Home मनोरंजन अंकिता वालावलकरची खास व्यक्तीसाठी पोस्ट
मनोरंजन

अंकिता वालावलकरची खास व्यक्तीसाठी पोस्ट

10
Ankita Walawalkar Post

टेलिव्हिजन जगतातील अतिशय लोकप्रिय, प्रसिद्ध असा शो म्हणजे बिग बॉस. हिंदी असो किंवा मराठी बिग बॉस शो चा प्रत्येक सिझन गाजतो म्हणजे गाजतोच. नुकताच बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा बिग बॉस मराठीचे नवीन पर्व दणक्यात सुरु झाले आहे. मागील चारही सिझन गाजल्यानंतर आता बिग बॉसच्या पाचव्या सिझेनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिग बॉसच्या या पाचव्या पर्वामध्ये अनेक मोठमोठे आणि नामचीन सेलिब्रिटी सामील झाले आहेत. यातच एक नाव आहे, सोशल मीडियावरील लोकप्रिय इन्फ्लुएन्सर, युट्यूब असणारी कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर. आपल्या व्हिडिओमुळे सतत चर्चेत असणारी अंकिता आता बिग बॉसमध्ये दिसणार यामुळे तिचे फॅन्स खूपच खुश आहे. मात्र यासोबतच तिने बिग बॉसच्या घरात जाण्याआधी एक आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे. अंकिता लवकरच लग्न करणार आहे. तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे.

अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक खास पोस्ट करत त्या व्यक्तीबद्दल माहिती दिली आहे. अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले,

“डिअर कोकण हार्टेड बॉय,

रात्री २ वाजता यशस्वी भव: हे गिफ्ट घेऊन येणं रोमँटिक समजू की काळजी? कारण, ‘बिग बॉस’मध्ये जाण्यासाठी २ दिवस बाकी उरलेत फक्त… खरंतर आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते पण, तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते. तू माझ्या आयुष्यात आलास आणि मला आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलंस.

तुझे शब्द माझी ताकद आहेत. तू हिंमतीने माझ्याबरोबर उभा आहेस हे बघून आई पण निश्चिंत आहे. तुझी सगळी वाक्य लक्षात ठेऊन ह्या नवीन प्रवासाला सुरुवात करतेय. जेव्हा लग्न करु असं आपण ठरवलं आणि big boss ची ऑफर आली, माझ्यासाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती होती. त्यात मी ठरवलं की, तुला जे योग्य वाटेल ते करेन पण, तू म्हणालास “माझा विचार नको करूस… मी आजही आहे, उद्याही असेन पण तू मेंटली नीट राहणार असशील तर जा… लवकर ये…पण जिंकून ये.

तू आलीस की लग्न करु फक्त जशी आहेस तशीच वाग, जिंकण्यासाठी fake वागू नकोस, हरलीस तरी चालेल” हे सगळं लक्षात ठेऊन जातेय, लवकरच येईन पण छान राहून येईन. तू तयारीला लाग… तुझ्याबरोबर १९५ देश फिरायचे आहेत. फुलांची खूप आठवण येईल…येते…

ता.क.- dyson चा बॉक्स फाडून यशस्वी भव: लिहिण्याची शिक्षा आल्यावर दिली जाईल.”

======

हे देखील वाचा : मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
======

दरम्यान अंकिताने ही पोस्ट शेअर केली आणि सोशल मीडियावरून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे. अंकिता बिग बॉस मधून बाहेर आली की, लग्न करणार असल्याचे देखील तिने या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यामुळे आता अंकिता या शोमध्ये जास्तीत जास्त टिकावी आणि जिंकावी यासाठी आणि तिच्या लग्नासाठी सोबतच तिचा तो खास डिअर कोकण हार्टेड बॉय नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...