Home गाजावाजा स्पेशल मोनिका बेदी ते मंदाकिनी यांच्यासह ‘या’ अभिनेत्र्यांचे होते अंडरवर्ल्ड डॉनशी नाते
गाजावाजा स्पेशलमनोरंजन

मोनिका बेदी ते मंदाकिनी यांच्यासह ‘या’ अभिनेत्र्यांचे होते अंडरवर्ल्ड डॉनशी नाते

11
Bollywood beauties with underworld don
Bollywood beauties with underworld don

Bollywood beauties with underworld don- जेव्हा अशी एक वेळ होती तेव्हा बॉलिवूड मध्ये ग्लॅमर तर होतेच पण अंडरवर्ल्ड डॉनशी सुद्धा काहींचे थेट संबंध होते. सिनेमा क्षेत्रातील काही अभिनेत्र्यांचे अंडरवर्ल्ड डॉन सोबत नाते होते. दरम्यान, या कारणामुळे त्यांच्या खासगी आयुष्यावर मोठा परिणाम झाला आणि त्यांचे व्यक्तिमत्व हे अपराधी म्हणून ही ओळखू जाऊ लागले. ऐवढेच नव्हे तर त्यांना लोकांकडून शिव्याशाप ही दिले गेले. अशा काही अभिनेत्र्या ज्यांना अंडरवर्ल्ड डॉन सोबत असलेल्या प्रेमाची ऐवढी मोठी किंमत मोजावी लागली की त्यांचे करियर हे बरबाद झाले. तर या लिस्टमध्ये मोनिका बेदी ते मंदाकिनीसह आणखी कोणत्या अभिनेत्र्या अंडरवर्ल्ड डॉनसोबत नात्यात होत्या त्याबद्दलच आपण अधिक जाणून घेऊयात.

-मंदाकिनी
मंदाकिनी यांनी १९८५ मध्ये राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मेली’ या सिनेमापासून बॉलिवूडच्या करियरला सुरुवात केली होती. याच दरम्यान, दाऊद इब्राहिम सोबत मंदाकिनी यांचे काही फोटो व्हायरल होऊ लागले होते. गँगस्टर सोबत असलेल्या संबंधामुळे त्यांच्या करिवर त्याचा फार मोठा परिणाम झाला. त्यानंतर मंदाकिनी हे आपले आयुष्य नक्की कशा प्रकारे जगतायत हे कोणाला कळतच नव्हते. नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्विकारला आणि डॉ. कागुयर टी. रिनपोछे ठाकूर नावाच्या एका भिक्षुकासोबत लग्न केले.

-मोनिका बेदी
अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याच्यासोबत अफेर असल्याचे समोर आल्यानंतर मोनिका बेदी यांच्याबद्दलच्या चर्चा अधिकच वाढल्या. प्रेमात पडल्यानंतर या दोघांनी भारतातून पळ काढला होता. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मोनिकाने इस्लाम धर्म स्विकारल्यानंतर लग्न केले आणि आपले नाव बदलून फौजिया ठेवल्याचे म्हटले जात होते. पण जेव्हा ती भारतात आली तेव्हा तिच्याबद्दल निर्माण झालेली ओळख ही दूर करण्यासाठी ती बिग बॉसच्या शो मध्ये दिसून आली आणि आपल्या करियरला नवा मार्ग देण्याचा तिने प्रयत्न केला.

हे देखील वाचा- इंटरनेटवरुन सिनेमा डाउनलोड करणे किंवा डाउनलोडिंग वेबसाइट चालवणे बेकायदेशीर असते का?

Bollywood beauties with underworld don
Bollywood beauties with underworld don

-ममता कुलकर्णी
९० च्या दशताक सर्वाधिक सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्र्यांपैकी एक असलेल्या ममता कुलकर्णींना पाहून प्रत्येकाच्या हृदयात धडधड व्हायची. तिला रुपेरी पडद्यावर पाहिल्यानंतर सर्वजण तिच्या प्रेमात पडायचे. मात्र ड्रग लॉर्ड विक्की गोस्वामी याच्या सोबत सामिल झाल्यानंतर अभिनेत्री आपल्या करियरच्या शिखरावर पोहचल्यानंतर गायबच झाल्या. दोघांनी लग्न केले आणि २०१७ मध्ये त्या दोघांच्या विरोधात नॉन-बेलेबल वॉरंट जाहीर करण्यात आले होते.(Bollywood beauties with underworld don)

-हिना कौसारी
७० च्या दशकात प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक असलेल्या हिना कौसारी, दाऊचा निकटवर्तीय इकबाल मिर्ची सोबत तिने लग्न केल्यानंतर त्या अधिकच चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, त्यानंतर त्यांनी कोणाला आपल्या आयुष्याबद्दल कळू नये अशीच नेहमी वागणूक केली. २०१३ पर्यंत अखेरचा श्वास घेण्यापर्यंत अभिनेत्री युकेमध्येच होत्या.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sade Sati
गाजावाजा स्पेशल

Sade Sati : जाणून घ्या नक्की शनीची साडेसाती म्हणजे काय?

भारतात ज्योतिषशास्त्राचे मोठे महत्त्व आहे. ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या भारतात सर्वाधिक...

Vande Mataram
गाजावाजा स्पेशल

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण

भारत जगातील सर्वात लोकप्रिय देश. आज भारताचा संपूर्ण जगामध्ये डंका वाजत आहे. ...

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Royal Stories
गाजावाजा स्पेशल

Royal Stories : 365 राण्या आणि न्यूड पार्टी करणारा भारतीय राजा!

एक असा राजा ज्याच्या वर्षात जितके दिवस असतात तितक्या राण्या होत्या, त्याच्यासोबत...