Home लाईफ स्टाईल कॉटनसह फॅब्रिक कपड्यांना इस्री करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
लाईफ स्टाईल

कॉटनसह फॅब्रिक कपड्यांना इस्री करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

8
Clothes Iron Tips
Clothes Iron Tips

जर तुमच्याकडे विविध फॅब्रिकचे कपडे असतील तुम्हाला याच्या धुण्याच्या ते इस्री करण्यासंदर्भात काळजी घ्यावी लागते. खासकरुन अशावेळी जेव्हा तुम्हाला इस्री केलेले कपडे घालायला आवडत नव्हते. प्रत्येक वेळी कपडे बाहेरुन इस्री करणे मुश्लिक असते. त्यामुळे घरात कपडे इस्री करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे असते. अन्यथा इस्री करताना कपडे जळण्याचा धोका वाढतो. अशातच कॉटन ते फॅब्रिकचे कपडे इस्री करण्यासंदर्भातील काही टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.(Clothes Iron Tips)

सुती कपड्यांना अशी करा इस्री
सुती कपडे अधिक मऊ आणि कंम्फर्टेबल असतात. त्यामुळे जवळजवळ प्रत्येकाकडे ते असतात. खसाकरुन ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येकाकडे सुती कपडे असतात. अशातच जेव्हा सुती कपडे इस्री करताना प्रथम त्यावर पाण्याचे थेंब टाकावे. त्यानंतर इस्रीचे तापमान तुमच्या सुती कापडांना योग्य असेल ऐवढेच ठेवा. यावेळी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की, कपड्यावर इस्री खुप वेळ एकाच ठिकाणी ठेवू नका.

ड्रेसच्या लेसवर इस्री करताना अशी घ्या काळजी
लेस पासून तयार करण्यात आलेला ड्रेस अत्यंत डेलीकेट असतो. तो सुती किंवा घाग्यापासून तयार करण्यात आलेला असतो. प्रत्येक मुलीकडे एक तरी असा ड्रेस असतो. अशातच जर तुम्हाला असा ड्रेस इस्री करायचा असेल तर जमिनीवर एक चादर टाका. त्याचसोबत न्यूज पेपर घेत त्यामध्ये तुमचा ड्रेस ठेवा. इस्रीचे तापमान कमी ठेवा आणि ड्रेस इस्री करा.

-सिल्क कपडे असे करा इस्री
सिल्कचे कपडे सातत्याने इस्रीवाल्याकडेच इस्री करण्यासाठी दिले जातात. कारण आपल्याला ते कपडे किती व्यवस्थितीत इस्री करावेत हे माहिती नसते. अशावेळी जर तुम्हाला घरीच सिल्कचे कपडे इस्री करायचे असतील तर तो उलटा करुन इस्री करावा. यावेळी इस्रीचे तापमान कमी ठेवा. एकाच ठिकाणी ती ५ सेकंदापेक्षा अधिक वेळ ठेवू नका. सिल्कचे कापड स्वच्छ टॉवेल आणि वृत्तपत्र ठेवून इस्री करा.

-लाइनेन कपडे इस्री करतेवेळी अशी घ्या काळजी
जर तुम्ही लाइनेन कपडे इस्री करत असातर ते जळू नयेत म्हणून त्यावर पाण्याचे काही थेंब टाका. त्यानंतर ते उलटे करुन इस्री करा. इस्री करतेवेळी त्याचे तापमान कमी ठेवा. यामुळे कपडे लवकर इस्री होतीलच पण जळण्याचा धोका सुद्धा उद्भवणार नाही.(Clothes Iron Tips)

हे देखील वाचा- चुकूनही दुसऱ्यांच्या ‘या’ वस्तू वापरू नका; येऊ शकते आरोग्य आणि पैशाची समस्या

-कपडे जळू नयेत म्हणून असे करा
तुम्हाला एखाद्या ठिकाणी जाण्यास उशिर होत असेल तर तु्म्ही घाईत ते इस्री करतता. अशावेळी अॅल्युमिनियमची फॉइल कपड्याखाली ठेवा. असे केल्याने हिट खालीच राहते आणि कपड्याचा खालील भाग सुद्धा इस्री केला जातो.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....