Home मनोरंजन पॅडी दाच्या लेकीची जान्हवीसाठी मार्मिक पोस्ट
मनोरंजन

पॅडी दाच्या लेकीची जान्हवीसाठी मार्मिक पोस्ट

11
Paddy Kamble Daughter

मागील दोन दिवसांपासून सतत एकच चर्चा चालू आहे, आणि ती म्हणजे मराठी बिग बॉसची. मराठी बिग बॉसच्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ या टास्क दरम्यान सदस्यांमध्ये तुफान वादावादी झाली. दोन ग्रुपमध्ये हा टास्क झाला आणि यावेळी जान्हवीने तिच्या विरुद्ध ग्रुपमध्ये असलेल्या अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्यावर आगपाखड केली. तिने पॅडी यांच्याबद्दल अनेक चुकीचे आणि अपमानजनक शब्द यावेळी वापरले.

बिग बॉसचा हा भाग प्रक्षेपित झाल्यानंतर जान्हवीवर सडकून टीका केली जात आहे. याआधी देखील जान्हवीने जेष्ठ मराठी अभिनेत्री असलेल्या वर्षा उसगांवकर यांचा अपमान केला होता. त्यानंतर आता तिने तिचा मोर्चा पंढरीनाथ कांबळे यांच्याकडे वळवला आहे. अगदी सुरुवातीपासूनच पॅडी हे अतिशय शांत आणि कामास काम ठेऊन वागत होते. रितेशने देखील त्यांना मोकळेपणाने खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र तरीही ते संयमानेच
खेळत होते. असे असूनही जान्हवीने केलेला त्यांचा अपमान संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि कलाकारांच्या जिव्हारी लागला. सगळ्याने सोशल मीडियावर व्यक्त होत पंढरीनाथ यांना पाठिंबा देत जान्हवीला खडेबोल सुनावले.

आता पंढरीनाथ कांबळे यांची कन्या असलेल्या ग्रिष्मा कांबळेने एक पोस्ट शेअर करत जान्हवीला मार्मिक शब्दात सुनावले आहे. ग्रिष्मा कांबळेने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “जितकं स्पष्ट तू स्वतःचं नाव उच्चारत नसशील तितकं स्पष्ट आणि आदराने बाबा तुझं नाव घेतो. मुखावाटे बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, महत्त्व, वजन आणि टायमिंग या गोष्टींची समज आणि भान पंढरीनाथ कांबळेला आहे. हे त्याने सिद्ध केलं आणि म्हणूनच तुझ्या अपमानाला कोणतीही मर्यादा न ओलांडता अगदी संयमाने योग्य असं उत्तर दिलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Grishma Kamble (@grishma_kam)

खरंतर “Overacting” हा शब्द तुझ्या तोंडून निघणं हे हास्यास्पद आहे. हे बघ साधी गोष्ट आहे, Contestents च्या घरात सुरू असलेल्या गेमबद्दल तू हवं तेवढं बोलू शकतेस पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्यासाठी Especially वर्षा उसगांवकर यांच्या आणि पंढरीनाथ कांबळेच्या Career वर बोलण्याआधी तुला त्यांच्या एवढी मराठी इंडस्ट्रीत स्वतःची ओळख कमवावी लागेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या असंख्य प्रेक्षकांची मनंही जिंकावी लागतील. कारण नसताना सतत आपल्यापेक्षा वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या लोकांविषयी अनादर करणं हा गेम नाही.

मुळात समोरच्याचा अपमान करणं हा बाबाचा स्वभाव नाही. तुझ्या पातळीला न उतरून त्याने स्वतःची, गेमची आणि विशेष म्हणजे तुझी प्रतिष्ठा राखली आहे. संतापात डोक्याचा ताबा हरवून मनाला वाटेल ते बोलणारी तू निक्की तांबोळीची सावलीच आहेस.

जेव्हा गेम बाहेर असलेल्या तुझ्या लेकराचा विनाकारण उल्लेख झाला तेव्हा तुला ते पटलं नाही… आज तू गेम बाहेरच्या, बाबाने लेकरा सारखाच वाढवलेल्या, फुलवलेल्या Career विषयी एवढं बोललीस ते मात्र तुला पटलं!! हा तुझा “Fair Game” संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय एवढं लक्षात ठेव.

======

हे देखील वाचा : जान्हवीला पती किरण किल्लेकरने दिला पाठिंबा

======

त्याच्या संस्कारात वाढली आहे मी, त्यामुळे जर माझ्या बोलण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मी तुझी माफी मागते. माझा हेतू फक्त त्याची लेक म्हणून स्वतःचं मत मांडणं एवढाच आहे.”

ग्रीष्मा कांबळेने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिला भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. नेटकऱ्यांसोबतच मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी तिच्या पोस्टवर कमेंट्स करत तिचे भरभरून कौतुक केले आहे. आणि तिच्या पोस्टला सहमती दर्शवली आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...