Home मनोरंजन प्रेग्नेंसीमुळे या अभिनेत्रीला शो मधून केले होते बाहेर
मनोरंजन

प्रेग्नेंसीमुळे या अभिनेत्रीला शो मधून केले होते बाहेर

11
Entertainment
Entertainment

Entertainment : अभिनयासह सूत्रसंचालन करण्याचे काम आव्हानात्मक असते. आतापर्यंत अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयासह सूत्रसंचालनाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. यापैकीच एक म्हणजे मिनी माथुर आहे. मिनी माथुर एकेकाळी प्रसिद्ध सूत्रसंचालक म्हणून ओखळली जायची. तिने सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलच्या सहाव्या सीझनचे सू्त्रसंचालन केले होते. पण एकेदिवशी तिला अचानक शो मधून बाहेर काढण्यात आले होते.

मिनी माथुरला इंडियन आयडॉलच्या माध्यमातून एक वेगळी ओखळ मिळाली. पण अचानक मिनी माथुर शो मधून गायब झाली. नुकत्याच काही काळाआधी मिनीने इंडियन आयडॉल का सोडले होते याचा खुलासा केला आहे.

या कारणास्तव शो मधून काढले
मिनीने म्हटले की, खूप वर्ष शोसाठी काम केल्यानंतरही प्रेग्नेंसीमुळे शो मधून बाहेर काढण्यात आले. हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मिनीने म्हटले की, ज्यावेळी मी प्रेग्नेंट होती तेव्हा मला अशा कारणास्तव बाहेर काढले ज्यामुळे मला फार वाईट वाटले. खरंतर इंडियन आयडॉलच्या प्रोड्युसरने मला म्हटले की, प्रेग्नेंट महिलांना पाहणे प्रेक्षकांना आवडत नाही. याचेच फार वाईट वाटले होते.

मिनीने आताच्या आणि आधीच्या शो मध्ये केली तुलना
मिनी माथुरने आताच्या इंडियन आयडॉल आणि आताच्या शो मध्ये तुलना केली आहे. तिने म्हटलेय की, आता मेकर्स होस्टमधील कौशल्य पाहतात. आता असे वाटते की, सूत्रसंचालन करण्याचे कौशल्य तुमच्यात असणे गरेजेचे नाही. कारण सध्या सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्ती अथवा ज्यांचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत त्यांना घेतले जातेय. याशिवाय टेलिप्रॉम्पटरच्या माध्यमातून त्यांना सूत्रसंचालन करायला लावले जाते. (Entertainment)

पण याधीचे सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्ती दिखाव्यासाठी नव्हे ते काम म्हणून करत होते. ते प्रेक्षकांची दिशाभूल करत नव्हते. त्यांच्यासोबत एक खास नाते तयार करायचे. सर्वकाही स्क्रिप्टेट नव्हते.


आणखी वाचा :
‘माहेरची साडी’ चित्रपटाच्या यशानंतर विजय कोंडके यांचा नवा चित्रपट भेटीला ‘लेक असावी तर अशी’ …
अभिनेता शरद पोंक्षे आणि त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे लवकरच घेऊन येणार नवीन चित्रपट…
‘मायलेक’मध्ये उमेश कामत साकारणार महत्वपूर्ण भूमिका !

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...