Home लाईफ स्टाईल शिफॉनच्या साडाची अशी घ्या काळजी
लाईफ स्टाईल

शिफॉनच्या साडाची अशी घ्या काळजी

10
Chiffon Saree Care
Chiffon Saree Care

साडी नेसणे प्रत्येक महिलेला आवडते. बाजारात विविध प्रकारच्या साड्या मिळतात. त्याचे पॅटर्न ही विविध असते. एखादी ट्रेंन्डिंग साडी पाहिली की महिला लगेच त्या खरेदी करू पाहतात. कांजीवरम साडी ते पैठणी साडीची एक खास क्रेज महिलांमध्ये दिसते. मात्र त्यापैकीच एक असलेली साडी म्हणजे शिफॉनची.  शिफॉनची साडी कोणत्याही महिलेचा लूक अगदी खुलवते. ही साडी आपले सौंदर्य, नाजूक कापड आणि ग्रेसफुल ड्रेसिंगसाठी ओळखली जाते. कोणत्याही लग्नसोहळ्यात, समावेळी किंवा ऑफिसमधील एखाद्या कार्यक्रमावेळी सुद्धा तुम्ही ती नेसू शकता. परंतु त्याची काळजी घेणे थोडे मुश्किल असते. त्याची चमक दीर्घकाळ टिकून रहावी म्हणून नक्की काय करावे याच बद्दलच्या टीप्स आपण जाणून घेणार आहोत. (Chiffon Saree Care)

-जेंटल वॉश
शिफॉनचे कापड अत्यंत नाजूक असे. त्यामुळे ती साडी अत्यंत जेंटल वॉश केली पाहिजे. साडी मशीन वॉश ऐवजी हाताने धुवा. ती धुण्यासाठी बेसिनमध्ये कोमट पाण्याचा वापर करा. त्यात हलके डिटर्जेंट टाका. हाताने जोराने घासू नका. जेणेकरून ती फाटली जाईल. साडी हलक्या हाताने स्वच्छ करा.

-एअर ड्रायर करा
साडी धुतल्यानंतर ड्रायर किंवा उन्हात सुकण्यासाठी घालू नका. तर खोलीतील पंख्याखाली सुकण्यासाठी ठेवा. थेट उन आणि अधिक गरम्यामुळे साडीचा रंग फिका पडू शकतो.

-व्यवस्थितीत ठेवण्याची पद्धत
साडी सुकल्यानंतर ती कशीही फोल्ड करून ठेवू नका. ती हलकी प्रेस करा. शिफॉनटची साडी पातळ असते. त्यामुळे इस्री करताना त्यावर कॉटनचा एखादा कापड टाका. साडी व्यवस्थितीत फोल्ड केल्यानंतर न्यूजपेपरमध्ये बांधा.

शिफॉनच्या साडीसोबत करू नका या चुका
-शिफॉनची साडी नाजून असल्याने ती मशीन वॉश करू नका. कापड व्यवस्थितीत रहावे यासाठी हँन्ड वॉश करा.

-शिफॉनची साडी धुताना हार्श केमिकलचा वापर करू नका. यामुळे तुमची साडी फाटण्याची शक्यता अधिक असते. याची चमक ही निघून जाईल. नाजुक कपड्यांसाठी लाइट डिटर्जेंटचा वापर करावा. (Chiffon Saree Care)

-शिफॉनची साडी नेसल्यानंतर जर तुम्ही ज्वेलरी घालणार असाल तर काळजी घ्या. कारण कधीकधी त्यात ती अडकून फाटू शकते. त्यामुळे सिंपल आणि हलक्या ज्वेलरीचा वापर करा. तसेच साडीला सेफ्टी पिन लावण्याची चूक करू नका.


हेही वाचा- कांजीवरम साडी अशी ओळखा

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Tourism
लाईफ स्टाईल

Tourism : स्लीप टुरिझम म्हणजे काय? काय आहे हा नवा ट्रेंड?

प्रत्येक व्यक्तीच्या उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, उत्तम व्यायाम जेवढा आवश्यक आहे, तेवढीच...

Chaturthi
लाईफ स्टाईल

Chaturthi : नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या चतुर्थीचे महत्त्व आणि पूजाविधी

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजे गणपती. या गणेशाची आपण कायमच आराधना करत...

Lord Shiv
लाईफ स्टाईल

Lord Shiv : का महादेवाने सर्वेश्वर अवतार घेत केले भगवान नरसिंहाशी युद्ध?

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा करण्याचा आणि आराधना करण्याचा...

Indian Sweets | Top Marathi Headlines
लाईफ स्टाईल

Indian Sweets : मिठाईवर लावल्या जाणाऱ्या सोने, चांदीच्या वर्खची रंजक माहिती

आपल्या देशामध्ये कोणताच लहान मोठा सण, समारंभ, पूजा मिठाईशिवाय पूर्ण होत नाही....