Home लाईफ स्टाईल Digital Arrest म्हणजे काय? ऑनलाइन फसवणुकीचा नवा पॅटर्न, असे ठेवा स्वत:ला सुरक्षित
लाईफ स्टाईल

Digital Arrest म्हणजे काय? ऑनलाइन फसवणुकीचा नवा पॅटर्न, असे ठेवा स्वत:ला सुरक्षित

8
Digital Arrest

Digital Arrest: गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल अरेस्ट हा शब्द वारंवार ऐकू येतोय. सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये किंवा अगदी व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेसमध्ये लोक सांगताना दिसतात की त्यांना पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचं सांगणाऱ्या लोकांकडून धमक्या आल्या आणि काहींना तर फोनवरूनच अटक केली गेल्याचं भासवलं गेलं! पण नेमकं हे डिजिटल अरेस्ट म्हणजे काय आणि यापासून कसं वाचायचं? चला, जाणून घेऊया या नवीन ऑनलाइन फसवणुकीचा संपूर्ण खेळ.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?

डिजिटल अरेस्ट म्हणजे प्रत्यक्ष अटक नव्हे, तर सायबर क्रिमिनल्सकडून बनावट कायदेशीर कारवाईचं भय निर्माण करून पैसे उकळण्याची फसवणूक. या स्कॅममध्ये फसवणूक करणारे स्वतःला पोलीस अधिकारी, सायबर सेल अधिकारी, किंवा कोणत्या तरी सरकारी एजन्सीचे प्रतिनिधी म्हणून सादर करतात. ते पीडित व्यक्तीला सांगतात की तिचं एखादं पार्सल, खाते किंवा डॉक्युमेंट गुन्ह्यात वापरलं गेलंय,आणि तपास सुरू आहे. यानंतर व्हिडिओ कॉलवर ऑफिस दाखवून, बनावट ओळखपत्रं दाखवून आणि कायदेशीर भाषेत बोलून लोकांना घाबरवतात. काही वेळा तुमच्यावर FIR दाखल होणार आहे  असं सांगून ऑनलाइन जामीन किंवा क्लिअरन्स फी  म्हणून पैसे मागतात. या भीतीत लोक पैसे ट्रान्सफर करून फसवले जातात. (Digital Arrest)

Digital Arrest
Digital Arrest

कशी चालते ही फसवणूक?

सायबर गुन्हेगार सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर, ईमेल किंवा सोशल मीडिया आयडी  मिळवतात. नंतर फोन करून सांगतात की, तुमचं पार्सल ड्रग्जसह पकडलं गेलं आहे किंवा तुमचं बँक खाते मनी लाँडरिंगमध्ये वापरलं गेलंय. यानंतर ते व्हिडिओ कॉलवर बनावट पोलिस स्टेशन किंवा कोर्टाचं वातावरण दाखवतात. काही वेळा तुमचा केस दिल्ली पोलिसांकडे गेला आहे असं सांगतात आणि तुम्हाला कॉलवरच थांबून तपास सहकार्य करण्यास सांगतात. हीच वेळ असते जिथं व्यक्ती भीतीपोटी गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकते. (Digital Arrest)

======================

हे देखील वाचा:

Unique village: संध्याकाळनंतर रडण्यास बंदी! कोकणातील या गावात आजही जपली जाते अनोखी प्रथा                                    

Rama Ekadashi 2025 : १७ ऑक्टोबरला साजरी होणारी पवित्र एकादशी! जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त, कथा आणि उपाय                                    

Office Rangoli Designs: ऑफिसमध्ये रंगोली स्पर्धा? काही मिनिटांत तयार करा हे सोपे आणि सुंदर डिझाईन्स!                                    

===================

 

कायदा सांगतो पोलिस कधीच ऑनलाइन अटक करत नाहीत भारतामध्ये कोणत्याही प्रकारचं अटक आदेश किंवा चौकशी नोटिस केवळ अधिकृतरित्या दिली जाते. कोणतीही सरकारी संस्था, पोलिस विभाग किंवा न्यायालय फोनवर, ईमेलवर किंवा व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीत. त्यामुळे अशा कॉल्सवर घाबरू नका, आणि त्यांना वैयक्तिक माहिती, OTP, बँक डिटेल्स किंवा पैसे कधीच देऊ नका.जर कोणी स्वतःला अधिकारी म्हणून सादर करत असेल, तर त्यांचा ओळख क्रमांक मागा, अधिकृत पत्र मागा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधा. (Digital Arrest)

असे ठेवा स्वत:ला सुरक्षित

-अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सना लगेच विश्वास ठेवू नका.
-कोणीही सरकारी अधिकारी असल्याचं सांगत असेल, तर थेट सायबर हेल्पलाइन नंबर 1930 वर संपर्क करा.
-तुमची वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक, बँक तपशील किंवा OTP कोणालाही देऊ नका.
-व्हिडिओ कॉलवर चौकशी” ही फक्त फसवणुकीची पद्धत आहे  ती खऱ्या चौकशीसाठी वापरली जात नाही.

Latest Marathi News | News in Marathi |Live news Updates in Marathi on Trending Topics

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....