Home मनोरंजन घटस्फोटांच्या अफवांवर पहिल्यांच बोलला अभिषेक बच्चन, म्हणाला…
मनोरंजन

घटस्फोटांच्या अफवांवर पहिल्यांच बोलला अभिषेक बच्चन, म्हणाला…

10
Abhishek Bachchan

Entertainment : बॉलिवूडमधील अभिनेता अभिषेक बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या राय बच्चन इंडस्ट्रीमधील सध्या चर्चेत असणारे कपल आहेत. या दोघांमध्ये गेल्या काही काळापासून धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. खरंतर, दोघांचा घटस्फोट होणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चन परिवारासोबत न येता लेकीसोबत आल्यानेही अभिषेक सोबतच्या नात्याबद्दलच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या. एवढेट नव्हे अभिषेकने सोशल मीडियावर ग्रे डिव्होर्स संदर्भातील एक पोस्ट देखील लाइक केली होती. यामुळे दोघांमध्ये दुरावा वाढल्याच्या चर्चांना अधिक हवा मिळाली. यावरच आता अभिषेक बच्चनने मौन सोडले आहे.

काय म्हणाला अभिषेक बच्चन?
नुकत्याच एका मुलाखतीत अभिषेक बच्चनला ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटासंदर्भात प्रश्न विचारला. यावर अभिषेकने त्याच्या बोटातील अंगठी दाखवत म्हटले की, मी अद्याप विवाहित आहे. याशिवाय अफवांवर प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. तुम्ही सत्यापासून दूरवर आहात. अत्यंत वाईट वाटते की, काही गोष्टी वाढवून-चढवून सांगितल्या आहेत. खरंतर, मी आजही विवाहाच्या नात्यात अडकलो आहे. माझ्याकडे यावर अजून काही बोलण्यासारखे नाही. (Entertainment)

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या अफवा
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायमध्ये घटस्फोटाच्या अफवा दीर्घकाळापासून इंडस्ट्रीमध्ये रंगल्या आहेत. दोघांनी खूप काळ उलटला तरीही एकत्रित पाहिलेले नाही. अभिषेक बच्चनने इंस्टाग्रामवर घटस्फोटासंदर्भातील पोस्टही लाइक केली होती. यामुळे अधिकच घटस्फोच्या चर्चांना उधाण आले. दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्याने घटस्फोटाच्या पोस्टसंदर्भात अद्याप उघडपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसऱ्या बाजूला काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या एकत्रित राहत नाही असे सांगितले जाते. या दोघांनी वर्ष 2007 मध्ये लग्न केले होते. यानंतर वर्ष 2011 मध्ये लेक आराध्याला जन्म दिला होता.


आणखी वाचा :
आर्यन खाननंतर आता अब्राहमचे सिनेमातून पदार्पण
जान्हवीने केला वर्षा उसगांवकरांचा अपमान

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...