Home मनोरंजन आर्या जाधव आणि निक्की तांबोळीमध्ये झटापट?
मनोरंजन

आर्या जाधव आणि निक्की तांबोळीमध्ये झटापट?

8
Big Boss Marathi 5

मराठी बिग बॉस सुरु होऊन एक महिना झाला आहे. मात्र या एका महिन्यामध्ये या घरात एवढे काय घडले ज्यामुळे हा शो सतत चर्चांमध्ये आहे. टीआरपीच्या बाबतीतही बिग बॉसने मोठे रेकॉर्ड केल्याचे दिसून येत आहे. यासोबतच बिग बॉसचे पाचवे पर्व रितेश देशमुखच्या जबरदस्त सूत्रसंचलनामुळे आणि अनेक नामवंत कलाकारांच्या सहभागामुळे आधीच गाजत होता. त्यात घरातील वाद आणि भांडणांमुळे या शोची लोकप्रियता अधिकच वाढली आहे.

सध्या या शोमध्ये नवीन आठवड्याच्या कॅप्टन्सीचा टास्क पार पडताना दिसत आहे. या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बाचाबाची होताना दिसत आहे. अशातच घरातील दोन वाद घालणाऱ्या स्पर्धक असणाऱ्या आर्या जाधव आणि निक्की तांबोळी यांच्यात जोरदार भांडण झाले आणि निक्कीने आर्याने तिला मारले असल्याचे तक्रार बिग बॉसकडे केली. अगदी शोच्या पहिल्या दिवसापासून या दोघींमध्ये रोजच टोकाचे वाद पाहायला मिळाले. आता पुन्हा या दोघी टास्कमध्ये भिडल्या आहेत.

सध्या एक व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये आर्या आणि निक्कीमध्ये भांडण झाले असून, निक्की बिग बॉसकडे आर्याने तिला मारले असल्याचे सांगताना दिसते. सोबतच ती जोरजोरात रडताना देखील दिसत आहे. झाले असे की, ‘बिग बॉस’कडून नवीन कॅप्टन निवडण्यासाठी घरातील सदस्यांना एक नवीन टास्क दिला आहे. या टास्कमध्ये निक्की ‘टीम ए’मधून तर, आर्या ‘बी टीम’मधून खेळत आहे. दोघी दोन विरुद्ध टीममध्ये टास्क करत असल्याने या दोघींमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या कॅप्टन्सी टास्कमध्ये अंकिता, वर्षा, आर्या, निक्की आणि जान्हवी या घराच्या वॉशरुममध्ये त्यांच्या टास्कनुसार दिलेल्या स्टोनचे रक्षण करत असल्याचे दिसत होते. निक्कीच्या हाती हा स्टोन लागावा असे कोणालाही वाटत नव्हते. म्हणूनच आर्या काय करते तर तिचे हात धरते हे प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. यानंतर या दोघींमध्ये झटापट होताना दिसते. या दरम्यान निक्की, “मला धरायचे नाही, स्टोनला उचलायचा आहे.” असे आर्याला रागात सांगताना दिसते. पण, या दोघीही एकमेकींचे ऐकून घेण्यास तयार नव्हत्या. यानंतर या दोघींमध्ये मोठे वाद देखील होताना दिसले आहे.

यानंतर निक्की रडत-रडत वॉशरुम एरियाच्या बाहेर येऊन “बिग बॉस… हिने मला मारले आणि मी हे सहन करून घेणार नाही” असे जोरजोरात ओरडून म्हणते. ती घरात मोठ्या प्रमाणावर आरडाओरडा करत आणि रडत सर्वांना ही गोष्ट सांगताना देखील या प्रोमोमध्ये दिसते. इकडे निक्कीचा आरडाओरडा सुरू असताना दुसरीकडे आर्या अंकिताला म्हणते “मला या गोष्टीचा काहीच फरक पडलेला नाहीये. होऊ दे काय ते…गेली तर गेली घरी”. निक्की तांबोळी रडत बाहेर गार्डन परिसरात निघून येते. तिच्या मागमोग अरबाज सुद्धा येतो. बाहेर बसून निक्की, “बिग बॉस…एकतर हिला घराच्या बाहेर काढा प्लीज… नाहीतर मला काढा” अशी बिग बॉसकडे मागणी करताना दिसते.

आता नक्की आर्याचे बरोबर आहे की निक्कीचे हे बघणे महत्वाचे असेल. हा प्रोमो पाहून अनेकांनी आर्याला सपोर्ट केला आहे तर काहींनी निक्कीचे बरोबर असल्याचे म्हटले आहे. मात्र हा प्रोमो पाहून नक्की काय घडले आहे हे समजत नसल्याने हा भाग पाहूनच बोलणे योग्य ठरेल असे देखील अनेकांनी कमेंट्स करत म्हटले आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...