Home गाजावाजा स्पेशल यंदा दिवाळी 11 की 12 नोव्हेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त
गाजावाजा स्पेशल

यंदा दिवाळी 11 की 12 नोव्हेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त

7
Diwali 2023
Diwali 2023

हिंदू धर्मात दिवाळीचा सण हा महत्त्वपूर्ण सणांपैकी एक आहे. प्रत्येक वर्षाच्या कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दीपोत्सव म्हणजेच दीवाळी, दीपावलीचा सण साजरा केला जातो. हा सण सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. दिवाळीच्या वेळी धनाची देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवी लक्ष्मी आणि सुख-समृद्धिचा दाता गणपती याची पूजा केली जाते. (Diwali 2023)

अशी मान्यत आहे की, या दिवशी भवगान श्रीराम यांनी लंकापती रावण याचा पराभव करत अयोध्येत परतले होते. 14 वर्षानंतर त्यांचा वनवास पूर्ण करून राम पुन्हा अयोध्येत आले होते. तेव्हा संपूर्ण अयोध्येत दिव्यांची रोषणाई केली गेली होती. त्याचवेळ पासून संपूर्ण देशात दिवाळीचा सण साजरा केला जातो. हा सण पाच दिवस साजरा केला जातो. यंदाची दिवाळी कधी साजरी केली जाईल आणि त्याचा शुभ मुहूर्त नक्की काय आहे हे पाहूयात.

दिवाळी कधी आहे?
दिवाळी कार्तिक महिन्याच्या अमावस्या तिथीला साजरी केली जाते. यंदा अमावस्या तिथी 12 नोव्हेंबरला दुपारी 02 वाजून 44 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर 13 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजून 56 मिनिटांनी संपणार आहे. दिवाळीच्या दिवशी धनाची देवता देवी लक्ष्मी पूजन करणे फार महत्त्वाचे मानले जाते. यामुळे दिवाळीचा सण 12 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे.

दिवाळी गणेश-लक्ष्मी पूजन मुहूर्त
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी सुरु होऊन रात्री 7 वाजून 36 मिनिटांपर्यंतच आहे. लक्ष्मी पूजनासाठी महानिशीथ काळ मुहूर्त रात्री 11 वाजून 39 मिनिटांनी ते मध्यरात्री 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहणार आहे. अशी मान्यता आहे की, शुभ मुहूर्तावर गणेश-लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धीचे आगमन होते. (Diwali 2023)

दिवाळी कॅलेंन्डर 2023
-दिवाळीच्या पाच दिवसाच्या सणाची सुरुवात धनतेरस पासून होते. यंदा धनतेरस 10 नोव्हेंबरला आहे
-धनतेरसच्या दुसऱ्याच दिवशी छोटी दिवाली किंवा नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा छोटी दिवाली 11 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे
-दिवाळी यंदा 12 नोव्हेंबरला आहे
-सर्वसामान्यपणे दिवाळीच्या पुढच्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. गोवर्धन पुजा कार्तिक महिन्यातील प्रतिपदा तिथीला होते. त्यामुळे ही पूजा 14 नोव्हेंबरला आहे. याच दिवशी दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा सुद्धा आहे.
-तर 15 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार आहे


हेही वाचा- अखेर अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होणार

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....