Home मनोरंजन ‘दबंग गर्ल’ ने मिस्ट्री मॅनसोबत केला साखरपुडा?, सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चर्चांना उधाण
मनोरंजनसामाजिक

‘दबंग गर्ल’ ने मिस्ट्री मॅनसोबत केला साखरपुडा?, सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चर्चांना उधाण

6
Sonakshi Sinha engagement
Sonakshi Sinha engagement

मनोरंजनविश्वात एकामागोमाग एक सनई चौघड्यांचे सूर घुमत असून, अनेक कलाकार लग्नाच्या गाठी बांधताना दिसत आहे. आता या यादीमध्ये अजून एका मोठ्या अभिनेत्री नाव जोडले जाणार आहे. ही अभिनेत्री आहे दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha engagement). हो सोनाक्षीने साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. नुकतीच सोनाक्षी सिन्हाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यावरून सोनाक्षीने साखरपुडा केल्याचा अंदाज बांधला जात आहे.

मागील बऱ्याच काळापासून सोनाक्षी सिन्हाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक बातम्या येत होत्या. सोनाक्षी अमुक व्यक्तीला डेट करते, ती यावर्षी लग्न करणार आदी अनेक बातम्यांमुळे सोनाक्षीला (Sonakshi Sinha engagement) तुफान मीडिया अटेन्शन मिळाले. मात्र आता खुद्द सोनाक्षीने यावर अप्रत्यक्षरीत्या भाष्य करत तिच्या चाहत्यांना तिच्या नात्याबद्दल माहिती दिली आहे. सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तीन वेगवेगळे फोटो शेअर करत तिच्या साखरपुड्याबद्दल माहिती दिली आहे.

(courtsy instagram)

सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करताना दिसत असून, तिच्यासोबत तिचा जोडीदारही दिसत आहे. मात्र सोनाक्षीने तिच्या जोडीदाराचा चेहरा दाखवला नसल्याने त्याच्याबद्दल अजूनही सर्वांच्या मनात उत्सुकता दिसून येत आहे. सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने तिच्या जोडीदाराचा हात पकडल्याचे दिसत आहे. एका फोटोमध्ये तिने त्याच्या खांद्यावर मान ठेवल्याचे देखील दिसत आहे, मात्र कोणत्याही फोटोमधून तिच्या जोडीदाराबद्दल थोडी देखील हिंट मिळत नसल्याने सर्वांच्या मानत आता सोनाक्षी सिन्हाचा (Sonakshi Sinha engagement) जोडीदार नक्की कोण असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यावरून नक्कीच अंदाज लावला जाऊ शकतो की सिन्हा कुटुंबात लवकरच लग्नाची लगबग दिसून येणार आहे.

======

हे देखील वाचा- अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

======

सोनाक्षीने हे फोटो आणि गुड न्युज शेअर करताना कॅप्शनमध्ये तिचा आनंद आणि उत्सुकता व्यक्त केली आहे. तिने लिहिले, “माझ्यासाठी हा खूपच महत्वाचा दिवस आहे. माझ्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण होणार आहे. हे तुमच्यासोबत शेअर करण्याची मी वाटच पाहू शकत नाही.” आज जरी सोनाक्षीने (Sonakshi Sinha engagement) तिच्या जोडीदाराचे नाव सांगितले नसले तरी तिचे नाव मागील काही दिवसांपासून नोटबुक फेम अभिनेता जहीर इकबालसोबत जोडले जात होते. त्या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा मोठ्या स्वरूपात इंडस्ट्रीमध्ये आणि मीडियामध्ये रंगल्या. मात्र अजूनपर्यंत दोघांपैकी कोणीही अधिकृत रित्या त्यांच्या डेटिंगच्या नात्यावर कधी भाष्य केले नाही. आता सोनाक्षी सिन्हाचा जोडीदार जहीर इकबाल आहे की आणखी कुणी हे तर तीच सांगू शकते. तोपर्यंत वाट बघण्याशिवाय कोणाकडे काहीच पर्याय नाही.

मात्र काही लोकांनी अंदाज तिच्या पोस्ट वरील कॅप्शनवरून वेगळाच अंदाज लावला आहे. सोनाक्षीने तिच्या कॅप्शनमध्ये ‘SO EZ’ असे लिहिले आहे, त्यामुळे काही नेटकऱ्यांनी ती लवकरच तिच्या आगामी प्रोजेक्ट किंवा जाहिरातीबद्दल घोषणा करणार असल्याचे सांगितले आहे. आता नक्की सोनाक्षीच्या (Sonakshi Sinha engagement) या पोस्टमागील खरे कारण तीच सांगू शकते यासाठी तिच्या पुढच्या पोस्टची वाट पहावी लागेल.

तत्पूर्वी सोनाक्षीने सलमान खानसोबत ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती अकिरा, रावडी राठोड, लुटेरा, आर राजकुमार, फोर्स २, नूर आदी एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमांमध्ये काम केले. सध्या सोनाक्षी आणि तिचे कुटुंब अभिनेत्री मॉडेल पूजा शर्माने केलेल्या आरोपांमुळे तुफान गाजत असून तिच्या आरोपांवर सिन्हा कुटुंबाकडून कोणतेही वक्तव्य आले नाही.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Devark Mandir
सामाजिक

Devark Mandir : या सूर्यमंदिरापुढे औरंगजेबानंही मानली हार !

देशभर सध्या छटपूजा उत्साहात सुरु आहे. छठ पूजेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Uttarakhand
सामाजिक

Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिव्यांच्या या सणाला प्रत्येक घरासमोर दिव्यांची...