंडसर कॅसलच्या टॉवरवर लावल्यानं मोठी खळबळ उडाली. ट्रम्प ब्रिटनच्या त्यांच्या दौ-यादरम्यान याच ठिकाणी रहाणार असल्यामुळे पोलीसांनी तातडीनं कारवाई करत या आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यांनी लावलेले बॅनर काढून टाकले. मात्र या वेळेत जे व्हायचे होते ते झालेच. हे फोटो आणि ट्रम्प यांचा हा निषेध सोशल मिडियाच्या माध्यमातून जगभर व्हायरल झाला आहे. दरम्यान विंडसर कॅसलमध्ये रहाणा-या ट्रम्प दाम्पत्याची ब्रिटनमध्ये शाही बडदास्त ठेवण्यात येणार आहे. येथे त्यांचे स्वागत राजा चार्ल्स तिसरे आणि राणी कॅमिला यांनी केले. दौ-याच्या दुस-या दिवशी ट्रम्प ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्याबरोबर स्टारमर यांच्या कंट्री रेसिडेन्स या निवासस्थानी भेट घेतील. या भेटीतून दोन्ही देशातील आर्थिक संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा आहे. (Donald Trump)

ब्रिटनमध्ये गेल्यावर ट्रम्प यांनीही आर्थिक सक्षमीकरण करणार असल्याचे सांगत किंग चार्ल्सचे कौतुक केले. किंग जॉर्ज हे आपले जुने मित्र आहेत आणि त्यांना राजा म्हणून पाहणे हा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले. विंडसर कॅसलच्या पूर्व लॉन आणि लंडनच्या टॉवरमधून ट्रम्प दाम्पत्याला शाही सलामी देण्यात आली. त्यानंतर ट्रम्प दाम्पत्य, राजा चार्ल्स आणि राणी कॅमिला आणि वेल्सचे राजकुमार आणि राजकुमारी यांच्यासह, विंडसर इस्टेटमधून किल्ल्याकडे जाणाऱ्या पारंपारिक सोन्याने सजवलेल्या गाडीच्या मिरवणुकीत सामील झाले. यापूर्वी 2019 मध्ये ट्रम्प यांनी ब्रिटनला भेट दिली होती, त्यावेळी त्यांचे दिवंगत राणी एलिझाबेथ यांनी स्वागत केले होते. मात्र यावेळी ट्रम्प यांचा हा दौरा ब्रिटनसाठी अडचणीचा ठरत आहे. या दौ-यापूर्वीच ब्रिटिश पंतप्रधान स्टारमर यांनी वॉशिंग्टनमधील ब्रिटिश राजदूताला बडतर्फ केले आहे. (International News)

========

Donald Trump : महासत्ता मंदीच्या उंबरठ्यावर !

========

राजदूत आणि एपस्टाईन यांच्यातील जवळच्या संबंधांच्या बातम्या आल्यानंतर स्टारमर यांनी ही कारवाई केली. याच एपस्टाईनचा जवळचा मित्र म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख होतो. अल्पवयीन मुलांवरील लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली खटला सुरू होण्यापूर्वी 2019 मध्ये एपस्टाईन तुरुंगात गुढ मृत्यू झाला. तेव्हापासून या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव प्रामुख्यानं घेतले जात आहे. एपस्टाईनच्या कथित संबंधांबद्दलचा वाद अमेरिकेच्या राजकारणात बराच काळ चर्चेचा विषय आहे. ट्रम्प कायम एपस्टाईन या आपल्या जुन्या मित्राच्या वादापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे विरोधक एपस्टाईन फाईल, खुली करण्यासाठी आग्रही आहेत. आता हिच मागणी त्यांच्या ब्रिटन दौ-यातही झाल्यामुळे एपस्टाईन फाईल, ट्रम्प यांचा सहजासहजी पाठलाग सोडणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. (Donald Trump)

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Thailand
आंतरराष्ट्रीय

Thailand : मिस युनिव्हर्सपूर्वीच मिस मेक्सिकोचा स्वतंत्र बाणा !

मिस युनिव्हर्स स्पर्धा २१ नोव्हेंबर रोजी थायलंडमध्ये होणार आहे. २०२५ च्या मिस...

America
आंतरराष्ट्रीय

America : ट्रम्पसाठी पुढचे वर्ष धोक्याचे !

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सिंहासनाला हादरा देणा-या घटना एकाच दिवशी घडल्या...

Johran Mamdani
आंतरराष्ट्रीयगाजावाजा

Johran Mamdani : ममदानींचा मागचा चेहरा…रामा दुवाजी !

न्यू यॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी यांच्या विजयामागे असलेला खरा चेहरा त्यांच्या...

Iran
आंतरराष्ट्रीय

Iran : या देशात काही दिवसांचाच पाणीसाठा !

इराण हा देश त्याची समृद्ध संस्कृती, हस्तकला, ​​ऐतिहासिक वास्तुकला, हाताने विणलेले पर्शियन...