Home मनोरंजन सुरजच्या विजयानंतर उत्कर्ष शिंदेची मार्मिक पोस्ट
मनोरंजन

सुरजच्या विजयानंतर उत्कर्ष शिंदेची मार्मिक पोस्ट

10
Suraj Chavan

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची जोरदार हवा पाहायला मिळाली. अगदी पहिल्या दिवसापासूनच या शो ने प्रेक्षकांवर आपली पकड धरायला सुरुवात केली. आणि पुढच्या काही दिवसातच हा शो प्रेक्षकांचा अगदी आवडता शो बनला. बिग बॉसच्या घरत सतत होणाऱ्या अजीबोगरीब घडामोडींमुळे आणि टोकांच्या वादांमुळे या शो ने चांगलीच लोकप्रियता मिळवली.

नुकताच शोचा फिनाले मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आणि गुलकीत धोका फेम सुरज चव्हाणने बाजी मारत ट्रॉफी जिंकली. सोशल मीडियावर बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा विजेता सुरजच असणार याबद्दल जोरदार चर्चा सुरु होत्याच. सुरजने अभिजीतला सावंतला पछाडत हा शो जिंकला आहे. या पर्वामध्ये अनेक नामचीन लोकं सहभागी झाले होते. मात्र प्रेक्षकांच्या कमी मतांमुळे अनेकांना हा शो सोडावा लागला. अखेर सुरजने शो जिंकत किताब आपल्या नावावर केला.

मात्र असे असले तरी सुरज जिंकल्याचा आनंद सगळ्यांनाच झाला असे नाही. अनेकांनी सुरज जिंकल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली. यात कलाकारांसोबतच नेटकऱ्यांचा देखील समावेश आहे. याशिवाय काहींनी तर सुरज केवळ अनुकंपेमुळेच जिंकला असल्याचे देखील म्हटले. अशातच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक असलेल्या आणि बिग बॉसचा माजी खेळाडू असलेल्या उत्कर्ष शिंदे सूरजला एक छान गाणे लिहिले असून एक मार्मिक पोस्ट देखील शेअर केली आहे.

उत्कर्षने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “आज कासवाची आणि सशाची शर्यत आठवली…’बनला आण बाण बिग बॉसची शान आपला सूरज चव्हाण…’ आयुष्य जगून समजतं. वाचून अथवा ऐकून नाही. बरेच जण म्हणाले सूरजने काय वेगळं केलं घरात? फक्त झापूक झुपूक तर केलं आणि जिंकला. त्यांना मला हेच सांगायचं आहे, घरात आपुलकी, मानसन्मान, कोणाचा निरादर नाही, कोणाची कधी-कसलीच भीती नाही तर कोणा समोर माज गर्व नाही की कोणासाठी मनात क्लेष नाही.

जे होतं स्वच्छ, निर्मळ, सरळ खोटं नाट नाहीच. एकाग्र संयमी कासव उड्या मारणाऱ्या सशाला जसा हरवतो तसाच शांत एकाग्रतेने आपल्या खेळाशी एकनिष्ठ राहून ना लफडे ना झगडे फक्त १०० टक्के मेहनतीने आपला कासव सर्वांची मनेही जिंकण्यात आणि ट्रॉफी ही जिंकण्यात यशस्वी झाला.”

आज (६ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात माझा परफॉर्मन्स असल्याकारणाने मधेमधे मोबाईलवरच बिग बॉस बघणं सुरुच होतं. जसा सूरज जिंकला हे कळलं इतका आनंद झाला की कार्यक्रम संपवून घरी येऊन सरळ स्टुडिओत आलो आणि लगेच हे गाणं लिहिलं, संगीतबद्ध केलं गायलं आणि लगेच आल्हाद बरोबर व्हिडीओ शूट केलं. एक तासात गाणं तयार..

=======

हे देखील वाचा : जाऊन घ्या सुरज चव्हाणचा खडतर जीवनप्रवास

======

सूरज जिंकल्याचं आनंद गाऊन नाचून साजरा केला. केदार शिंदे सर आपण दिलेल्या ‘झापूक झुपूक’ चित्रपटाची ऑफर ऐकून खूप छान वाटलं. लव्ह यू सर. लवकरच महागायक आनंद शिंदे यांच्या आवाजात मी सूरजच गाणं घेऊन येतोच आहे. सूरज, मित्रा तू लवकर फ्री हो खूप नाचायचंय आणि नाचवायचंय अख्ख्या महाराष्ट्राला. बाकी सूरज जिंकला म्हणून जे जळत असतील त्यांनी बर्नोल क्रिम ओईंटमेंट लावावे वाटल्यास त्याचे पैसे मी देईन.”

दरम्यान उत्कर्ष शिंदेने सुरज विजयी होताच त्याच्यावर जबरदस्त गाणं केलं आणि ते संगीतबद्धही केलं. ‘बनला आण बाण बिग बॉसची शान आपला सूरज चव्हाण…’ सध्या सोशल मीडियावर हे गाणे चांगलेच गाजत आहे. सुरजच्या फॅन्सने तर हे गाणे उचलून धरले आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...