Home मनोरंजन एकीकडे बोल्डनेसचा तडका तर दुसरीकडे नथीचा नखरा, ‘या’ दोन मराठी अभिनेत्रींच्या अदांनी लावली सोशल मीडियावर आग
मनोरंजन

एकीकडे बोल्डनेसचा तडका तर दुसरीकडे नथीचा नखरा, ‘या’ दोन मराठी अभिनेत्रींच्या अदांनी लावली सोशल मीडियावर आग

8
smita gondkar prathana behere
एकीकडे बोल्डनेसचा तडका तर दुसरीकडे नथीचा नखरा, 'या' दोन मराठी अभिनेत्रींच्या अदांनी लावली सोशल मीडियावर आग

कलाकार नेहमीच त्यांचे अतिशय हटके अंदाजात आणि विविध आऊटफिटमध्ये फोटोशूट करत सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेत असतात. वेस्टर्न, ट्रेडिशनल, इंडो वेस्टर्न आदी वेगवेगळ्या लूकमधले कलाकारांचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या प्रार्थना बेहरे आणि स्मिता गोंदकर यांनी देखील नुकतेच अतिशय क्लासी आणि ग्लॅमरस फोटोशुट केले आहे. या दोघींचे दोन विविध पद्धतीचे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर आणि त्यांच्या फॅन्समध्ये खूपच गाजताना दिसत आहे. 

स्मिता गोंदकरच्या फोटोशूटबद्दल सांगायचे झाले तर, मराठी मनोरंजनविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. स्मिताने सुरुवातीपासूनच तिच्या अदांनी आणि बोल्डनेसने प्रेक्षकांना घायाळ केले. सुरुवातीपासूनच तिने तिची ही इमेज तयार केली. म्युझिक अल्बम आणि चित्रपटांमधून तिने तिची एक हटके ओळख निर्माण केली आहे.

स्मिता देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती नेहमीच तिचे वेगवेगळे फोटोशूट करताना दिसते. नुकतेच तिने तिचे अतिशय बोल्ड असे फोटोशूट केले आहे. याचे काही फोटो तिने इंस्टाग्रामवर देखील शेअर केले असून, ते चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचे ब्लेझर जॅकेट घातले असून, ते तिने खांद्यावर न घेता खालीच ठेवले आहे. यावर तिने लांब कानातले घालत, केस मोकळे ठेवले आहे. अतिशय साधा मेकअप तिच्या या लुकला पूर्ण करताना दिसत आहे.

स्मिताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

स्मिताच्या ‘पप्पी दे पारूला’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले होते. या गाण्यात तिचा  स्मिताचा हॉट बिकिनी अवतार पाहायला मिळाला होता. याशिवाय स्मिता बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 

मराठीसोबतच हिंदी टेलिव्हिजनविश्व गाजवणारी प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. प्रार्थनाने तिच्या अभिनयाने आणि तिच्या सोज्ज्वळ, निरागस सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे. मराठीमधील सध्याच्या घडीची टॉपची अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. शिवाय तिची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका देखील तुफान गाजत आहे. फोटोशूट करण्यामध्ये प्रार्थना अतिशय अग्रेसर असून, ती नेहमीच तिचे फोटोशूट करत तिच्या वेगवेगळ्या अवताराने सर्वांना आश्चर्यचकित करताना दिसते. 

नुकतेच तिने तिचे अतिशय पारंपरिक अशा मराठमोळ्या स्टाईलमध्ये अतिशय सुरेख फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये प्रार्थनाने नऊवार साडी नेसून मराठी अवतार केलेला दिसत आहे, प्रार्थनाने निळ्या रंगाची नऊवार साडी नेसली असून, त्यावर मराठी पद्धतीचे दागिने, अंबाडा त्यावर मोगऱ्याचा गजरा, कपाळावर चंद्रकोर असा साजशृंगार केला आहे. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या या लूकने सर्वांनाच तिच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे. प्रार्थनाचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांच्या लाईक्सचा आणि कमेंट्स वर्षाव होताना दिसत आहे.

======

हे देखील वाचा – रिव्हिलिंग ड्रेसमधून दिसला रिचा चड्ढाचा मादक आणि ग्लॅमरस अंदाज

======

प्रार्थनाने तिच्या करिअरची सुरुवात अनेक लहान मोठ्या भूमिका साकारून केली. तिने पवित्र रिश्ता या मालिकेत देखील भूमिका साकारली त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये गाजलेल्या भूमिका केल्या. सध्या ती झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...