Home प्रेस रिलीझ ‘आश्रम 3’मध्ये इंटिमेट सीन करताना बॉबी देओल झाला होता नर्व्हस
प्रेस रिलीझ

‘आश्रम 3’मध्ये इंटिमेट सीन करताना बॉबी देओल झाला होता नर्व्हस

8
Bobby Deol

अभिनेता बॉबी देओल (bobby Deol) प्रकाश झा यांच्या ‘एक बदनाम: आश्रम सीझन 3’ या वेबसीरिजमुळे खूप चर्चेत आहे. या मालिकेला खुप यश मिळत आहे. ‘एमएक्स प्लेयर’वर प्रदर्शित झालेली ही मालिका स्टार्सच्या अभिनयासोबतच इंटिमेट सीन्समुळे चर्चेत होती. अभिनेत्री ईशा गुप्तासोबत बॉबी खूपच बोल्ड अंदाजात दिसला होता. ईशासोबत इंटिमेट सीन करणे बॉबी देओलसाठी सोपे काम नव्हते. इंटिमेट सीनबद्दल मौन तोडत बॉबी देओलने सांगितले की हा सीन शूट करताना तो खूप घाबरला होता.

शूटिंग दरम्यान होता नर्व्हस

बॉबी देओलने ‘स्पॉटबॉय’शी संवाद साधताना सांगितले की, ‘आश्रम’ मालिकेच्या शूटिंगदरम्यान तो खूप घाबरला होता पण ईशा गुप्ताने त्याच्यासाठी सर्वकाही सोपे केले होते. ईशा पूर्णपणे प्रोफेशनल असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘मला आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा इंटिमेट सीन केला तेव्हा मी खूप घाबरलो होतो.

मी पहिल्यांदाच असं काही करत होतो. माझी सहअभिनेत्री ईशा गुप्ता खूप प्रोफेशनल होती. ज्यामुळे मला खुप सोपे वाटू लागले. तिने आपली व्यक्तिरेखा चोख बजावली. यानंतर सर्व काही अगदी सामान्य पद्धतीने शूट केले गेले. त्यामुळे लोकांनी खूप एन्जॉय केला.

====

हे देखील वाचा: बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शाहरुखचं चाहत्यांना खास सरप्राइज, ‘पठाण’ची रिलीज डेट जाहीर

====

आव्हानात्मक भूमिकेसाठी दिग्दर्शकाचे आभार

रिपोर्टमध्ये पुढे, बॉबीने असेही सांगितले की तो पडद्यावर नकारात्मक भूमिका साकारताना थोडा घाबरत होता. पण त्याला दिग्दर्शक प्रकाश झा यांनी प्रोत्साहन दिले. याबाबत बॉबी म्हणाला की, ‘नकारात्मक भूमिका असूनही लोकांनी मला पसंत केले याचा मला खूप आनंद आहे. मला आशा आहे की आता मला आणखी वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका करायला मिळतील.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

Mohanlal
प्रेस रिलीझ

Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर

नुकताच दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जेष्ठ...

Ghibli
प्रेस रिलीझलाईफ स्टाईलव्यक्ती विशेष

Ghibli : घिबली आर्ट म्हणजे काय? कोण आहे Ghibli ॲनिमेशनचे जनक?

सध्या सोशल मीडिया उघडल्या उघडल्या आपले स्वागत करतात ते आपल्याच लोकांचे अतिशय...

Vijay Sethupathi
प्रेस रिलीझ

शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याची होणार खास एन्ट्री

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये आपले नाव कोरले...

Vitthala Tuch
प्रेस रिलीझ

प्रेमाचा आविष्कार घेऊन ‘विठ्ठला तूच’ चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

विठ्ठला तूच हे ऐकताच आपल्याला आठवण येते ती आपल्या भगवान विठ्ठलाची. सर्वांच्या...