Home मनोरंजन अंकिता वालावलकरचा प्रेरणादायी प्रवास
मनोरंजन

अंकिता वालावलकरचा प्रेरणादायी प्रवास

12
Ankita Walawalkar

सध्या बिग बॉस मराठी अगदी दणक्यात सुरु आहे. या शोमध्ये होणारे वाद, भांडणं, टास्क आदी गोष्टींमुळे हा शो सतत प्रकाशझोतात येत आहे. यंदा मराठी बिग बॉसचे पाचवे पर्व असून, हे अनेक अर्थाने वेगळे आणि खास ठरत आहे. एकत्र या पर्वात घरात फक्त कलाकार नाही तर सोशल मीडियावरील इन्फ्लूएन्सर, रॅपर आदींना देखील प्रवेश दिला आहे. शिवाय यावर्षी या शोचे सूत्रसंचालन मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील स्टार अभिनेता रितेश देशमुख करताना दिसत आहे.

या बिग बॉस शोने अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांवर आपली पकड मजबूत केली. शोमधील काही ओळखीचे काही नवीन चेहरे देखील अगदी थोड्याच काळात लोकप्रिय झाले. यातलाच एक चेहरा म्हणजे सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर ‘अंकिता वालावलकर’. कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी अंकिता या शोमध्ये आली आणि सगळेच आश्चर्यचकित झाले. या शोमध्ये येण्याआधीपासूनच अंकिता तशी लोकप्रिय आणि ओळखीचा चेहरा होती. मात्र शोने तिला अधिक प्रसिद्धी मिळवून दिली.

आपल्या सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे अंकिता चांगलीच लोकप्रिय आहे. ती सतत कोकणाशी संबंधित विविध व्हिडिओ पोस्ट करून लाइमलाईट्मधे येत असते. मात्र मराठी बिग बॉसने तिची लोकप्रियतेत अधिकच भर घातली. या शोमुळे जास्तच चर्चेत आलेल्या अंकिताचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. मोठ्या दिव्यातून येत तिने ही प्रसिद्धी मिळवली आहे. आज आपण तिच्या याच प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.

Ankita Walawalkar

अंकिता वालावलकरचे पूर्ण नाव अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर असून, 29 वर्षीय अंकिता मूळची कोकणातील सिंधुदुर्ग येथील आहे. अंकिताने सिविल इंजिनियर क्षेत्रातून तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने MITM या कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे. अंकिता वालावलकर ही कंटेंट क्रियेटर आणि Vlogger आहे. अंकिता वालावलकरच्या Kokanheartedgirl या इंस्टाग्राम अकाउंट वरती तिचे 500K+ फॉलोवर्स आहेत. यासोबतच तिचे Resort नावाचे मालवण येथे एक रिझॉर्ट देखील आहे.

अंकिता वालावलकरचे बालपण हे खूप शिस्तीत गेले. तिच्या घरातील वातावरण जास्त कडक आणि शिस्तीचे होते. असे असूनही अंकिता केवळ सोळा वर्षाची असताना एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. ती ज्या मुलाच्या प्रेमात पडली, तो मुलगा तिच्या पेक्षा 10 ते 12 वर्षांनी मोठा होता. पुढे ती 18 वर्षाची झाल्यानंतर अंकिता त्या मुलासोबत घरातून पळून गेली आणि त्याच्या घरात राहू लागली.

मात्र पाहिले काही दिवस चांगले गेल्यानंतर तिला हळूहळू तिने चूक केली असल्याचे जाणवू लागले. कारण पुढील एक ते दीड महिन्यातच त्या मुलाने अंकिताला त्रास द्यायला सुरुवात केली आणि तिला तिची चूक समजून आली. अंकिताला त्या मुलाने खूप त्रास दिला. तो तिला मारायचा. शिव्या द्यायचा. याचा तिला खूप मानसिक त्रास झाला. मात्र या सर्व काळात त्या मुलाच्या आईने अंकिताला शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. ती कायम अंकिताला पाठिंबा देत राहिली.

जवळपास दीड वर्ष हे सर्व तिने सहन केले. मात्र एक दिवस अंकिताने या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिने पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. अतिशय भीतभीत मनात अनेक गोष्टी साठवून अंकिता तिच्या आई-वडिलांकडे गेली. मात्र तिच्या आई-वडिलांनी तिच्या निर्णयाचा स्वीकार केला आणि मोठे मन दाखवून तिला पुन्हा घरात घेतले. तिचे हे नाते तिच्यासाठी कोणत्याही विषापेक्षा कमी नव्हते. त्यामुळे यातून बाहेर पाडण्यासाठी तिला खूप त्रास झाला आणि वेळी लागला. तिच्या घरच्यांनी तिची यात पूर्ण साथ दिली. अखेर ती यासर्व गोष्टींमधून बाहेर आली.

यानंतर अंकिताने सुरुवातीला tiktok वरती तिचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. मालवणी भाषेचा तिचा लहेजा हा प्रेक्षकांना विशेष आवडू लागला. पण थोड्याच दिवसात tiktok भारतात बंद झाले. त्यानंतर तिने इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. तिने एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये अंकिताने आपल्या वडिलांना एक ब्रँडेड शर्ट गिफ्ट केला होता. तिचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आणि तो तुफान व्हायरल झाला. यातूनच अंकिताला अधिक चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळाली.

=======

हे देखील वाचा : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा National Film Awards 2024

=======

हळूहळू अंकिता आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आणि ती Kokanheartedgirl नावाने फेमस झाली. पण तिच्यासाठी हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. अनेक चढ उतार तिने या प्रवासात अनुभवले. तिला अनेकदा तिच्या व्हिडिओसाठी आणि कॉन्टेन्टसाठी खूप ट्रोल देखील करण्यात आले होते. पण तरीही ती या क्षेत्रात टिकून राहिली आणि अंकिताने स्वतःचे करियर, स्थान निर्माण केले. आज अंकिता एक यशस्वी व्यक्ती म्हणून ओळखले जाते.

बिग बॉसमध्ये येण्याच्या काहीच तास आधी तिने ती पुन्हा प्रेमात पडली असल्याचे जाहीर केले. तिने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात तिने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल लिहिले होते. आता अंकिताचा नवीन बॉयफ्रेंड कोण आहे? आणि ते लग्न कधी करताय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान बिग बॉसमध्ये जाऊन अंकिताने प्रेक्षकांची मने जिंकली. ती या पर्वातील घराची पहिली कॅप्टन देखील ठरली.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...