Home राज्य ब्रु करार नक्की काय आहे? जाणून घ्या सविस्तर
राज्य

ब्रु करार नक्की काय आहे? जाणून घ्या सविस्तर

8
Bru Agreement
Bru Agreement

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नुकत्याच त्रिपुरातील मुख्यमंत्री माणिक साहा यांच्या सोबत ब्रु करारासंबंधित (Bru Agreement) चर्चा केली. त्यांनी ब्रु समाजातील लोकांच्या पुर्नवसनाबद्दलच्या कार्यक्रमाची माहिती घेतली. जानेवारी २०२० मध्ये ब्रु करार झाला होता. त्यानंतर मिझोराम मधील विस्थापित लोकांना त्रिपुरा मध्ये घरं दिले जाणार आहे. सध्या त्रिपुरामध्ये अशी परिवाराची संख्या ६९५९ आणि त्यांची लोकसंख्या ३७,१३६ वर पोहचली आहे. आतापर्यंत एकूण ३६९६ ब्रु जमाती मधील परिवाराचे पुर्नवसन झाले आहे. मात्र आता अन्य परिवारासाठी तयारी केली जात आहे.

कोण आहेत ब्रु जमातीतील लोक
ब्रु जमाती मधील लोक मूळ रुपात मिजोराम मधील आदिवासी आहेत. मिजोराम मध्ये १९९६ मध्ये हिंसा झाला होता. त्यानंतर या समुदायातील लोकांनी त्रिपुरातील कंचनपुरा ब्लॉक मधील डोबुरी गावात राहण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर ते आपल्या हक्काच्या घरासाठी आणि अधिकारांसाठी लढाई लढत आहेत. त्यांची स्थिती पाहून आता त्यांना दिलासा देण्याचा विचार करत ब्रु करार करण्यात आला.

काय आहे ब्रु करार
जानेवारी २०२० मध्ये त्रिपुरा, मिजोराम, केंद्र सरकार आणि ब्रु समुदायातील संबंधित प्रतिनिधींमध्ये एक करार झाला. या कराराअंतर्गत त्यांना त्रिपुरामध्ये पुर्नवसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्यांना प्रत्येक सुविधा ही सरकार कडून मिळेल असे ही सांगितले गेले. यामध्ये राशन, घर, शिक्षण ते सर्व आवश्यक सुविधांचा समावेश आहे. सध्या कराराची स्थिती काय आहे आणि ब्रु समुदायातील लोकांच्या पुर्नवसनाच्या स्थिती संदर्भातील आढावा नुकताच अमित शहा यांनी त्रिपुरातील मुख्यमंत्र्यांकडून घेतला.

Bru Agreement
Bru Agreement

काय आहे सध्याची स्थिती
इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्ट्सनुसार प्रत्येक परिवारासाठी सरकारकडून पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्रिपुरा मध्ये ब्रु समुदायातील एकूण ६९५९ परिवार आहेत. तर काही परिवारांचे पुर्नवसन झाले आहे. मात्र अद्याप काही परिवारांचे ते होणे शिल्लक आहे.(Bru Agreement)

खरंचर ब्रु समुदायातील लोकांसाठी सरकारने ६०० कोटी रुपयांचे पुर्नवसन पॅकेज जारी केले होते. मात्र त्रिपुरा मध्ये त्यांना घर देण्यासंदर्भात स्थानिक लोकांनी त्याचा जोरदार विरोध केला होता. हिंसक आंदोलन ही झाली. पण सरकार आपल्या शब्दावर कायम अडूनच राहिली.

हे देखील वाचा- ५ वर्षात महिलांच्या विरोधात सायबर गुन्ह्यांमध्ये ४०० टक्क्यांनी वाढ, तुमच्या राज्याची काय स्थिती?

अधिकृत कागदपत्रं तयार केली जातायत
रिपोर्टमध्ये गृह मंत्रालयाचे असे म्हणणे आहे की, त्रिपुरातील ब्रु समुदायातील लोकांसाठी स्थायी प्रमाण पत्र, अनुसूचित जातीप्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदार यादीत त्यांची नाव समावेश करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सरकारचे असे म्हणणे आहे की, ब्रु समुदायातील लोकांना त्रिपुरात पुर्नवसन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Ashadhi Wari
राज्य

Ashadhi Wari : ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा निरा स्नान सोहळा संपन्न

सध्या संपूर्ण महाराष्ट्राला आषाढी एकादशीचे वेध लागले आहे. वातावरण पूर्ण भक्तिमय आणि...

Monsoon
राज्य

Monsoon : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना IMD चा रेड अलर्ट

यंदा मे महिन्यात जवळपास संपूर्ण राज्यात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला. संपूर्ण...

Indrayani River
राज्य

Indrayani River : इंद्रायणी नदीवरील लोखंडी पुल कोसळून चार जणांचा दुर्दैवी अंत

सध्या सतत विविध अपघातांच्या बातम्या कानावर येत आहे. दुर्घटनांची मालिका थांबण्याचे नावच...

Vaishnavi Hagawane
राज्य

Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सुशील हगवणेला जामीन मंजूर

जवळपास एक महिन्याभरापासून वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्र्रात कमालीचे गाजत आहे....