Home गाजावाजा स्पेशल तुमच्या ‘या’ सवयींमुळे तुम्ही आयुष्यात होऊ शकता कंगाल
गाजावाजा स्पेशल

तुमच्या ‘या’ सवयींमुळे तुम्ही आयुष्यात होऊ शकता कंगाल

10
Financial Problems
Financial Problems

आपल्याला विविध गोष्टी करण्याची आवड असते. काहीजण हिच आवड आपला व्यवसाय म्हणून करतात. परंतु काही माणसं ही आपल्याला असलेल्या सवयींचा गैरफायदा घेताना दिसून येतात. जसे की, तुम्ही नेहमीच एखाद्याच्या मदतीला धावून जाता ही चांगलीच बाब आहे. याउलट तुम्हाला जुगार किंवा अन्य काही वाईट गोष्टींची सवय असेल तर तुमचे आयुष्य हे व्यर्थच आहे. कारण आपण ज्या महत्वाच्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याकडे दुर्लक्ष करतो आणि अशा वाईट गोष्टी करण्यातच आपले आपले आयुष्य घालवतो. मात्र तुमच्या काही सवयी या तुम्हाला आर्थिक समस्यांमध्ये (Financial problems) ढकलू शकतात हे विसरु नका. तर आचार्य चाणाक्यांनी आपल्या नीति शास्रात मनुष्याच्या जीवनासंबंधित काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यानुसार तुम्ही आयुष्यात वागलात तर यशाचा मार्ग नक्कीच गाठू शकता. पण आचार्य चाणाक्य यांच्यानुसार व्यक्तीच्या कोणत्या सवयी त्याला कंगाल बनवू शकतात त्याबद्दलच आपण जाणून घेऊयात.

-साफ-सफाई
तुम्ही घराची साफ-सफाई करण्याकडे नेहमीच लक्ष दिले पाहिजे, कारण देवी लक्ष्मीला घरात स्वच्छता असते तेथे जाणे आवडते. अशातच तुमच्या घरात साफ-सफाई नसेल तर द्रारिद्र मागे लागू शकते. अशा ठिकाणी देवी सुद्धा वास करत नाही. त्यामुळे नेहमीच लक्षात ठेवा की, तुमच्या घरात साफ-सफाई करा आणि स्वच्छता बाळगा.

-भोजन
बहुतांश लोकांना अशी सवय असते की, खुप भुक लागल्यानंतर प्रमाणापेक्षा अधिक भोजन करतात. पण गरजेपेक्षा अधिक खाल्ल्यात तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. थोडक्यात दारिद्र ही तुमच्या पदरी पडू शकते. म्हणून गरजेनुसार भोजन करावे. कारण काही माणसं असे ही करतात की, भुक लागली म्हणून खुप खाणं आपल्या ताटात घेतात आणि नंतर ते जात नाही म्हणून फेकून देतात. असे करणे चुकीचे आहे. यामुळे देवी नाराज होऊ शकते.

हे देखील वाचा- तुम्हाला अधिक राग येतो? ‘या’ ज्योतिष उपायांनी ठेवा नियंत्रणात

Financial Problems
Financial Problems

-झोपण्याची सवय
आचार्य चाणाक्यांनुसार कोणत्याही वेळी झोपणे टाळा. कारण घरात देवी येणार असेल आणि त्याचवेळेला तुम्ही झोपलेले असाल तर ती तेथून निघून जाईल. अशातच तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सुर्योदय आणि सूर्यास्तावेळी झोपणे टाळा. यामुळे फक्त पैशांसंबंधितच नव्हे तर आरोग्यासंदर्भात ही फटका बसू शकतो.

-खोटे बोलू नका
काही लोक ही अधिकाधिक पैसा मिळवण्यासाठी खोटेपणा आणि बेईमानी करतात. आचार्य चाणाक्यांनुसार खोटे आणि बेईमानी पद्धतीने कमवलेला पैसा हा अधिक काळ टिकत नाही. या सवयीमुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. अशातच घरात देवी लक्ष्मी अधिक काळ वास करत नाही. यामुळे तुम्हाला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो.(Financial problems)

तर वरील काही सवयींचा तुम्ही चुकीच्या मार्गाने अंमलात आणत असाल तर आजच बदला. कारण प्रत्येकाला आपण आयुष्यात मोठे व्हावे आणि सुखी-समृद्धी आयुष्य जगावे असे वाटत असते. मेहनत करुन मिळवलेला पैसा हा नेहमीच वाढत जातो. याउलट खोटेपणाने मिळालेला पैसा हा तुम्हाला कालांतराने आर्थिक संकटात ढकलू शकतो. तुम्ही जसे दुसऱ्यांसोबत वागाल तसेच तुमच्यासोबत ही कधी ना कधी तरी होईल हे लक्षात ठेवा. कारण हा निसर्गाचा खेळ आहे आणि त्याला आपण कर्म असे म्हणतो.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....