Home राजकारण महाड इमारत दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करा – माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण
राजकारणराज्य

महाड इमारत दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करा – माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण

7

महाड शहरानजीक पाच मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये राहणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाने तातडीची मदत जाहीर करावी त्याचबरोबर इमारत दुर्घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.

कोरोनाच्या संकटामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न चाललेला असतानाच या इमारत दुर्घटनेमुळे महाडवासीयांना मोठा धक्का बसला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या दुर्घटनेनंतर आमदार रविंद्र चव्हाण यांनी आपल्या पदाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क साधून घटनेबाबतची माहिती घेतली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन तातडीने मदत करण्याच्या सूचना रविंद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत.

महाड शहरानजीक असणाऱ्या तारिक गार्डन काजलपुरा कॉर्नर वरील कोसळलेल्या इमारतींबाबत माहिती घेताना या इमारतीला परवानगी देण्यात आली होती का ? अधिकृत आणि नियमांच्या अधीन राहून या इमारतीचे बांधकाम केले होते का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या दुर्घटनेची चौकशी करण्याची मागणी रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. इमारत दुर्घटनेबाबत रायगड जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करावी आणि या इमारत दुर्घटनेमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी शासनाकडे केली आहे.

त्याचबरोबर महाड येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाने तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Pune Jain Boarding House
राजकारण

Pune Jain Boarding House : मोहोळ, धंगेकर, शेट्टी कोणाचे काय स्टेक्स?

राजकारण हे बहुतेक एकमेव असं क्षेत्र असावं जिथं कोणाची फिल्डिंग लागते आणि...

Nobel Peace Prize
आंतरराष्ट्रीयराजकारण

Nobel Peace Prize : ट्रम्प तात्यांचे नोबेल मिळवण्याचे स्वप्नभंग करणाऱ्या मारिया कोरिना मचाडो आहेत तरी कोण?

जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरास्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ‘नोबेल पुरस्कार’. विविध क्षेत्रात भरीव...

Rakesh Kishore
राजकारण

Rakesh Kishore : सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा राकेश किशोर आहे तरी कोण?

सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने...

Maithili Thakur
मनोरंजनराजकारण

Maithili Thakur : लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर उतरणार राजकीय आखाड्यात?

राजकारण आणि मनोरंजन हे जरी दोन वेगळे क्षेत्र असले तरी मधल्या काही...