Home मनोरंजन मिड विक एव्हिक्शनमध्ये वर्षा उसगांकर बिग बॉसमधून बाहेर
मनोरंजन

मिड विक एव्हिक्शनमध्ये वर्षा उसगांकर बिग बॉसमधून बाहेर

9
BB Marathi

मराठी बिग बॉसचा खेळ आता शेवटाकडे आला आहे. लवकरच हा खेळ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. बिग बॉसच्या या पर्वाने अफाट लोकप्रियता मिळवली आहे. मागील चारही सिझनला मागे टाकत या पर्वाने टीआरपीचे देखील नवीन रेकॉर्ड सेट केले. सध्या फिनाले वीक सुरु असून, निक्कीने अधिकच अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. अशातच घरात मिड विक एव्हिक्शन पार पडले असून महाराष्ट्राची लाडक्या जेष्ठ अभिनेत्री वर्षा ताईंनी या घराचा निरोप घेतला. वर्षा ताई फिनालेपर्यंत पोहचाव्या आणि जिंकाव्या अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. पण त्यांचा खेळ कमी पडला आणि त्या बाहेर आल्या.

यंदाचे बिग बॉसचे हे पर्व १०० दिवसांचे नाही तर ७० दिवसांचे असणार आहे. ‘बिग बॉस’ कडून देखील हे अधिकृतरित्या घोषित करण्यात आले होते. त्यामुळे एक महिना आधीच हा शो संपणार आहे. दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात आता सात स्पर्धक उरले असतानाच मिडविक एविक्शन झाले. ‘बीबी हाऊस पार्टी ‘ सुरु असताना बिग बॉसने सर्वांना मोठा धक्का दिला. या मिडविक एविक्शनमधून वंडरगर्ल अभिनेत्री वर्षा उसगांवकर बाहेर आल्या आणि त्यांच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. मिडवीक एलिमिनेशन जाहीर करून ‘बिग बॉस’ने पाचव्या पर्वातील टॉप-६ स्पर्धकांच्या नावांची घोषणा केली.

‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेताना वर्षा ताई म्हणाल्या,”मला अजिबातच वाटले नव्हते की मी रेडकार्पेटवर जाईल. फायनलिस्टमध्ये असेन. पण शेवटी जनतेची इच्छा आणि नियतीची इच्छा असते. आज मी घराचा निरोप घेत आहे हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. शेवटपर्यंत राहण्याची माझी इच्छा होती… पण हरकत नाही. आपली सगळी स्वप्न आपल्या मनाप्रमाणे पूर्ण होत नाही. हा खेळ खेळण्याचे मी धाडस दाखवले.” आता अभिजीत, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय आणि जान्हवी या सहा सदस्यांमध्ये महाअंतिम फेरीत ट्रॉफी जिंकण्यासाठी कांटे की टक्कर होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varsha Usgaonker (@varshausgaonker)

‘बिग बॉस’च्या घरातील ६७ व्या दिवशी वर्षा यांचा प्रवास संपला आणि त्यांना घराबाहेर पडावे लागले. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून त्यांनी सगळ्यांचे भरपूर मनोरंजन केले. दरम्यान, कुठेही वय मध्ये न आणता त्या प्रत्येक टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धकाच्या बरोबरीने उभ्या राहिल्या आणि खेळताना दिसल्या. घराबाहेर पडल्यानंतर वर्षा ताईंनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट खूपच गाजत असून त्यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

वर्षा ताईंनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर स्वतःला शोधण्याचा आहे आणि मी #BiggBoss च्या प्रवासात केवळ स्वतःला नव्याने ओळखलं नाहीतर मी आपलं सामर्थ्य, धैर्य आणि संघर्ष यांचा अनुभव घेतला. या प्रवासात मी अनेक आव्हानांचा सामना केला, नवीन मित्र बनवले आणि माझ्या सच्च्या व्यक्तिमत्त्वाला वाव दिला. माझा हा अनुभव दर्शवतो की, प्रत्येक प्रवास आपल्याला एक नवीन शिकवण देतो आणि आपल्याला अधिक बलवान बनवतो.”

=======

हे देखील वाचा : नवरात्र माळ दुसरी – देवी ब्रह्मचारिणी

=======

“तुमची ताई, तुमची वर्षा, तुमची #WonderGirl या शोमधून तुमचा निरोप घेत आहे. पण, मनोरंजनाचा हा घेतलेला वसा कायम पुढे चालत राहील! माझ्या प्रिय प्रेक्षकांना… प्रेम आणि फक्त प्रेम..! तसेच ‘बिग बॉस मराठी’, ‘एन्डमोलशाईन इंडिया’, ‘कलर्स मराठी’, ‘जिओ सिनेमा’ आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार”

दरम्यान वर्षा ताईंच्या या पोस्टवर नेटकाऱ्यानी कमेंट्स करत त्यांचे आणि त्यांच्या खेळाचे कौतुक केले आहे. सोबतच त्या जरी घरातून बाहेर पडल्या असल्या तरी त्याच सगळ्यांसाठी विजेता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...