Home सामाजिक Ashtavinayak : अष्टविनायकसह ‘या’ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू
सामाजिक

Ashtavinayak : अष्टविनायकसह ‘या’ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू

10
Ashtavinayak

आपण जर पाहिले तर आपल्या देशामध्ये शाळांसोबतच अनेक ऑफिसेसमध्ये, मोठं मोठ्या दुकानांमध्ये विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट ड्रेसकोड असतो. दररोज त्यांना तोच ड्रेस घालून शाळेत किंवा कामावर जावे लागते. मात्र मधल्या काही काळापासून आपल्या देशातील अनेक मंदिरांमध्ये देखील ड्रेसकोड लागू करण्यात आले आहे. अर्थात या मंदिरांमध्ये जाण्यासाठी भाविकांना विशिष्ट प्रकारचे कपडे घालणे बंधनकारक असणार आहे. (Ashtavinayak)

अर्थात या काही मंदिरांमध्ये भाविकांना पूर्णपणे भारतीय वेशभूषा असेल तरच प्रवेश मिळणार आहे. वेस्टर्न ड्रेस किंवा छोटे कपडे असतील तर अशा लोकांना मंदिरात प्रवेश नाकारला जाणार आहे. भारतातील अनेक मंदिरांमध्ये आजवर असे ड्रेसकोड लागू करण्यात आले आहे. मात्र आता याच मंदिरांच्या यादीमध्ये अजून प्रसिद्ध आणि महत्वाच्या मंदिरांची भर पडली आहे. हो…महाराष्ट्रातील गणपतीची मंदिरं जगभरात प्रसिद्ध आहे. याच महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक गणेशाची मंदिरं खूपच प्रसिद्ध आहे. याच अष्टविनायक मंदिरांमधील काही मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. (Marathi Top NEws)

अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडचा मोरया गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी पोशाखाची नियमावली जाहीर करण्यात आलीये. हे पाचही देवस्थान चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारित येतात. त्यामुळे चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून वस्त्रसंहितेचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जर तुम्ही अष्टविनायकाची यात्रा करणार असाल तर नक्की ही नियमावली आधी वाचा आणि मगच दर्शनाला जा. (Social News)

Ashtavinayak

चिंचवड देवस्थान ट्रस्टने काढलेल्या पत्रात नक्की काय लिहिले पाहूया.

“संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे आणि श्री मंगलमूर्ती वाडा येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनम्र विनंती करण्यात येत आहे. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे व श्री मंगलमूर्ती वाडा या केवळ वास्तू नसून, ते अधा, संस्कृती आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखावा आणि भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे. (Marathi Latest NEws)

===========

हेही वाचा :  Akshaya Tritiya : वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय्य तृतीया

===========

आपली उपस्थिती आणि वर्तन मंदिराच्या शुद्धतेला अनुसरून असावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मंदिराच्या पवित्रतेचा सन्मान राखण्यासाठी, चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे वस्त्रसंहिता लागू करण्यात येत आहे. श्रींच्या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी मंदिरात प्रवेशासाठी खालीलप्रमाणे योग्य पोशाख परिधान करावा”, असे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या पत्रकात म्हटले आहे. (Marathi Trending News)

मंदिर प्रवेशासाठी पोशाखाची नियमावली 

  • पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा. शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा.
  • महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे.
  • कोणीही अत्याधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीर प्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये.

Recent Posts

Related Articles

Devark Mandir
सामाजिक

Devark Mandir : या सूर्यमंदिरापुढे औरंगजेबानंही मानली हार !

देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे...

Uttarakhand
सामाजिक

Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिव्यांच्या या सणाला प्रत्येक घरासमोर दिव्यांची...

Varanasi
सामाजिक

Varanasi : देव दिवाळीचे महत्त्व !

दरवर्षी दिवाळीनंतर १५ दिवसांनी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. भगवान...

Mathura
सामाजिक

Mathura : तब्बल ५४ वर्षांनी मथुरेतील बांके बिहारी मंदिरातील खजिना उघड

भारतातील मंदिरं कायम त्यांच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांसाठी, त्यांच्या अभूतपूर्व बांधकामासाठी, इतर अनेक कारणांसाठी...