Home मनोरंजन लग्नाच्या पाच वर्षानंतर मोडणार या दाक्षिणात्य अभिनेत्याचा संसार, पत्नीवर लावले गंभीर आरोप
मनोरंजन

लग्नाच्या पाच वर्षानंतर मोडणार या दाक्षिणात्य अभिनेत्याचा संसार, पत्नीवर लावले गंभीर आरोप

4
Entertainment
Entertainment

Entertainment : दिवंगत अभिनेता डॉ. राजकुमार यांचा नातू आणि अभिनेते राघवेंद्र राजकुमार यांचा मुलगा युवा राजकुमार याच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या उद्भवल्या आहेत. अभिनेता लग्नाच्या पाच वर्षानंतर आपली पत्नी श्रीदेवी बायरप्पासोबत घटस्फोट घेणार आहे. गेल्या एक वर्षापासून कपलच्या आयुष्यात वाद सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, युवा राजकुमार आणि श्रीदेवी यांच्या परिवाराने दोघांमधील वाद मिटण्याचा खूप प्रयत्न केला. पण अद्याप दोघांमधील वादाची स्थिती मिटलेली नाही. अशातच युवा राजकुमारने घटस्फोटाचा अर्ज केला आहे. यावर श्रीदेवीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

वर्ष 2019 मध्ये लग्न केल्यानंतर राजकुमार आणि श्रीदेवी यांच्यामध्ये दीर्घकाळापासून वाद सुरु झाले होते. तरीही युवा सिनेमाच्या मुहूर्त कार्यक्रमावेळी दोघांना एकत्रित स्पॉट करण्यात आले होते. पण सिनेमा प्रदर्शित होण्यादरम्यान श्रीदेवी दिसली नाही.

पत्नीवर लावले गंभीर आरोप
युवा राजकुमारने घटस्फोटासाठी अर्ज करत पत्नीवर काही गंभीर आरोप लावले आहेत. युवा राजकुमारने म्हटले की, माझे नाते आता संपले आहेत. खरंतर, पत्नीने टॉर्चर केल्याच आरोप लावला आहे. पण सत्य काय आहे हे कोणालाच माहिती नाही. (Entertainment)

वडिलांच्या विरोधात जाऊन केला होता विवाह
अभिनेता आणि श्रीदेवी बायरप्पा यांनी वडिलांच्या विरोधा जाऊन विवाह केला होता. या दोघांना दिवगंत अभिनेते पुनीत राजकुमार यांनी सपोर्ट केला होता. आता लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांमध्ये फूट पडली असून एकमेकांपासून विभक्त होण्याचा आता निर्णय घेतला आहे.


आणखी वाचा :
‘ह्या’ अभिनेत्रीचा अमिताभ बच्चनसोबत बॉलिवूड डेब्यू फ्लॉप, आता आहे TV वरील सर्वाधिक महागडी अभिनेत्री
शाहरुख खानसोबत काम करायला घाबरतो अनुराग कश्यप? मुलाखतीत सांगितले यामागील कारण

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...