Home लाईफ स्टाईल Diwali 2025: यंदा लक्ष्मीपूजन कधी? वाचा पूजा-विधीसह शुभ मुहूर्त
लाईफ स्टाईल

Diwali 2025: यंदा लक्ष्मीपूजन कधी? वाचा पूजा-विधीसह शुभ मुहूर्त

12
laxmi pooja
laxmi pooja

Diwali 2025: दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन  संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जाणारा दिवस. या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घरात स्वच्छता, प्रकाश आणि श्रद्धा असते, तिथे ती स्थायिक होते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येक घरात लक्ष्मीपूजन अत्यंत भक्तिभावाने केलं जातं. पण देवी लक्ष्मी प्रसन्न व्हावी, यासाठी पूजेची योग्य पद्धत आणि शुभ वेळ जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

शुभ मुहूर्त 2025 लक्ष्मीपूजन हिंदू पंचांगानुसार लक्ष्मीपूजन 2025 मध्ये अमावस्येचा दिवस म्हणजेच 21 ऑक्टोबर 2025 (मंगळवार) रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रदोष काल ६.३० ते ८.३० लक्ष्मीपूजन करण्याचा सर्वात शुभ काळ मानला जातो. या वेळी देवी लक्ष्मीला पृथ्वीवर येण्याचा कालावधी मानला जातो, त्यामुळे या वेळेत पूजा केल्यास धनलाभ आणि सौभाग्य वाढतं, असं ज्योतिष शास्त्र सांगतं. (Diwali 2025)

Diwali 2025
Diwali Laxmi Pooja

पूजेची तयारी स्वच्छता आणि पवित्रतेचं महत्त्व

लक्ष्मीपूजनापूर्वी संपूर्ण घर स्वच्छ करून, पूजा घर आणि प्रवेशद्वार नीट सजवणं आवश्यक आहे. दरवाजावर सुंदर तोरण आणि रांगोळी करा, कारण असा विश्वास आहे की लक्ष्मी ज्या घरात प्रवेश करते, तेथे स्वच्छता आणि सौंदर्य असतं.घरात सुगंधी धूप, फुलं आणि मातीचे दिवे लावा. लक्ष्मी देवीला आवडणाऱ्या लाल आणि गुलाबी रंगाचे फुलं वापरा. घरात उजेड आणि आनंदाचं वातावरण तयार करा कारण अंधार, राग आणि नकारात्मकता जिथे असते तिथे लक्ष्मी स्थायिक होत नाही. लक्ष्मीपूजनाची पद्धत विधी आणि मंत्र पूजा घरात देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि कुबेर यांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवा. प्रथम गणपतीची पूजा करा, कारण तो विघ्नहर्ता आहे. त्यानंतर देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करा. देवीला कमळाचं फूल, फळं, मिठाई, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करा. मंत्र पठण करताना खालील श्लोक म्हणावा ॐ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः त्यानंतर लक्ष्मी आणि कुबेर यांना नवधान्य, नाणी आणि तांदुळ अर्पण करा. काहीजण या दिवशी नवीन खातेपुस्तकांची पूजा करून व्यावसायिक वर्षाची सुरुवात करतात. (Diwali 2025)

===================

हे देखील वाचा:

Diwali 2025: दिवाळीचे ५ दिवस प्रत्येक दिवस सांगतो शुभत्व, प्रेम आणि नव्या सुरुवातीचा अर्थ!                                    

The Mystery of Dhanatrayodashi: धनत्रयोदशीचा रहस्य समुद्र मंथनातून प्रकटले भगवान धन्वंतरि, जाणून घ्या या पौराणिक कथेमागचं महत्त्व!                                    

Dhanteras : धनत्रयोदशीला धन्वंतरी पूजन का केले जाते?                                    

=================

देवीला प्रसन्न ठेवण्यासाठी काय करावं आणि काय टाळावं (Diwali 2025)

-या दिवशी कर्ज घेणं किंवा देणं टाळा.
– घरात वादविवाद किंवा नकारात्मक बोलणं टाळा.
– शक्यतो नवीन वस्तू, सोनं-चांदी किंवा भांडी खरेदी करा.
– लक्ष्मीपूजनानंतर दिवे रात्रभर लावलेले ठेवा याचा अर्थ देवी लक्ष्मीचा सतत वास्तव्य असावा असा मानला जातो.

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....