Home गाजावाजा स्पेशल ‘या’ रेस्टॉरंटमध्ये मिळतात सेलिब्रिटींच्या नावे स्वादिष्ट डिशेज
गाजावाजा स्पेशल

‘या’ रेस्टॉरंटमध्ये मिळतात सेलिब्रिटींच्या नावे स्वादिष्ट डिशेज

10
Celebrity name food bollywood
Celebrity name food bollywood

बॉलिवूड सेलिब्रेटीचा त्यांच्या फॅन्समध्ये फार मोठी क्रेज असते. आपल्या आवडत्या कलाकारासाठी एखादा फॅन मंदिर बनवतो तर एखादा काही मैल प्रवास करुन त्याला भेटण्यासाठी येतो. कलाकारांच्या प्रति चाहत्यांचे प्रेम ऐवढे वाढले आहे की, त्यांची ते देवाप्रमाणे पूजा ही करु लागले आहेत. आपल्या कपाटात त्यांचा फोटो लपून लावण्याचा जो काळ होता तो आता बदलला आहे. त्यांच्यासाठी ते काहीही करण्यास तयार होतात. परंतु तुम्हाला माहितेय का याच सेलिब्रेटिंच्या नावे रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट फूड डिशेज सुद्धा मिळतात. तर पाहूयात असे कोणते सेलिब्रेटी आहेत ज्यांच्या नावे खरंच डिशेज तुम्हाल रेस्टॉरंटमध्ये सर्व केल्या जातात. (Celebrity name food)

दीपिका पादुकोण डोसा
दीपिकाची फॅन फोलॉइंग जगभरात आहे. तिच्या सौंदर्यावर सर्वजण घायाळ होतात. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का तिच्या नावे डोसा तुम्ही खाऊ शकता? खरंतर टेक्सास मधील डोसा लॅब्स नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये दीपिका पादुकोणच्या नावाने डोसा सर्व केला जातो. याची माहिती दीपिका आणि रणवीरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केली होती. ऐवढेच नव्हे तर दीपिकाच्या नावे पुण्यात प्रसिद्ध पराठा सुद्धा मिळतो.

साइज झिरो पिझ्जा
टशन सिनेमातून करिनाने बहुतांश तरुणींना झिरो फिगर साइजसाठी इंस्पायर केले होते. तर त्यांच्या फॅनने त्याच्या रेस्टॉरंटमध्ये तिच्या फॅशन ट्रेंन्डच्या नावे एका डिशचे नाव ठेवे. दिल्लीतील एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये साइज झिरो पिझ्जा मिळतो. हा पिझ्जा त्यांच्या मेन्यू कार्डवरही तुम्हाला दिसतो. ऐवढेच नव्हे तर नीनाज किचनची फाउंडर नीना प्रधान यांनी करिनाच्या नावे एक डिशचे नाव ठेवले आहे. ते म्हणजे करीनामीसू असे आहे.

Celebrity name food bollywood (1)
Celebrity name food bollywood (1)

शाहरुख खान पान
बॉलिवूड मधील किंग खान भले डॉन सिनेमानत खई के पान बनारस वाला गाण्यात बनारसच्या पानाची तारीफ केलीय. पण त्याच्या एका फॅनने बनारसमध्ये गोड पानाचे नाव शाहरुख खानच्या नावावरुन ठेवले आहे. एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी बनारस दौऱ्यावर असताना शाहरुखने ते पान खाल्ले होते. त्यानंतर दुकानात गोड पान खाणाऱ्यांची संख्या अधिकच वाढली गेली. याच कारणास्तव दुकानाच्या मालकाने शाहरुख गोड पान नावाने ते विक्री करण्यास सुरुवात केली होती.(Celebrity name food)

सोनम केक
मुंबईत राहणाऱ्या दिव्याने आपल्या केक आणि कान्पेक्शनरी शॉपमध्ये सोनम कपूरच्या नावे केक मेन्यू तयार केला आहे. आंबा आणि ब्लू बेरी स्पेशल या केकचे नाव सोनम स्पेशल असे आहे. सोनम कपूरच्या या फॅनने या केकच्या माध्यमातून आपल्या फेवरेट स्टारला स्पेशल डिशच्या माध्यमातून शॉपच्या युएसपी मध्ये सहभागी केलेयं.

प्रियंकाच्या नावे मिल्क शेक
बॉलिवूड ते हॉलिवूड मध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या प्रियंकाची एक वेगळीच फॅन फॉलोइंग आहे. प्रियंका चोपडा हिच्या नावे एक मिल्क शेक असून त्याचे नाव पिगी चॉप्स असे आहे. केळं , बदाम आणि कॅरामल सॉससह वेनिला आइस्क्रिम मिक्स करुन हा स्वादिष्ट शेक तयार केला जातो.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...

Ganpati
गाजावाजा स्पेशल

Ganpati : ‘या’ गावात भाद्रपदात नाही तर चक्क लक्ष्मीपूजनाला होते गणेशाची स्थापना

भाद्रपद महिना जवळ येऊ लागला की, सगळ्यांना वेध लागतात ते गणेश चतुर्थीचे....