Home गाजावाजा स्पेशल Datta Jayanti 2023 : दत्त जयंती साजरी करण्याचे महत्त्व, जाणून घ्या शुभ मुहूर्त
गाजावाजा स्पेशल

Datta Jayanti 2023 : दत्त जयंती साजरी करण्याचे महत्त्व, जाणून घ्या शुभ मुहूर्त

11
Datta Jayanti 2023
Datta Jayanti 2023

Datta Jayanti 2023 : प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा दत्त जयंती येत्या 26 डिसेंबर, 2023 रोजी साजरी केली जाणार आहे. दत्त हे ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या अंशाचा अवतार आहेत. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाल्याचे मानले जाते. दत्त जयंती निमित्त दत्त गुरूंची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात.

तर `श्रीपाद श्रीवल्लभ’ हा दत्ताचा पहिला अवतार आणि `श्री नृसिंह सरस्वती’ हा दुसरा अवतार आहे. तसेच `माणिकप्रभु’ तिसरे आणि `श्री स्वामी समर्थ महाराज’ हे चौथे अवतार आहे. दत्त गुरूंचे हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत.

दत्त जयंती शुभ मुहूर्त
पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 26 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 05.46 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 डिसेंबरला सकाळी 6.02 मिनिटांनी ती संपणार आहे.

पुजेचा शुभ मुहूर्त
सकाळचा मुहूर्त- सकाळी 9.46 ते दुपारी 12.21
दुपारचा मुहूर्त- दुपारी 12.21 ते दुपारी 01.39
संध्याकाळचा मुहूर्त रात्री 07.14 ते रात्री 08.56

पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, देवी पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती यांना आपल्या पतिव्रत धर्माचा खूप गर्व झाला होता. यामुळे नादर मुनींना या तिन्ही देवींचा गर्व मोडायचा होता. यासाठी नारद मुनींनी त्या तिघींच्या समोर माता अनसुया हिचे गुणगाण गाण्यास सुरुवात केली. माता अनसूयाचे हे गुणगाण तिन्ही देवींना सहन झाले नाही. यामुळे त्रिदेवांना माता अनसूयाचे पतिव्रता धर्म मोडण्यास सांगितले. जेव्हा त्रिदेव अनसूयाचे पतिव्रताधर्म मोडण्यास गेले असता त्यांच्या पायावर माता अनसूयाने पाणी शिंपडले. यामुळे तिन्ही देव बालवस्थेत आले. (Datta Jayanti 2023)

यानंतर तिन्ही देवींना आपली चुक कळली असता त्यांनी माता अनसूयाची माफी मागितली. यानंतर देवी लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांनी आपल्या अंशापासून एक नवा अंश तयार केला. त्याला दत्तात्रेय असे नाव दिले. अशाप्रकारे दत्तत्रेय यांचा जन्म झाला.

(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)


आणखी वाचा:
हिंदू धर्मात या पानांना मानले जाते पवित्र, देवाला अर्पण केल्याने मिळतो आशीर्वाद
काशी हे भारताचे नवे आर्थिक केंद्र
Vastu Tips For Home: घरात कुबेर यंत्र ठेवताय? या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा….

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....