इस्रायलमध्ये इराणकडून जोरदार हल्ला होत असतांना इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू हे आपल्याच एका विधानानं वादळात सापडले आहेत. नेतान्याहू यांच्या मोठ्या मुलाचे लग्न युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन वेळा पुढे ढकलण्यात आले आहे. इस्रायलमधील जनतेशी संवाद साधतांना नेतान्याहू यांनी याच गोष्टीचा उल्लेख केला. युद्धाची वैयक्तिक किंमत म्हणून आपण अवनर नेतान्याहू आणि अमित यार्देनी या दोघांचे लग्न पुढे ढकलले असे, त्यांनी सांगितले. (Benjamin Netanyahu)

या त्यांच्या विधानानं एखाद्या क्षेपणास्त्र हल्ल्यापेक्षा मोठा घात इस्रायलमधील जनतेवर झाला आहे. नेतान्याहू यांची यामुळे इस्रायली जनतेनं खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने इस्रायली नागरिक नेतान्याहू यांच्यावर टीका करत आहेत. देशापेक्षा नेतान्याहू स्वतःच्या कुटुंबाला आणि प्रतिमेला जपत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात येत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाला होत असलेल्या विलंबाचे वर्णन युद्धाची ‘वैयक्तिक किंमत’ असे केले आहे. त्यांच्या या शब्दांमुळे इस्रायली जनता संतापली आहे. जिथे इराणी हल्लांमुळे सर्व देशच एक झाला आहे, तिथे देशाच्या प्रमुखाला फक्त आपल्या मुलाची चिंता लागली आहे, हे इस्रायलच्या कणखरपणाविरुद्ध असल्याची टीका नेतान्याहू यांच्यावर करण्यात येत आहे. बिअरशेवा परिसरातील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यानंतर नेतान्याहू यांनी या भागाला भेट दिली. (International News)
पत्रकारांबरोबर बोलतांना त्यांनी त्यांचा मोठा मुलगा अवनर याच्या लग्नाचा उल्लेख केला. याशिवाय त्यांनी त्यांची भावी सून अमित यार्देनी आणि आपली पत्नी सारा नेतान्याहू यांचा हिरो म्हणून उल्लेख केला. नेतान्याहू यांच्या या विधानावर सर्वच इस्रायलमध्ये टिका करण्यात येत आहे. या युद्धामुळे इस्रायलच्या अनेक घरातील तरुण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यांच्या आई आणि प्रेमिका या हिरो आहेत. तसेच कठिण परिस्थितीत ड्युटी करणारे डॉक्टर आणि झूम कॉलवर आपल्या मुलांना शिकवणारे शिक्षक हिरो असल्याचे मेसेज सोशल मिडियाच्या माध्यमातून नेतान्याहू यांना पाठवण्यात येत आहेत. नेतान्याहू यांच्या विधानानं त्यांच्या मोठा मुलगा अवनर नेतान्याहू चर्चेत आला आहे. वास्तविक अवनरचे लग्न आधी नोव्हेंबर 2023 मध्ये होणार होते. पण त्यावेळी पंतप्रधानांच्या वैयक्तिक निवासस्थानाला हिजबुल्लाह या संघटनेनं ड्रोन हल्ल्यात लक्ष केले. त्यामुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर अवनरचे लग्न 16 जून 2025 रोजी होणार होते. (Benjamin Netanyahu)

परंतु इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यांमुळे आणि व्यापक तणावामुळे ते पुन्हा पुढे ढकलण्यात आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या तृतीय पत्नी सारा नेतान्याहू दोन्ही मुलं, अवनर आणि आयर ही कायम चर्चेत असतात. अवनर या नेतान्याहू यांच्या मुलाचे गिर्यारोहक अमित यार्देनीसोबतचे प्रेमसंबंध चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यावर दोन्ही कुटुंबाचे एकत्र फोटोही सोशल मिडियामध्ये प्रसिद्ध झाले. या दोघांच्या लग्नाच्या तारखा जाहीर झाल्या, आणि इस्रायलवर एकामागून एक आक्रमणे होऊ लागली. त्यामुळे या भावी लग्नावर सोशल मिडियावर अनेक विनोदही येऊ लागले आहेत. नेतान्याहू यांची सून अमित यार्देनी ही हॅले येथे झालेल्या निन्जा इस्रायल शोची चॅम्पियन राहिली आहे. इस्रायलच्या प्रसिद्ध फार हायारोक हायस्कूलमधून पदवीधर झालेली यार्देनी 2015 मध्ये सैन्यात दाखल झाली. (International News)
===========
हे देखील वाचा : Nicholas Aujula : ही भयानक भविष्यवाणी खरी झाली तर !
===========
लष्कराच्या गुप्तचर दलातही तिनं काम केलं आहे. 2017 मध्ये रिशमन विद्यापीठातून तिने संगणक शास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. ती गिर्यारोहक म्हणूनही प्रसिद्ध आहे. तिने अनेक मोठी पर्वतशिखरेही सर केली आहेत. अवनर आणि अमित यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर गेल्या वर्षी नेतान्याहू यांच्या कुटुंबाने लग्नापूर्वीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही इस्रायलमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हा नेतान्याहू कुटुंबाचा वैयक्तिक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम रद्द करण्यात आला, तेव्हापासून या दोघांच्या लग्न समारंभासंबंधी एकही कार्यक्रम झालेला नाही. मात्र या सर्वांवर जाहीरपणे नेतान्याहू यांनी केलेल्या वक्तव्याचा आता सर्वत्रच निषेध करण्यात येत आहे. विशेषतः हमासच्या हल्ल्यात ज्यांचे अपहरण झाले आहे, अशा कुटुंबातल्या व्यक्तींनी नेतान्याहू यांच्यावर आत्मकेंद्री नेता म्हणून टीका केली आहे. (Benjamin Netanyahu)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
- America
- Amit Yardeni
- Avner Netanyahu
- Benjamin Netanyahu
- BJP
- china
- congress
- cricket
- donald trump
- eknath shinde
- Entertainment
- india
- information
- International news
- iran
- iran israel 2025
- iran israel latest news
- iran israel war
- israel
- Latest International News
- latest marathi news
- latest marathi updates
- latest social updates
- Maharashtra
- maharashtra politics
- Marathi News
- Marriage
- Mumbai
- Narendra Modi
- Pakistan
- Political News
- political updates
- Politician
- Politics
- Social News
- Social Updates
- Temple
- todays marathi headlines
- Top Stories
- Uddhav Thackery
- राजकारण