Home मनोरंजन अमृता राव ते तनुश्री दत्तांसह या कलाकारांनी घेतलाय बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय
मनोरंजन

अमृता राव ते तनुश्री दत्तांसह या कलाकारांनी घेतलाय बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय

9
Bollywood
Bollywood

Bollywood : बॉलिवूडमध्ये प्रत्येकवर्षी नवे सिनेमे प्रदर्शित होत राहतात. अशातच सिनेमातून पहिल्यांदाच पदार्पण केलेल्या अभिनेत्रींचा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर त्या सिनेमा क्षेत्रापासून दूर राहू लागतात. त्यानंतर इंडस्ट्रीमधून गायब होतात. पण खासगी आयुष्यात त्या अभिनेत्री फार अॅक्टिव्ह असतात. अशातच तुम्हाला माहितेय का, बॉलिवूडमधील अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी सिनेसृष्टीपाहून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलच जाणून घेऊया अधिक….

किम शर्मा
वर्ष 2000 मध्ये शाहरुख खान याचा सिनेमा ‘मोहब्बते’ मधून बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणारी अभिनेत्री किम शर्मा गेल्या दीर्घकाळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. किमला अखेरचे मघधीरामध्ये दिसून आली होती. वर्ष 2009 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर किमचा कोणत्याही सिनेमात कॅमिओ रोल दिसला नाही. किमला लाइम लाइटपासून दूर राहून 15 वर्ष झाली आहेत. मोहब्बतेनंतर किमने ज्या कोणत्याही सिनेमात काम केले ते सर्व सिनेमे फ्लॉप ठरले. यामुळे तिला काम मिळणे बंद झाले आणि हळूहळू ती इंडस्ट्रीपासून दूर होत गेली.

आएशा टाकिया
टारझन द वंडर कार मधून डेब्यू करणारी आएशा टाकिया सध्या आपल्या परिवारासोबत व्यस्त असते. टारझन द वंडर कार सिनेमा देखील आएशाच्या करियरसाठी काही खास ठरला नाही. पण दुसरा सिनेमा वॉन्टेडमधून तिच्या भुमिकेचे कौतुक करण्यात आले. या सिनेमात सलमान खान सोबत आएशाने काम केले होते. (Bollywood)

प्रीति झंगियानी
वर्ष 2000 मध्ये आलेला सिनेमा मोहब्बते मधून आपल्या सिनेसृष्टीतील करियरला सुरुवात करणारी प्रीति झंगियानी बॉलिवूडपासून सध्या दूर आहे. तिचा डेब्यू सिनेमा सुपरहिट ठरला होता. पण त्यानंतर प्रीति झंगियानीने लग्न केले आणि सिनेसृष्टीपासून दूर होत गेली.

ऐश्वर्या राय बच्चन
मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय बॉलिवूडच्या पार्टीजमध्ये दिसते. पण सिनेमांपासून ती दूर राहण्याचा प्रयत्न करतेय. ऐश्वर्या अखेर साउथचा पॅन इंडिया सिनेमा ‘पोन्नियिन’मधून झळकली होती.

स्नेहा उलाल
ऐश्वर्याची डुप्लीकेट म्हणनू ओखळली जाणारी स्नेहा उलालने सलमान खानचा सिनेमा ‘लकी’ मधून डेब्यू केला होता. जो सिनेमा हिट राहिला. पण स्नेहाचे बॉलिवूडमधील करियर फारसे ठीक राहिले नाही. यानंतर स्नेहा उलाल बॉलिवूडपासून दूर होत गेली.

अमृता राव
‘विवाह’ सिनेमातील अभिनेत्री अमृता राव लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर होत गेली. अभिनेत्री तिच्या युट्यूब चॅनलवर अॅक्टिव्ह असते. अमृता राव पतीसोबत मिळून युट्यूबवर रिलेशनशिपबद्दलच्या काही टिप्स शेअर करत असते. पण अमृताने बॉलिवूड सिनेमापासून ब्रेक घेतला आहे.

तनुश्री दत्ता
इमरान हाशमीसोबत डेब्यू सिनेमा ‘आशिक बनाया आपने’ मधून तनुश्री दत्ताने फार बोल्ड सीन दिले आहेत. त्यानंतर तनुश्री दत्ता
‘ढोल’, ‘भागम भाग’, ‘गुड बॉय बॅड बॉय’, ‘रकीब’ सारख्या काही सिनेमांमध्ये काम केले. याच दरम्यान तिने साउथ सिनेमांमध्येही काम केले. त्यानंतर बॉलिवूडमधून ती गायब झाली.


आणखी वाचा : 
आमिर खान आणि रीना दत्ता यांची अशी सुरू झाली होती लव्ह स्टोरी
बॉलिवूडमधील हे कलाकार आहेत राजघराण्यांचे जावई
अरबाजसोबत लग्न केलेली Shura Khan नक्की आहे तरी कोण?

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...