Home राज्य Crime Story : आयुर्वेदिक काढा आणि खून !
राज्य

Crime Story : आयुर्वेदिक काढा आणि खून !

11
Crime Story

केरळमध्ये 2022 मध्ये घडलेल्या एका खून प्रकरणातील आरोपीला काय शिक्षा होणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. या खून खटल्यातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही आरोपी एक 24 वर्षीय तरुणी असून तिनं तिच्या प्रियकराची आयुर्वेद काढ्यामध्ये विष टाकून हत्या केली होती. 2022 मध्ये घडलेल्या या घटनेनं अवघा देश हादरला होता. या प्रकरणात मृत्यू झालेला आणि ज्यांनी त्याची हत्या केली हे दोघेही सुशिक्षीत होते. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते, पण या प्रेमाच्या नात्यात कंटाळलेल्या तरुणीनं चक्क आपल्या प्रियकरची विष देऊन हत्या केली. न्यायालयानं याबाबत केलेले सर्व दावे फेटाळून लावत ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याची नोंद दिली आहे. त्यामुळे आरोपी तरुणीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम ही 2022 मध्ये घडलेल्या शेरोन हत्याकांडाने हादरुन गेली होती. 23 वर्षीय शेरोनची त्याची प्रेयसी असलेल्या 24 वर्षीय ग्रीष्मा हिने विष देऊन हत्या केली. (Crime Story)

ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ प्रकारातील एक असल्याचे सांगत केरळ न्यायालयानं ग्रीष्माला मृत्यूदंड ठोठावला. ही शिक्षा न्यायाधिश सांगत असतांना ग्रीष्मा अतिशय शांत होती. तर न्यायालयात उपस्थित असलेले शेरोनचे आईवडील आणि अन्य नातेवाईक मोठमोठ्यानं रडत होते. ग्रीष्माला झालेल्या शिक्षेमुळे त्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी, यामुळे आपला मुलगा परत येणार नाही, आपण ग्रीष्माला कधीही माफ करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. ग्रीष्मा आणि शेरोन यांच्या प्रेमकहाणीचा हा करुण अंत होता. या गाजलेल्या हत्या प्रकरणाचा तपास एका व्हॉट्सअॅप संदेशांद्वारे झाला. ग्रीष्मा या तरुणीनं 14 ऑक्टोबर 2022 रोजी आयुर्वेदिक काढ्यामध्ये विषारी रसायने मिसळून शेरोनला दिले होते. या विषामुळे शेरोनला काही तासानंतर उलट्या होऊ लागल्या. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर 25 ऑक्टोबर 2022 रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात, ग्रीष्माच्या काकांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांनाही शिक्षा देण्यात आली आहे. तर ग्रीष्माच्या आईवरील आरोप सिद्ध न झाल्यामुळे तिची निर्दोष सुटका झाली आहे. (Crime News)

ही शिक्षा होतांना ग्रीष्माच्या वकीलांनी न्यायालयाला तिची शैक्षणिक कामगिरी, पूर्वीचा कोणताही नसलेला गुन्हेगारी इतिहास, शिवाय ती तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी असल्यानं शिक्षा सौम्य द्यावी अशी विनंती केली होती. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता दोषीचे वय विचारात घेता येणार नाही, असे न्यायालयाने 586 पानांच्या निकालात स्पष्ट केले. न्यायालयाने या हत्येचे वर्णन “अत्यंत क्रूर, अमानवी आणि घृणास्पद” असे केले आहे. या खटल्यातील आरोपी ग्रीष्मा ही तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील रहिवासी असून ती पदवीधारक आहे. ज्याची हत्या झाली, तो शेरोन राज हा तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील पारासला येथील रहिवासी आहे. तो बी.एससी. रेडिओलॉजीचा शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता. ग्रीष्मा आणि शेरोन यांचे एकवर्षापासून घनिष्ट संबंध होते. दरम्यान ग्रीष्माचे लग्न अन्य ठिकाणी ठरवण्यात आले होते. त्यामुळे तिनं शेरोनला त्यांचे नाते तोडण्याबाबत सांगितले होते. मात्र शेरोनला त्याला नकार दिला. (Crime Story)

==================

हे देखील वाचा :   अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पोलीस जबाबदार हाय कोर्टाने अजब निर्णय का दिला ?

==================

त्याला ग्रीष्माबरोबर लग्न करायचे होते. पण ग्रीष्माच्या लग्नाची तारीख जवळ येत असतांनाही शेरोन तिच्यापासून दूर होत नसल्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. तिच्या लग्नाला एक महिना असतांना तिनं शेरोनला आपल्या घरी बोलावले आणि एक आयुर्वेदिक काढा प्यायला दिला. यात तिनं विष मिसळले होते. आयुर्वेदिक काढा हा कडू असतो, त्यामुळे शेरोनला काढा पितांना त्याबाबत काहीच शंका आली नाही. मात्र ग्रीष्माच्या घरातून बाहेर पडल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि उलट्या सुरु झाल्या. त्यांनी याबाबत आपल्या भावाला फोन करुन कल्पना दिली आणि ग्रीष्मानं काढा दिल्याची माहिती सांगितली होती. शेरोनला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यानंतर 11 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रीष्माला 31 ऑक्टोबर 2022 रोजी अटक करण्यात आली. यात शेरोनच्या भावाची साक्ष महत्वाची ठरली. आता ग्रीष्माला शिक्षा झाली असली तरी ती या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकते. केरळमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली ग्रीष्मा ही दुसरी आणि सर्वात तरुण महिला ठरली आहे. (Crime News)

सई बने

Recent Posts

Related Articles

Ashadhi Wari
राज्य

Ashadhi Wari : ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा निरा स्नान सोहळा संपन्न

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला आषाढी एकादशीचे वेध लागले आहे. वातावरण पूर्ण भक्तिमय आणि...

Monsoon
राज्य

Monsoon : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट

यंदा मे महिन्यात जवळपास संपूर्ण राज्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला. संपूर्ण...

Indrayani River
राज्य

Indrayani River : इंद्रायणी नदीवरील लोखंडी पुल कोसळून चार जणांचा दुर्दैवी अंत

सध्या सतत विविध अपघातांच्या बातम्या कानावर येत आहे. दुर्घटनांची मालिका थांबण्याचे नावच...

Vaishnavi Hagawane
राज्य

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सुशील हगवणेला जामीन मंजूर

जवळपास एक महिन्याभरापासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्र्रात कमालीचे गाजत आहे....