Home मनोरंजन कॅटरिना कैफची बॉलिवूड कारकीर्द
मनोरंजन

कॅटरिना कैफची बॉलिवूड कारकीर्द

11
Katrina Kaif Bollywood Journey

मनोरंजनविश्वात काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्वप्ननगरी मुंबई गाठतात. दिवसरात्र प्रयत्न करतात, मेहनत घेतात. मात्र सगळ्यांनाच यात यश येते असे नाही, अनेक जणं अपयशी होऊन रिकाम्या हाताने माघारी जातात. आज बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अजोड मेहनतीच्या जोरावर हिंदी सिनेमात स्वतःची जागा मिळवली आणि नावलौकिक कमावला. (Katrina Kaif Bollywood Journey)

अशीच एक अभिनेत्री म्हणजे कॅटरिना कैफ. बॉलिवूडची बार्बी डॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॅटरिनाने अनेक अडचणींवर मात करत या क्षेत्रात ओळख मिळवत अमाप प्रसिद्धी देखील मिळवली. सगळ्याची लाडकी आणि क्रश असलेली कटरिना आज तिचा ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅटरिनाने तिच्या करियरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आणि सुपरस्टार अभिनेत्रींचे बिरुद मिळवले.

कॅटरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे कश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यावसायिक होते; तर तिची आई सुजेन टॉरकेटी या मूळच्या ब्रिटिश होत्या. कॅटरिना लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. पुढे तिच्या आईनेच तिचा आणि तिच्या ६ भावंडांचा सांभाळ केला. वयाच्या 14 व्या वर्षी कॅटरिनाने माॅडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. हवाईमध्ये तिने ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने बऱ्याच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि यश मिळवले. सौंदर्यस्पर्धांमधील यशानंतर कॅटरिनाने काही दिवस लंडनमध्ये फ्रिलान्स माॅडेलिंग देखील केले. (Katrina Kaif Bollywood Journey)

Katrina Kaif Bollywood Journey

कॅटरिनाच्या आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर तिच्या आईने मुलांचा सांभाळ करण्यासाठी विविध शहरांमध्ये जाऊन नोकऱ्या केल्या. त्या पेशाने वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. कामाच्या शोधात कॅटरिना कैफच्या आई सुझान यांना सतत शहर आणि देश बदलावे लागले. एकाच ठिकाणी राहता न आल्याने त्यांनी त्यांच्या कोणत्याच मुलाला शाळेत दाखल केले नाही. मुलांना शिकवण्यासाठी वेगवेगळ्या शिक्षकांना घरी बोलावले.

कॅटरिनाचा जन्म होनककोन्गमध्ये झाला, पुढील काही वर्षे त्या कुटुंबाने हाँगकाँगमध्ये घालवली, त्यानंतर कुटुंब चीनला गेले. तिथून जपान मग फ्रान्स, स्वित्झर्लंड, पोलंड, बेल्जियम, हवाई आणि मग लंडन. लंडनमध्ये असताना तिने लंडन फॅशन वीकमध्ये घेऊन गेली आणि तिने लंडनमध्येच प्रोफेशनल मॉडेल म्हणून काम करायला सुरुवात केली. (Katrina Kaif Bollywood Journey)

कॅटरिना कैफची तिच्या मॉडेलिंगच्या काळात काही आशियाई लोकांशी मैत्री झाली. तिचे हे नवीन मित्र भारतात फिरण्यासाठी येत होते. त्यांनी कॅटरिनाला विचारले तिने देखील होकार दिला आणि ती भारतात पोहोचली. भारतात आल्यानंतर कॅटरिना मुंबईतील एका फॅशन शोमध्ये पोहोचली. या शोमध्ये फिल्ममेकर कैजाद गुस्ताद हे हजर होते. त्यांनी कॅटरिनाला पाहिले आणि त्यांना तिच्यामध्ये एक स्पार्क दिसला.

कैजाद यांनी त्याच शोमध्ये कॅटरिनाला चित्रपटाची ऑफर दिली. त्यांनी ज्या सिनेमासाठी तिला विचारणा केली तो सिनेमा होता 2003 मध्ये प्रदर्शित झालेला बूम. यामध्ये कॅटरिनाने सुपरमॉडेल रीनाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ हे देखील प्रमुख भूमिकेत दिसले होते. बूममध्ये कॅटरिनाने गुलशन ग्रोवरसोबत किसिंग सीन केला होता. याची खूपच चर्चा झाली. मात्र हा सिनेमा कॅटरिनाला ओळख आणि प्रसिद्धी देऊ शकला नाही. कारण बूम सिनेमा सुपरफ्लॉप गेला. (Katrina Kaif Bollywood Journey)

‘बूम’ सिनेमा फ्लाॅप झाल्यानंतर कॅटरिनाने साऊथकडे तिचा मोर्चा वळवला. तिने ‘मल्लीस्वरी’ या तेलगू चित्रपटात काम केले. पुढे ती राम गोपाळ वर्मा यांच्या ‘सरकार’मध्ये दिसली. या चित्रपटात कॅटरिनाने अभिषेक बच्चनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. ही छोटी भूमिका होती. पुढे कॅटरिनाला सलमान खानने ‘मैंने प्यार क्यों किया’ सिनेमा ऑफर केला. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला आणि तिला अभिनेत्री म्हणून खरी ओळख मिळाली.

हा सिनेमा हिट झाल्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिने पुढे एकापेक्षा एक हिट सिनेमे केले आणि बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवले. हमको दीवाना कर गये, नमस्ते लंडन, वेलकम, पार्टनर, सिंग इज किंग, अजब प्रेम की गज़ब कहानी, रेस, एक था टायगर, टायगर जिंदा है, भारत, टायगर ३ आणि राजनीती अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मैंने प्यार क्यो किया हिट झाल्यानंतर कॅटरिना आणि सलमान खान यांच्या रिलेशनशिपच्या देखील खूप चर्चा झाल्या. विविध कलाकारांनी ते नात्यात असल्याच्या हिंट देखील दिल्या होत्या. (Katrina Kaif Bollywood Journey)

Katrina Kaif Bollywood Journey

मात्र कालांतराने कॅटरिनाच्या आयुष्यात रणबीर कपूर आला आणि ती आणि सलमान खान वेगळे झाले. असे असूनही कॅटरिना आणि सलमानने अनेक सिनेमे सोबत केले. पुढे रणबीर आणि कॅटरिना यांचे नाते देखील तुटले. यानंतर ती बराच काळ सिंगल होती. मग अचानक तिच्या आणि विकी कौशल यांच्या नात्याबद्दल बातम्या येऊ लागल्या. मात्र त्यांनी कधीही त्यांचे नाते मान्य केले नाही. अचानक कॅटरिना आणि विकीने डिसेंबर २०२२ रोजी लग्न केले.

======

हे देखील वाचा : शाहरुखसोबत शूटिंग करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी घरातील मंडळींशी बोलणे केले होते बंद, वाचा किस्सा 

======

कॅटरिनाचा बॉलिवूड प्रवास अजिबातच सोपा नव्हता. मात्र तिने अभिनयातील बारकावे शिकण्यापासून ते हिंदी शिकण्यापर्यंत अनेक गोष्टींवर मेहनत घेतली आणि ती यशस्वी झाली. तिला नानाविध पुरस्कारांनी आजपर्यंत गौरवण्यात आले आहे. तिने ‘के ब्युटी’ नावाने स्वतःचे ब्युटी प्रोडक्ट देखील लाँच केले आहे. एका माहितीनुसार ती तब्बल २५० कोटी रुपयांची मालकीण असल्याचे सांगितले जाते. सध्या कॅटरिना चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिच्या चर्चा तिच्या फॅन्समध्ये आणि सोशल मीडियावर होतच असते. (Katrina Kaif Bollywood Journey)

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...