Home मनोरंजन बिग बॉसच्या घरात बाबांना पाहून अंकिताला अश्रू अनावर
मनोरंजन

बिग बॉसच्या घरात बाबांना पाहून अंकिताला अश्रू अनावर

9
Bigg Boss Marathi

मराठी बिग बॉसचा पाचवा सिझन कमालीचा व्हायरल होत आहे. या शो ने मागील चारही सिझनला लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या बाबतीत मागे टाकले आहे. या पाचव्या पर्वातील स्पर्धक आणि सूत्रसंचालक या दोघांनी त्यांच्या बळावर हे पाचवे पर्व सुपरहिट केले आहे. विविध टास्क सर्वच क्षेत्रातील सेलिब्रिटी स्पर्धक आणि टोकाचे वाद. यांमुळे या शोने प्रेक्षकांवर आपली छाप सोडली. सामान्यपणे १०० दिवसांचा हा शो असतो. स्पर्धकांना १०० दिवस बिग बॉसच्या घरात राहावे लागते. मात्र हे पाचवे पर्व ७० दिवसांमध्येच संपणार आहे. कमी कालावधीमध्ये शो निरोप घेणार असल्यामुळे बिग बॉसचे फॅन्स कमालीचे नाराज देखील आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या ‘फॅमिली वीक स्पेशल’ टास्क चालू आहे. यामध्ये घरात असलेल्या स्पर्धकांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी घरात येत आहे. नुकत्याच झालेल्या भागात वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पोवार यांच्या कुटुंबीयांना भेटता आले. यानंतर आता आजच्या आगामी भागात ‘बिग बॉस’च्या घरात ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकरचे बाबा आणि तिच्या बहिणी या घरात प्रवेश करणार आहेत. सध्या याच भागाचा अतिशय भावनिक प्रोमो कमालीचा व्हायरल होत आहे.

बिग बॉसच्या गाहर्ट ‘फॅमिली वीकमध्ये’ अंकिताच्या बहिणींबरोबरच तिचे वडीलही तिला भेटण्यासाठी बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहेत. बिग बॉसच्या घरातील याचा एक प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सुरुवातीला दार उघडते आणि अंकिताच्या बहिणी तिला दिसतात. त्यानंतर त्या अंकिताला मिठी मारून खूप रडतात. अंकिताला देखील अश्रू अनावर होतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

मात्र त्यानंतर अंकिताला बिग बॉसकडून एक खरे सरप्राइज मिळाले. कोकण हार्टेड गर्लच्या ध्यानीमनी नसताना बिग बॉसच्या घरात चक्क तिच्या बाबांची एन्ट्री झाली. वडिलांना पाहताच अंकिता जोरात बाबा ओरडते आणि तिला रडू कोसळते. ती ढसाढसा रडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. बिग बॉसच्या घरातील हा भावुक करणारा व्हिडिओ समोर आला आहे. मुख्य म्हणजे तिचे बाबा पहिल्यांदाच या शोच्या निमित्ताने, अंकिताला भेटण्याच्या निमित्ताने मुंबईमध्ये आले. तिने याआधी तिच्या बाबाना अनेक मुंबईला येण्याबद्दल सांगितले मात्र त्यांनी हे ऐकले नाही. याबद्दल तिने घरात देखील एकदा सांगितले होते.

हा व्हिडिओ कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “मुंबईत कधीही पाऊल न ठेवलेला आपला बाबा, specially आपल्याला भेटायला आला हे पाहताच अंकिताला अनावर झाले अश्रू.”

=================

हे देखील वाचा : जाणून घ्या चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यांमधील फरक

================

कधीच मुंबईत न आलेल्या वडिलांना ‘बिग बॉस मराठी’मुळे मुंबईत येण्याची संधी मिळाली, यासाठी अंकिता ‘बिग बॉस मराठी’चे आभारही मानताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, पुढच्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी’चा हा सीझन संपणार आहे. ६ ऑक्टोबरला ‘बिग बॉस मराठी’चा अंतिम सोहळा संपन्न होणार आहे. वर्षाताई, अभिजीत, पॅडी, अंकिता, सूरज, जान्हवी, निक्की, धनंजय या सदस्यांपैकी कोण ‘बिग बॉस मराठी’ची ट्रॉफी हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

Recent Posts

Related Articles

Sulakshana Pandit
मनोरंजन

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Tejaswini Lonari
मनोरंजन

Tejaswini Lonari : अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूप उरकला साखरपुडा; बड्या नेत्याची होणार सून

सध्या मराठी मनोरंजनविश्वामधे लग्नसराईचे दिन आल्याचे चित्र आहे. अनेक मराठी कलाकार साखरपुडा...

Asarani
मनोरंजन

Asarani : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेते असरानी यांचे दुःखद निधन

हिंदी सिनेमात असे खूप कमी कलाकार होऊन गेले किंवा आहेत ज्यांचे केवळ...