Home मनोरंजन OTT प्लॅटफॉर्मवरील दीपिका पादुकोणचे 4 ब्लॉकबस्टर सिनेमे
मनोरंजन

OTT प्लॅटफॉर्मवरील दीपिका पादुकोणचे 4 ब्लॉकबस्टर सिनेमे

10
Deepika Pandukone
Deepika Pandukone

Deepika Padukone Movies : दीपिका पादुकोण बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. याशिवाय दीपिकाची सिनेमातील भूमिका नेहमीच प्रेक्षकांवर आपली छाप पाडते. एवढेच नव्हे दीपिका पादुकोण सर्वाधिक महागड्या अभिनेत्रींपैकी देखील एक असल्याचे मानले जाते. 27 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या कल्कि 2898 एडी सिनेमामुळे सध्या दीपिका पादुकोण अधिक चर्चेत आहे. पण अभिनेत्री सिनेमागृहांसह ओटीटी प्लॅटफॉर्मवरही धूमाकुळ घालताना दिसून येत आहे. जाणून घेऊया दीपिका पादुकोणच्या अशा सिनेमांबद्दल जे ओटीटी प्लॅटफॉर्मवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.

फायटर
व्हेलेंटाइन डे च्या दिवशी प्रदर्शित झालेल्या फायटर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पादुकोण, संजीदा शेखर, अक्षय ओबेरॉय, करण सिंह ग्रोवर आणि अनिक कपूर असे स्टार झळकले होते. या सिनेमाची कथा वर्ष 2019 मध्ये पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला, बालाकोट एअर स्ट्राइक आणि भारत-पाकिस्तान सीमेजवळ झालेल्या झटापटीवर आधारित आहे. सिनेमात दीपिका पादुकोणने भारतीय वायूसैन्यातील कॅडेंटची भूमिका साकारली होती. हा सिनेमा तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवरील नेटफ्लिक्स येथे पाहता येईल.

रेस-2
वर्ष 2013 मध्ये सिनेमागृहांमध्ये रेस-2 सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमामध्ये दीपिकासोबत जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकला आहे. सिनेमा दीपिकाच्या ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक आहे. हा सिनेमा नेटफ्लिकवर पाहता येईल. (Deepika Padukone Movies)

लव्ह आज कल
वर्ष 2009 मध्ये दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा लव्ह आज कल सिनेमाला प्रेक्षकांनी पसंत केले होते. या सिनेमात सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत. याशिवाय ऋषी कपूर, राहुल खन्ना, डॉली अहवूवालिया यांचा समावेश होता. सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

राम लीला सिनेमा
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचा राम लीला सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. सिनेमा तुम्हाला अॅमेझॉन प्राइमवर पाहता येईल.


आणखी वाचा :
शाहरुखसोबत शूटिंग करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी घरातील मंडळींशी बोलणे केले होते बंद, वाचा किस्सा
गश्मीर महाजनीची ‘त्या’ कलाकारांवर सडकून टीका

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...