Home प्रेस रिलीझ सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘या’ मुलाची सत्यता माहिती आहे का तुम्हाला?
प्रेस रिलीझ

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ‘या’ मुलाची सत्यता माहिती आहे का तुम्हाला?

10
Atlee Kumar

बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा टीझर काही दिवसापुर्वी रिलीज झाला आहे. ज्यामध्ये त्याचा भयानक लूक पाहून तुम्ही थक्क व्हाल कारण त्याची इमेज रोमँटिक हिरोची आहे पण या चित्रपटात त्याचा वेगळा लूक देण्यात आला आहे. शाहरुखसाठी अशाच एका पात्राची निवड शाहरुखच्या जवान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या अटली कुमार (Atlee Kumar) यांनी केली आहे. आता अनेकांच्या मनात एक प्रश्न असेल की कोण आहे अटली कुमार, तर मग आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगतो.

अटली कुमार यांचा जन्म 21 सप्टेंबर 1986 रोजी मदुरे, तामिळनाडू येथे झाला, त्यांचे खरे नाव अरुण कुमार आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, 2013 मध्ये, त्याने राजा-राणी या दक्षिणेकडील चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला ज्याने 4 आठवड्यांत सुमारे 500 दशलक्षचा व्यवसाय केला.

खूप वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत होता, त्या मुलाचा रंग खूप गडद होता, त्याच्यासोबत एक सुंदर मुलगी दिसली होती. हे जोडपे लोकांच्या चेष्टेचा विषयही बनले होते, पण त्या सुंदर मुली सोबत दिसणार मुलगा याला बरचं ट्रोल करण्यात आलं. पण अनेकांनी त्यांचे कौतुकही केले होते.

या व्हारल होणाऱ्या फोटोमागे त्या मुलाची सत्यता कोणालाच माहिती नव्हती. मुलगी ऐवढी सुंदर मुलगा ऐवढा गडद यांमुळे सोशल मीडियावर त्याला भन्नाट ट्रोल करण्यात आलं. पण फोटोत दिसणार्‍या मुलाचे वास्तव नंतर उघड झाल्यानंतर अनेकांची तोंड बंद झाली. हाच मुलगा दक्षिण भारतीय सिनेमाचा यशस्वी दिग्दर्शक ठरला. एटली कुमार यांनी दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस शंकर यांना 5 वर्षे सहाय्य केले आणि 2012 साली थ्री इडियट्स चित्रपटाचा साऊथ रिमेकही बनवला.

Photo Credit – Twitter

====

हे देखील वाचा: मणिरत्नमचे हे सर्वोत्कृष्ट चित्रपट तुम्ही पाहिले नसतील तर काय पाहिले, पाहा OTT वर

====

एटली कुमार यांनी नंतर त्यांची निर्मिती सुरू केली आणि फॉक्स स्टार स्टुडिओच्या सहकार्याने सांगिली बुंगीली काधवा थोरे हा चित्रपट बनवला जो हिट ठरला. जर एटली कुमारच्या नात्याबद्दल बोलायचे झाले तर, 8 वर्षांच्या दीर्घ नात्यानंतर त्यांनी प्रिया कृष्णासोबत लग्न केले.

2014 मध्ये दोघांनी चेन्नईमध्ये लग्न केले ज्यामध्ये साऊथचे अनेक बडे स्टार्स उपस्थित होते. कृष्णा प्रिया ही एक अभिनेत्री आहे जी अनेक साऊथ चित्रपटांमध्ये दिसली आहे. आता एटली कुमार पहिल्यांदाच शाहरुख खान दिग्दर्शित करत आहेत आणि त्याचा जवान हा चित्रपट 2 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त मल्याळम, तेलुगु, तामिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...