Home मनोरंजन ‘पंचायत’ फेम आसिफ खानला सैफ आणि करिनाच्या लग्नासाठी नाकारली होती एण्ट्री, कलाकाराने सांगितले कारण
मनोरंजन

‘पंचायत’ फेम आसिफ खानला सैफ आणि करिनाच्या लग्नासाठी नाकारली होती एण्ट्री, कलाकाराने सांगितले कारण

9
Bollywood News
Bollywood News

Bollywood News : अॅमेझॉन प्राइमवर पंचायत वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच ‘पंचायत’ फेम आसिफ खानने एका पॉडकास्टमध्ये त्याला अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूरच्या लग्नासाठी एण्ट्री नाकारण्यात आल्याचा खुलासा केला होता. याशिवाय एण्ट्री नाकारण्यामागील कारणही अभिनेत्याने सांगितले आहे.

आसिफ करत होता वेटरचे काम
आसिफने एका पॉडकास्टवर त्याने आपल्या मुंबईतील संघर्षात्मक आयुष्याचे काही किस्से खुले केले. यावेळी आसिफ मुंबईत वेटरच्या रुपात काम करत होता असे त्याने म्हटले. पुढे आसिफने म्हटले की, ज्या हॉटेलच्या किचनमध्ये भांडी घासायचे काम करत होता तेथे सैफ अली खान आणि करिनाने वर्ष 2012 मध्ये लग्न केले होते. करिना आणि सैफचे लग्न मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ताजमध्ये झाले होते. खरंतर, आसिफने आपल्या सिनिअर्सकडे बॉलिवूड कलाकारांना भेटण्याची परवानगी मागितली होता. पण त्यावेळी नकार देण्यात आला. त्यावेळी खूप रडल्याचे सांगत आसिफ म्हणला की, अभिनेत्यांच्या एवढ्या जवळ असूनही भेटता आले नाही.

याच दिवसाने अधिक मेहनत आणि बॉलिवूडमध्ये आपला मार्ग शोधण्यासाठी प्रोत्साहन दिले. जवळजवळ एका महिन्यानंतर आसिफला एका कास्टिंग एजेंसीमध्ये काम मिळाले. पण तेथे लूकमुळे नेहमीच हिणवले गेले. मात्र एजेंसीच्या मालकाने म्हटले की, मी जे काही बोलतो ते व्यक्तिगत घेऊ नको. मी ईमानदारीने प्रतिक्रिया देत आहे. खरंतर, तुला पाहून कोणीही कास्ट करणार नाही.

यावर मॅनेजरला काय करावे असे विचारले असता त्याने सांगितले की, सर्वप्रथम अभिनय आणि त्यासंदर्भातील काही गोष्टी शिकून घे. त्यावेळी राजस्थानला परतण्याचा निर्णय आसिफने घेतला होता. जयपुरमध्ये एका नाटकाच्या ग्रुपसोबत काम करत आपले नाव त्यामध्ये कोरले. सहा वर्ष एका नाटकाच्या ग्रुपसोबत काम केले आणि पुन्हा सिनेसृष्टीत आपले नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आला. (Bollywood News)

याआधी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखततीत आसिफने सांगितले होते. वर्ष 2010 मध्ये आईला मला अभिनेता व्हायचे आहे असे सांगून, तिची समजूत काढून मुंबईत आलो. पोटापाण्यासाठी एका हॉटेलमध्ये वेटरच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली होती. काही महिने किचनमध्ये काम केले होते. त्यावेळीच सैफ आणि करिनाचे लग्नही पाहिले. तेव्हा अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधील काही कलाकारांना प्रत्यक्ष पाहता आले. यानंतर हॉटेलमधील नोकरी सोडली आणि एका मॉलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या दरम्यान ऑडिशनही देत होतो. खरंतर अभिनय आणि नाटकात काम करण्यास मला सांगण्यात आले होते.


आणखी वाचा :
सोनाक्षीच्या सासऱ्यांनी एकेकाळी केली होती सलमान खानची मदत, वाचा किस्सा
मिथुन चक्रवर्तींच्या एका खोटेपणामुळे ऋषी कपूर यांना गमवावा लागला असता जीव, वाचा किस्सा…

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...