Home क्रीडा वयाच्या ९४ व्या वर्षी धावण्याच्या शर्यतीत कशी मिळवली पदकं? वाचा आजींबद्दल अधिक
क्रीडा

वयाच्या ९४ व्या वर्षी धावण्याच्या शर्यतीत कशी मिळवली पदकं? वाचा आजींबद्दल अधिक

7
Bhagwani Devi Dagar
Bhagwani Devi Dagar

म्हातारपण हे फार काळजी घेण्यासारखे वय असते. आपण बहुतांश वेळा ऐकतो, पाहतो की म्हाताऱ्या लोकांना विविध आजार-व्याधी जडलेल्या असतात. मात्र अशातच देशातील चक्क ९४ वर्षीय आजींनी तर एथलीटमध्ये आपले नाव कमावले आहे. भगवानी देवी डागर (Bhagwani Devi Dagar) असे त्या आजींचे नाव असून त्यांनी म्हातारपणातपण आपला फिटनेस जपला आहे. खरंतर २९ जून ते १० जुलै दरम्यान वर्ल्ड मास्टर्स एथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ टूर्नामेंटचे आयोजन फिनलॅंन्ड येथे करण्यात आले होते. येथे भगवानी देवी यांनी अनोखा रेकॉर्ड करत देशाची मान विदेशात उंचावली आहे.

आजींनी या वर्ल्ड मास्टर एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तीन पदकं आपल्या नावावर केली आहेत. यामध्ये सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. भगवानी देवी यांना मिळालेले सुवर्ण पदक हे १०० मीटर स्प्रिंटमध्ये मिळवले आहे. तर शॉटपुटमध्ये कांस्य पद पटकावले आहे. आजींनी १०० मीटर स्प्रिंट रेस ही अवघ्या २४.७४ सेकंदात पूर्ण केली होती.

हे देखील वाचा- आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत चहावाल्याच्या मुलीने मिळवले रौप्यपदक 

Bhagwani Devi Dagar
Bhagwani Devi Dagar

भगवानी देवी यांनी यावेळी पहिल्यांदाच नव्हे तर यापूर्वी सुद्धा काही पदकं आपल्या नावावर केली आहेत. एथलीट आजींनी चेन्नईत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय मास्टर्स एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्ण पदक मिळवली होती. त्यानंतर त्यांनी वर्ल्ड मास्टर एथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ मध्ये सुद्धा सहभागी होता आले.

भगवानी देवी यांनी वयाच्या ९४ व्या वर्षात सुद्धा रचलेल्या या इतिहासामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. देशातील मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अॅन्ड स्पोर्ट्स यांनी सुद्धा ट्विट करत आजींना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी असे म्हटले होते की, भारताच्या भगवानी देवी यांनी पुन्हा एकदा खरं करुन दाखवले की, वयाचा काहीही फरक पडत नाही. त्यांनी केलेला हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे.(Bhagwani Devi Dagar)

संकट कोणाच्या आयुष्यात येत नाहीत पण भगवानी देवी यांची कथा मन हेलावणारी आहे. तरीही आजींनी स्वत:ला तंदुरुस्त ठेवत आयुष्य जगले. खरंतर आयुष्यात मनमोकळेपणाने जगता आले पाहिजे तरच आपले आयुष्य सार्थकी लागल्याचे आपण म्हणू शकतो. आपल्या कलागुणांना वाव देत किंवा एखाद्याच्या कलाकौशल्यांना पाठिंबा देत त्याला आयुष्यात यशाच्या मार्गावर नेण्यासाठी आपण नेहमीच मदत केली पाहिजे. आजींनी सुद्धा आपल्या वयाच्या ९४ व्या वर्षी तीन पदकं मिळवणे ही फार देशासाठीसुद्धा आणि आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Related Articles

India
क्रीडा

India : भारतीय संघाच्या जर्सीचा रंग निळाच का असतो?

नुकताच आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकत इतिहास घडवला आहे. दोन...

Cricket | International News
क्रीडा

Cricket : ‘या’ आहेत सर्वांत श्रीमंत भारतीय महिला क्रिकेटपटू

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी...

Cricket
क्रीडामनोरंजन

Cricket : कोण आहे स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल?

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला. आधी...

Cricket
क्रीडा

Cricket : विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट टीमवर बक्षिसांचा पाऊस

यंदा देखील २ तारीख भारतासाठी लकी ठरली. २०११ साली २ एप्रिलला रचल्या...