Home राजकारण ठाकरेंचे मेहुणे अडचणीत, श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची कारवाई
राजकारणराज्य

ठाकरेंचे मेहुणे अडचणीत, श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची कारवाई

10
क्षीधर पाटणकर

ईडीने (ED) मंगळवारी राज्यात मोठी कारवाई केली आहे. यावेळी तपास यंत्रणा कोणत्याही मंत्र्यावर नाही तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरात घुसली आहे. ईडीने मंगळवारी मनी लाँड्रिंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर कारवाई केली. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे ११ फ्लॅट सील करण्यात आले आहेत.

या मालमत्तांची एकूण किंमत ६ कोटी ४५ लाख आहे. आता ईडी श्रीधर पाटणकर यांना चौकशीसाठी बोलावू शकते. हे ११ फ्लॅट श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीच्या बांधकाम प्रकल्पाशी संबंधित आहेत.

श्रीधर पाटणकर यांच्या नीलांबरी प्रकल्पाशी संबंधित या सदनिकांना सील ठोकण्याची कारवाई हा महाविकास आघाडी सरकारला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. ही कारवाई थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर असल्याने भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

====

हे देखील वाचा: माविआचे २५ आमदार भाजपच्या संपर्कात, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या दाव्याला राऊतांनी दिले चोख प्रत्युत्तर

====

अखेर ही कारवाई ईडीकडून का समोर आली? श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित प्रकरण काय आहे? मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यांवर काय आरोप आहेत? मनी लाँड्रिंगशी संबंधित असा काय घोटाळा आहे की ११ फ्लॅट लगेच सील केले गेले? या सर्व गोष्टी सविस्तर जाणून घेऊया.

ईडीने ठाण्यातील निलांबरी अपार्टमेंट्स येथील ११ फ्लॅट जप्त केल्या. या सदनिका श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. ईडीचे म्हणने असे की, जप्त करण्यात आलेल्या सदनिकांची किंमत सुमारे ६ कोटी कोटी रुपयांच्या घरात आहेत.

या प्रकरणात ईडीकडून पहिला गुन्हा ६ मार्च २०१७ रोजी PMLA कायद्याअंतर्गत नोंदविण्यात आला होता. हा गुन्हा मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित होता. या प्रकरणात या आधाही ईडीने पुष्पक बुलियनची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. आता पुन्हा कारवाई करत आणखी काही संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

आरोप आहे की, श्री साईबाबा गृहनिर्मीती समिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून ३० कोटी रुपयांचे असुरक्षीत कर्ज घेण्यात आले. हे कर्ज नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून घेण्यात आले. हा चतुर्वेदी हा इसम एक एंट्री ऑपरेटर असल्याचे सांगितले जात आहे.

====

हे देखील वाचा: ‘एमआयएम’ ची काडी : भाजपाची कुरघोडी आणि शिवसेनेची कोंडी

====

या ऑपरेटर्सच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातूनच पाटणकर यांनी ठाण्यात ११ फॅल्ट खरेदी केल्याचा आरोप आहे. मनी लॉन्ड्रींगमधील पैसा हा या सदनिका खरेदी करण्यासाठी वापरण्यात आला असावा असा संशय ईडीला आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Pune Jain Boarding House
राजकारण

Pune Jain Boarding House : मोहोळ, धंगेकर, शेट्टी कोणाचे काय स्टेक्स?

राजकारण हे बहुतेक एकमेव असं क्षेत्र असावं जिथं कोणाची फिल्डिंग लागते आणि...

Nobel Peace Prize
आंतरराष्ट्रीयराजकारण

Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?

जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरास्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’. विविध क्षेत्रात भरीव...

Rakesh Kishore
राजकारण

Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?

सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने...

Maithili Thakur
मनोरंजनराजकारण

Maithili Thakur : लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर उतरणार राजकीय आखाड्यात?

राजकारण आणि मनोरंजन हे जरी दोन वेगळे क्षेत्र असले तरी मधल्या काही...