Home गाजावाजा स्पेशल तुरूंगात जन्माला येणाऱ्या बाळाच्या जन्मदाखवल्यावर कुठचा पत्ता लिहितात? जाणून घ्या नियम
गाजावाजा स्पेशल

तुरूंगात जन्माला येणाऱ्या बाळाच्या जन्मदाखवल्यावर कुठचा पत्ता लिहितात? जाणून घ्या नियम

11
Child Gender
Child Gender

Children Born in Jail : भारतातील लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. भारताची गणना जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलया देशांमध्ये केली जात आहे. वाढत्या लोकसंख्येसह गुन्हेगारीच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या कारवाईनंतर कोर्टापर्यंत काही प्रकरणे जातात. यामधील दोषींचा शिक्षा सुनावली जाते. याच दोषींमध्ये भारतात मोठ्या संख्येने महिला कैदीही आहेत. पण असा प्रश्न निर्माण होतो की, गर्भवती महिला कैदीने बाळाला जन्म दिल्यास त्याच्या जन्मदाखल्यावर पत्ता नक्की कुठचा लिहिला जातो? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर….

भारतात मोठ्या संख्येने महिला कैदी
भारतातील तुरूंगात मोठ्या संख्येने महिला कैदीही आहेत. यापैकी काही महिलांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर काही महिला कैदींना शिक्षा होणे शिल्लक असून कोर्टात प्रकरण सुरू आहे. याशिवाय अशाही काही महिला कैदी आहेत ज्या गर्भवती आहेत.

महिला गर्भवती कैदीला बाळाला जन्म द्यायचा असल्यास तिला डिलिवरीसाठी जिल्हा रुग्णालयात नेले जाते. येथे बाळाच्या जन्मानंतर त्याचे जन्म ठिकाण म्हणून जिल्हा रुग्णालय असे जन्मदाखवल्यावर लिहिले जाते. यावेळी कोणतेही कागदपत्र अथवा सर्टिफिकेटवर तुरूंगाचा उल्लेख केला जात नाही. सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट अशी की, याबद्दल कोणालाही अधिक कळू नये याची काळजी तुरूंगाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली जाते. (Children Born in Jail)

तुरूंगातील डेटा
एनसीारबीच्या डिसेंबर 2023 मध्ये आलेल्या एका रिपोर्ट्सनुसार, भारतात एकूण 1330 तुरूंगात एकूण 5,73,220 कैदी आहेत. त्यापैकी 23,772 महिला कैदी आहेत. यामधीलच 1537 महिला कैदी अशा आहेत ज्यांची मुलं त्यांच्यासोबत तुरूंगात राहतात.


आणखी वाचा :
मुक्काम पोस्ट अंटार्क्टिका
4-5 वर्ष बेरोजगारी, गटरात झोपून घालवल्या रात्री पण नंतर असे बदलले आयुष्य!
मानवी अस्तित्वापेक्षा या देशांना वर्चस्वाची चिंता

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....