Home लाईफ स्टाईल एखादा महत्वाचा निर्णय घेताना तुम्ही गोंधळत असाल तर ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा
लाईफ स्टाईल

एखादा महत्वाचा निर्णय घेताना तुम्ही गोंधळत असाल तर ‘या’ गोष्टी जरुर लक्षात ठेवा

9
Decision Making Skill
Decision Making Skill

आयुष्यात निर्णय घेण्याची क्षमता असणे आपल्या पर्सनालिटी डेवलमेंटचा एक प्रमुख हिस्सा आहे. आपल्या आयुष्यात अनेक लहान-मोठे निर्णय घ्यावे लागतात. यामुळे काहीवेळेस आयुष्य बदलते किंवा त्याचा विपरित परिणाम ही होऊ शकतो. कारण विचार न करता घेतलेला निर्णय हा कधीकधी तुमच्यासाठी काही आव्हाने निर्माण करु शकतो. अशातच तुम्ही सुद्धा एखादा महत्व निर्णय घेताना गोंधळत असाल तर थांबा. पुढील काही गोष्टी एखादा निर्णय घेण्यापूर्वी जरुर लक्षात ठेवा. (Decision Making Skill)

निर्णयाची तुलना करा
जर तुम्ही एखादा महत्वपूर्ण घेत असाल तर त्याचे फायदे आणि नुकसान काय होणार याचा विचार करा. कोणत्याही निर्णयाच्या फायद्या आणि नुकसानीची तुलना केली तर तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईलच. पण तुमचा आत्मविश्वास ही वाढेल. या व्यतिरिक्त तुम्ही एका कागदावर आपले निर्णय लिहा.

-आपल्या निर्णयावर ठाम करा
जर एखादा निर्णय घेताना गोंधळाची स्थिती निर्माण होत असेल तर घाई करु नका. थोडं थांबा आणि शांत डोक्याने विचार करा. आपले लक्ष्य काय आहे ते पहा. अशाने तुम्हाला निर्णय घेणे सोप्पे होईलच. पण आपल्या निर्णयावर ही ठाम रहा. कोणीही भले काही बोलो तरीही तुम्हाला जे योग्य वाटते आणि तुम्ही जो विचार केला आहे त्यावर तुमचे मत फार महत्वाचे असणार आहे हे विसरु नका.

-बातचीत करा
असे करणे गरजेचे नाही की, आपण घेतलेला प्रत्येक निर्णय हा बरोबरच असेल. याचा काहीवेळेस लोकांवर ही परिणाम होऊ शकतो. समोरचा व्यक्ती दुखावला ही जाऊ शखते. त्यामुळे अगदी मोठा निर्णय असेल तर प्रथम तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि जरुर तुमच्या निर्णयावर इतरांशी बातचीत करुन तो योग्य आहे की नाही हे सुद्धा जाणून घ्या. (Decision Making Skill)

-प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात हे समजून घ्या
तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या दोन बाजू असतात हे प्रथम समजून घ्या. एखादा व्यक्ती तुम्हाला सल्ला देत आहे आणि तो जे बोलत आहे हे बरोबरच आहे असे धरुन चालू नका. तुम्ही त्याची मतं ऐकून घ्या. पण निर्णय घेताना दोन्ही बाजूंनी विचार करण्यास मात्र विसरु नका.

हे देखील वाचा- लिव्ह-इन-रिलेशनशिप की लग्न? तुमच्या एका निर्णयाने बदलेल आयुष्य

-स्वत:ला प्रश्न विचारा
जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता तेव्हा स्वत:ला विचारा की तुम्ही भावुक किंवा रागात हा निर्णय घेत आहात का? प्रत्येक बाजूने पूर्णपणे इमानदारीने स्वत:ला प्रश्न विचारा की, आपण घेत असलेला निर्णय खरंच बरोबर आहे का? जेव्हा तुम्ही तुमच्या निर्णयावर संतुष्ट असाल तरच तुमचा निर्णय समोरच्या व्यक्तीला सांगा.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....