Home गाजावाजा स्पेशल मेकअपचा आधार घेऊन प्रियकराची फसवणूक
गाजावाजा स्पेशल

मेकअपचा आधार घेऊन प्रियकराची फसवणूक

7
Love Story
cheating-on-a-lover-with-the-help-of-makeup-marathi-info

हल्ली सोशल मिडीयाचा जमाना आहे.  या सोशल मिडीयावर अनेक रिल फिरत असतात.  त्यापैकी काही रिलमध्ये मेकअपची कमाल दाखवण्यात येते. अगदी ज्यांच्या चेह-यावर सुरुकुत्यांचे जाळे आहे, अशा व्यक्तीही मेकअप केल्यावर अगदी तरुण दिसायला लागतात.  पण अशाच मेकअपच्या आधारानं फसवणूक (Love Story) केल्याची बातमी तुम्ही वाचली आहे का? नसेल तर नक्कीच वाचा…चीनमध्ये अशाच एका प्रेम प्रकरणाची चर्चा सध्या चांगलीच चालू आहे.  प्रेम आंधळं असतं असं बोललं जातं.  पण  हे चीनमधलं प्रेम प्रकरण एवढं आंधळं होतं की, त्यांना दोघांमधला वयाचा अडसरही  दिसला नाही.  या प्रेमप्रकरणातील तरुणी चक्क 44 वर्षाची होती आणि तिच्या प्रेमात पडलेला तरुण 30 वर्षाचा.  या तरुणींनं मेकअपच्या सहाय्यानं आपल्याला फसवल्याची तक्रार या तरुणांनं केली आहे. दरम्यान या दोघांच्या या मेकअप प्रेमाची चांगलीच चर्चा सुरु आहे. (Love Story)

चीनमधली ही प्रेमकथा (Love Story) आहे. एका युवतीला 30 वर्षाची समजून एक युवक तिच्या प्रेमात पडला. दोघांचेही प्रेम चांगलेच रंगात आले,  पण त्याचवेळी त्या युवतीची चोरी पकडली गेली.  ती म्हणजे ही युवती 44 वर्षाची होती आणि तो युवक तिशीचा….आपल्यापेक्षा वयानं खूप मोठ्या असलेल्या महिलेच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाल्यावर तो युवक मात्र वेड्यासारखा झाला. प्रेयसीने आपली फसवणूक केल्याची  भावना त्यानं व्यक्त केली.  44 वर्षीय महिला आणि 30 वर्षांच्या मुलाचे हे प्रेम प्रकरण (Love Story), या दोघांमधील वयाचे अंतर स्पष्ट झाल्यावर लगेच तुटले हे सांगायलाच नको. पण त्यापेक्षा या युवकाला बसलेला धक्का मोठा होता.  

चीनच्या बिजींगमध्ये घडलेली ही प्रेमकथा (Love Story) सध्या चर्चीली जात आहे. बिजींगधला 30 वर्षाचा तरुण एका महिलेसोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहत होता.  तो तिचेही वय 30 वर्ष असल्याचे मानत होता.  पण प्रत्यक्षात ही महिला 44 वर्ष पार केलेली होती. एवढंच नाही तर तिची मोठी मुलंही होती.  शिवाय ही महिला लवकरच आजीही होणार होती.  जेव्हा या तरुणापुढे आपल्या प्रेयसीची ही सत्यपरिस्थिती समोर आली, तेव्हा त्याच्या पायाखालची जमिनच हलली.  हा तरुण लवकरच या महिलेसोबत विवाह करण्याचे स्वप्न पाहत होता.  मात्र ती महिला आजी होणार होती.  एका आजीसोबत आपलं लग्न होणार, या विचारानं त्या तरुणाला मोठा धक्काच बसला आहे.  गुओ नावाचा हा व्यक्ती  गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपल्या प्रेयसीला भेटला.  तेव्हा तिनं तिचं वय कमी सांगितलं होतं. गुओलाही ती महिला कमी वयाची वाटली.  त्यांची ओळख वाढली आणि या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. गुओने या महिलेला त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली. ही महिला गुओनेच्या कुटुंबासोबत दोन आठवडे राहिली. 

========

हे देखील वाचा : ६० वर्षात प्रथमच चीनची लोकसंख्या झालीय कमी, बर्थ रेटही घटला

========

शेवटी या प्रेमी जोडप्यानं विवाह करण्याचा निर्णय घेतला.  गुओनं लग्नाची तयारीही सुरु केली. अशात त्याला त्याच्या आईचा फोन आला आणि त्याचे आयुष्यच बदलून गेले.  गुओ जरी या महिलेच्या प्रेमात (Love Story) वेडा झाला असला तरी गुओच्या आईनं मात्र त्या महिलेची चोरी पकडली होती.  या महिलेकडून तिनं तिचं नेमकं वय जाणून घेतलं होतं. गुओच्या आईकडे या महिलेनं आपल्याला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचेही सांगितले.  एवढेच नाही तर तिच्या मुलाची बायको लवकरच बाळाला जन्म देणार असल्याचीही माहितीही कळली. गुओच्या आईनं मग या महिलेची तिच्या गावात चौकशी केली.  तेव्हा तिची पूर्ण खात्री पटली.  या महिलेनं आपल्या मुलाला फसवल्याचं तिच्या लक्षात आले आणि तिनं मुलाला फोन करुन त्याच्या प्रेअसीची खरी माहिती सांगितली. या प्रकारामुळे पहिल्यांदा धक्का बसलेल्या गुओनं नंतर पोलिसात तक्रार दाखल केली. महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या  महिलेवर गुओनं लाखो रुपये खर्च केले होते.  हे पैसे त्यानं परत मागितले आहेत.  फक्त मेकअपमुळे एवढी मोठी फसवणूक झाल्यानं या प्रेमप्रकरणाची (Love Story) सर्वत्र चर्चा चालू आहे.  

सई बने

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....