Home मनोरंजन बायकोच्या ‘या’ गुणामुळे उडाली कुशल बद्रिकेची झोप
मनोरंजन

बायकोच्या ‘या’ गुणामुळे उडाली कुशल बद्रिकेची झोप

9
Kushal Badrike

मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सर्वात जास्त गाजलेला शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या शोने फक्त मराठी नाहीच तर सर्वच सर्वभाषिक प्रेक्षकांना खळखळून हसवत त्यांचे पुरेपूर मनोरंजन केले. यासोबतच या शोने मनोरंजनविश्वाला अनेक उत्तमोत्तम विनोदी कलाकार देखील दिले. यातलाच एक कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. मनोरंजनविश्वात बऱ्याच काळापासून सक्रिय असलेल्या कुशलला आणि त्याच्या करियरला ‘चला हवा येऊ द्या’ या शोने मोठी कलाटणी दिली.

कुशलला शोने कमालीची लोकप्रियता देखील मिळवून दिली. कुशल अभिनयात, विनोदामध्ये जितका हुशार आणि प्रतिभावान आहे तितकाच तो व्यक्त होण्यात देखील प्रभावी आहे. तो नेहमीच सोशल मीडियावर विविध गोष्टींवर पोस्ट शेअर करत त्याचे मन मोकळे करतो आणि भावना मांडतो. या माध्यमातून विनोदापलीकडे जाऊन देखील कुशल किती उत्तम माणूस आहे, हे लोकांना समजले.

आता बायकोकडून नवऱ्याच्या अनेक तक्रारी असतात किंवा खटकणाऱ्या काही गोष्टी असतात. मात्र सगळेच पुरुष त्या सांगू शकत नाही. यामागे आदर म्हणा किंवा भीती म्हणा किंवा आदरयुक्त असणारी भीती म्हणा. पण याबाबतीत कुशल धाडसी निघाला. त्याने त्याच्या बायकोबद्दल एक गोष्ट थेट जगासमोर आणत. मोठे धाडस केले आहे. कुशलने नुकतीच एक पोस्ट केली जी खूपच व्हायरल होत आहे. त्याने त्याच्या बायकोला उद्देशून एक विनोदी आणि मार्मिक पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

कुशलने एक व्हिडिओ पोस्ट केला असून, या व्हिडिओमध्ये त्याची बायको आणि मुलगा काम करताना, अभ्यास करताना, गाडीमध्ये झोपलेले दिसत आहे. या व्हिडिओसोबत त्याने लिहिले, “आमची “ही” लग्नात शपथ घेऊन म्हणाली होती की “साता जन्माचा प्रवास एकत्र करू” म्हणून . पण प्रवासात “ही” झोपून राहील अशी शंका मला झोपेत सुद्धा आली नाही. आमच्या लग्नानंतर काही काळ आम्ही चाळीत राहिलोय तेंव्हाची गोष्ट सांगतो, मी शूटिंग संपवून रात्री उशिरा घरी आलो, दार वाजवून वाजवून थकलो, हिने जवळ जवळ अर्धातास दार उघडलं नाही. आतून phone सुद्धा उचलेना .मी घाबरलो आणि स्वतःच्याच घरात मागच्या खिडकीने चोरासारखा आत शिरलो पहातो तर आमचा कुंभकर्ण ढाराढूर झोपलेला.

हल्लीची गोष्ट सांगतो मी एका हिंदी show च shoot आटपून उशिराने घरी पोचलो, (आता मी आठवणीने घराची किल्ली घेऊन जातो) तर हिला झोपेतच कुणाची तरी चाहूल लागली आणि हिला वाटलं की घरात चोर शिरलाय .त्यावर उपाय म्हणून माझी बायको झोपूनच राहिली, की उगाच मग चोराला वाटेल की आम्ही जागे आहोत आणि मग तो आम्हाला त्रास देईल.

माझी खात्री आहे की देव कोवाला (Koala) नावाचा प्राणी बनवायला गेला असणार, जो दिवसातून 18 तास झोपतो! आणि त्याची रेसिपी चुकल्या मुळे आमच्या सुनयनाचा जन्म झाला असणार. हिचा हाच स्वभाव माझ्या मुलात सुद्धा उतरलाय. ऐन परीक्षेत बारा बारा तास झोपून रहातो यार. “अश्या अर्थाने स्वतःच्या आई ची गादी चालवणारा मुलगा महाराष्ट्रात माझ्याच घरात जन्माला आला”. असं म्हणायला हरकत नाही. ह्या दोघांच्या अश्या स्वभावामुळे आता “माझी” मात्र झोप उडालिये, ह्या वर उपाय म्हणून माझी बायको मला म्हणते, कुशल… “थोडा वेळ झोप , तुला बरं वाटेल “ !”

======

हे देखील वाचा : मोड आलेली मेथी खाण्याचे चमत्कारिक फायदे

======

दरम्यान कुशलची ही पोस्ट कमालीची व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांसोबतच अनेक कलाकारांनी त्याच्या प्रतिक्रया दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी कुशलच्या या पोस्टसोबतच त्याच्या व्यक्त होण्याच्या शैलीचे आणि त्याच्या उदाहरणाचे देखील खूप कौतुक केले आहे.

कुशलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने चला हवा येऊ द्या या शो सोबतच अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. शिवाय तो ‘सोनी टीव्ही’वरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी शोमध्ये देखील झळकला होता.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...